Nojoto: Largest Storytelling Platform

Best choiceoflife Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best choiceoflife Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutpoem with multiple choice questions high school, your life your choice quotes, your life your choice, choice in life quotes, what is the difference between bok choy and pak choi 10,

  • 1 Followers
  • 1 Stories

rayansh

सुर्याचा अस्तोदय म्हणजे एक दिवसाची परिक्रमा
दिवस आला अन गेल्याची आठवण 
आणि साठवणीतला समा
चांगलं चांगलं सगळं साठवायचं
वाईट साईट घडलेलं क्षणात विसरायचं
आला क्षण गेला क्षण 
एवढंच काय ते जगायचं

सगळेच दिवस सारखे नसतील
काही अगदीच पोरके भासतील
ग्रहण सुध्दा येईल अवचित  
कधी सूर्य कधी चंद्रतारे रुसतील
तेही अंधाराचं सावट आपलंसं करायचं
एवढंच काय ते जगायचं

प्रत्येक उदयाला उभारीच असेल असं काही नाही
प्रत्येक अस्ताला दीप मालवतीलच असं काही नाही
असतील स्वयंप्रकाशी तारे आकाशगंगेत सुप्त काही
ज्यानं त्यानं आपला अस्तोउदय ठरवायचा 
हीच अस्तित्वाची ग्वाही
उगवत्या मावळत्या दोन्हीस नमन करायचं
एवढंच काय ते जगायचं

#rayofhope #happyhippie #ChoiceofLife #sunrise_sunset 🤍❤️️🖤🤟 #RaysOfHope #happyhippie #choiceoflife #Life #Nojoto

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile