Nojoto: Largest Storytelling Platform

पांडूरंग म्हणजे वारकर्‍यांच्या गळ्यातली तुळशीची मा

पांडूरंग म्हणजे वारकर्‍यांच्या गळ्यातली तुळशीची माळ
पांडूरंग म्हणजे रखुमाईचं कुकंवानं मळवटलेलं कपाळ
पांडूरंग म्हणजे भक्त पुंडलीकाने फेकलेल्या विटेवर
अठ्ठावीस युगं जगउद्धारासाठी उभा असलेला अनंत काळाचा देव
पांडूरंग म्हणजे तुकोबारायाच्यां अभंगातला टाळ
पांडूरंग म्हणजे ज्ञानेश्वरांच्या भक्तीच्या नांगराला सोन्याचा फाळ
पाडूरंग म्हणजे कायम आठवणीतले भक्तीमय छत्र
पांडूरंग म्हणजे संतमहंतांचा सुवर्ण आयुष्यकाळ 
वारकर्‍यांकरीता हिरवागार झालेला रानमाळ
पांडूरंग म्हणजे वारकर्‍यांच्या गळ्यात स्थिरावलेली
सोन्यापेक्षाही श्रेष्ठ तुळशीची माळ
पांडूरंग म्हणजे वारकर्‍यांना स्वप्नात भासलेला
जन्मोजन्मीचा सुवर्णमय सुखबरसातीचा काळ
पांडुरंग म्हणजे हरीभक्तांचा अविट असा जागर
पांडुरंग म्हणजे मायेचा पाझर
पांडुरंग म्हणजे तिन्ही जगाचे खरे सार
पांडुरंग म्हणजे वारकऱ्यांचे खरे अस्तित्वरूपी माहेर अन् सासर

©शब्दवेडा किशोर
  #विठुमाऊली