Nojoto: Largest Storytelling Platform

Best चवदार Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best चवदार Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutचवदार तळ्याचे पाणी चौथी कविता, चवदार तळ्याचा सत्याग्रह दिन, चवदार सारखे शब्द, चवदार तळ्याचा सत्याग्रह माहिती मराठी, चवदार तळ्याचे पाणी स्वाध्याय,

  • 1 Followers
  • 1 Stories

milind sarkate

#चवदार तळे सत्याग्रह 20 मार्च 1927

read more
#पाणी

असिफ हे आजचं नाही रे
दोन हजार वर्षांपुर्वीचं आहे
तु मंदीरात पाणी पिलास म्हणून
की मंदीरात गेलास म्हणून 
अमानुषपणे छळला गेलास
हे मला नक्की माहीत नाही
पण..
पाण्यात 'जातीय-रसायन' 
मिसळल की ते पाणी
माणुसकीला आग लावते 
हे माञ नक्की कळाल..
बघ ना तुच इतिहासात डोकावून 
अस्पृश्यांसाठी मंदीराचा अन् 
पाण्याचा ही सत्याग्रह 
माझ्या बाबांनी केलाय
अन् राज्यघटनेद्वारे कुठे ही
जाऊन पाणी पिण्याचा 
मूलभूत हक्क ही दिलाय 
पाण्यासाठी छळणारा 
या जगाला तु नवा नाहीस रे
बघ ना थोडे मागे वळुन
त्या रोहिणी नदीच्या पाण्यामुळेच
सिध्दार्थ गौतमाला गृहत्याग 
करावा लागला..
अन् घोटभर पाण्यासाठी दारोदार 
फिरणार्या अस्पृश्यांना
घरचा पाण्याचा हौद खुला 
करणार्या फुलेंना ही आयुष्यभर
ञास सहन करावा लागला 
शेवटी एकच तहान 
शरीराची असो वा श्रध्देची
तिला पाहणारी नजर 
जेव्हा धर्मांध होते तेव्हाच 
हिंदु -मुस्लिम ऐक्याचीच नव्हे
तर देशाच्या बंधुतेची कबर
जाती-जातीमुळे खोदली जाते

- सरकटे मिलिंद मुरलीधर

©milind sarkate #चवदार तळे सत्याग्रह 20 मार्च 1927

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile