ती नाही तिची जात अनौरस होती.. ती नाही तिची जात अनौरस होती, त्या परिघात तिची काया औरच होती... तापलेल्या उन्हाखाली रापलेली ती, डोईवरल्या शिदोरीने थकलेली होती.... ओल्या गर्भारपणाचा शृंगार लेवून पाना थेंबातून मोहोरलेली होती.... रसरसलेला देह आणि उसळती ज्वानी नागमोडी वळणांची साद देत होती... खोट्या प्रतिष्ठेचा आव आणणारी टाळकी तिच्याच वावटळात भिरभिरली होती... गच्च वेदनांची टाळी आज तिच्याच कानी घुमली होती.... पदरी चार आण्यांचं वाण देऊन विषारी भोग घेऊन मुसमुसली होती... वांझोट्या मळ्याला पोटुशा कळा सोसून गरीब बिचारी आज निजली होती..... ती नाही तिची जात अनौरस होती...