पाई पाई जमून पैसा बाप वावरपेरते. काया काया मातीतुन दाणा दाणा अंकुरते... डवरून निदुनिया तन काढून टाकते पिक वाढते जोमान बाप फवारा मारते आन पाण्याच्या वक्ताला पाणी चाट हे मारते पाणी चाट हे मारते बाप वाटुली पाहेते आस घेऊन पावसाची ढग पाहायला झुरते माय देतेस हिम्मत बाप कष्ट या करत भरघोस पीक होईल याचे सपन पाहेते सपनाची राख होते मन दुखात शिरते मन दुखात शिरते माय बापाले सावरते बाप सावरुनीया घेते घर पुढे चालवते कर्जाच्या ओझंया पाई बाप विचार करते विचार करुनी कर्जाचा बाप मराले पाहेते बाप मराले पाहेते स्वप्नात देव येते भिऊ नकोस रे बाळा पाठीशी मी आहे देवावरी ठेवून विश्वास बाप पुढेया चालते. - रितेश गडम ©Ritesh Gadam #farmer#jagachaposhinda##jaykisan #जगाचा अन्न दाता #farmersprotest