Nojoto: Largest Storytelling Platform
jasmore3244
  • 11Stories
  • 41Followers
  • 41Love
    0Views

Jas more

  • Popular
  • Latest
  • Video
177041c776cfb1da43f995ec330c2594

Jas more

जुन्या वर्षाच्या ढीगभर आठवणी
टीचभर स्टेटसमध्ये साचत नाही...
आज पुन्हा नव्याने क्षणांचा बांध 
रुजायला वेळच वाचत नाही.... #newyear#let's start with new

#newyear#let's start with new

177041c776cfb1da43f995ec330c2594

Jas more

त्याला हल्ली कंटाळा येऊ लागला होता, 
तेच तेच बोलण्याचा काच जणू लागला होता... 
अधीर होऊन तिच्या मेसेजची वाट पाहणारा तो, 
बधिर होऊन आज झोपू लागला होता... 
त्याच्या या वागण्याचे कोडे तिला जणू कळेच ना, 
अचानक काय बरे बिनसले? हे मात्र वळेच ना....
तिला भेटण्याची ओढ संपू लागली होती, 
अन आपुलकीची वाढ खुडू लागली होती....
स्टेटसला दिसणाऱ्या त्या फोटोंच्या आड, 
खोट्या हास्याच्या सवयीची हाव वाढू लागली होती..
कदाचित म्हणूनच त्या "hmm"चा रिप्लाय 
ती "hmm"करून टाळू लागली होती... #loneliness
177041c776cfb1da43f995ec330c2594

Jas more

तिने केलेल्या मेसेजला   
त्याचा रिप्लाय काही यायचा नाही...
तिने टाकलेल्या स्टेटसला लगेच पाहण्याचा  
मोह तोदेखील टाळायचा नाही... #waiting
177041c776cfb1da43f995ec330c2594

Jas more

#Pehlealfaaz त्याने आखली होती लक्ष्मणरेषा, 
 तरी येऊन गेला रावण.... 
सीतेची ही आज काय दशा, 
राम तरी होता का पावन?..... #stayfair
177041c776cfb1da43f995ec330c2594

Jas more

दरवाजा फुगला म्हणून 
पावसाच्या पाण्याला दोष देऊ नका.... 
कदाचित भिजलेल्या आठवणी 
उंबऱ्यात अडकल्या असतील....

177041c776cfb1da43f995ec330c2594

Jas more

दवांत भिजलेल्या गात्राप्रमाणे 
हे वय आपलं सरत जातं... 
पावसाची प्रत्येक सर झेलत 
हे आयुष्य मुरत जातं.... 
तोच तो ओलावा घेऊन
दुःखाचं घोंगडं भिजत राहतं...
बोचणाऱ्या सुखाला मात्र 
आठवणींचा भार साचत जातं...

177041c776cfb1da43f995ec330c2594

Jas more

ती नाही तिची जात अनौरस होती..


ती नाही तिची जात अनौरस होती, 
त्या परिघात तिची काया औरच होती...
तापलेल्या उन्हाखाली रापलेली ती, 
डोईवरल्या शिदोरीने थकलेली होती.... 
ओल्या गर्भारपणाचा शृंगार लेवून
पाना थेंबातून मोहोरलेली होती.... 
रसरसलेला देह आणि उसळती ज्वानी 
नागमोडी वळणांची साद देत होती... 
खोट्या प्रतिष्ठेचा आव आणणारी टाळकी
तिच्याच वावटळात भिरभिरली होती... 
गच्च वेदनांची टाळी आज 
तिच्याच कानी घुमली होती.... 
पदरी चार आण्यांचं वाण देऊन 
विषारी भोग घेऊन मुसमुसली होती... 
वांझोट्या मळ्याला पोटुशा कळा सोसून 
गरीब बिचारी आज निजली होती..... 
ती नाही तिची जात अनौरस होती...

177041c776cfb1da43f995ec330c2594

Jas more

दगडाचा देव आज दुधाने न्हालेला,  
राऊळाच्या पायथ्याशी होता जीव भुकेला... 
हातावरचे पोट होते उपासाने वाढलेले, 
रोजीरोटी कमावताना नाकीडोळी तासलेले...

177041c776cfb1da43f995ec330c2594

Jas more

उसकी आहट आज बंद कमरेसे आयी, 
हलकीसी मुस्कुराहट चेहरे पे छायी....
नजदिकीयोंने आज खामोशीसी पायी, 
इश्क इबादत करके मुकाम्मलसी लायी...

177041c776cfb1da43f995ec330c2594

Jas more

हा BLOCKED नावाचा  BLOCK भरून काढायला  एखादा LOCK असता तर किती बरं झालं असतं ना... #Blocked💫

Blocked💫

loader
Home
Explore
Events
Notification
Profile