Nojoto: Largest Storytelling Platform

Best वाट Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best वाट Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutac कितने वाट का होता है, फ्रिज कितने वाट का होता है, कूलर कितने वाट का होता है, भरियो वाट को, आतुरतेने वाट पाहणे meaning in english,

  • 58 Followers
  • 180 Stories

Shankar Kamble

चोरपावली सांज दाटली रानभूल ही वाट हरवली
थबकत आले भास अवेळी माखून काजळ रेघ ओली..

सताड उघडे दार नभाचे नक्षत्रांचे रम्य फुलोरे
गळूनी गेले शिणले मोती भग्न हासती खिन्न मनोरे..

क्षितीजाच्या या गूढ पटली चितारलेली हळवी नक्षी
तळहातावर गोंदून गेली रंग हळदी पिवळी पक्षी..

जलाशयाच्या संथ दर्पणी बिंब उमटले नवं तरुंचे
मुखं न्याहळी अती कौतुके तरंग भरले डोह मनाचे..

सावल्यांचे खोल जाळे नाते विणती एक क्षणाचे
धूसर झाल्या दृश्य प्रतिमा भाव कोंडले आर्त मनाचे..

©Shankar Kamble #moonnight #आठवणी #सांजवेळ #सांजहीवेडलावी #संध्याकाळ #रात्री #तू #वाट #वाटतुझी

Nagesh Ballal

#कलाकार माणूस #वाट पाही नझरा #प्रेम आणि यातना Love #experience #Expectations

read more
एखाद्यावर आभाळा जितकं प्रेम केल्यावर... पावसा इतकं रडू येईलचं ना...!!

©Nagesh Ballal #कलाकार माणूस #वाट पाही नझरा #प्रेम आणि यातना #Love #experience #Expectations

Shankar Kamble

शोधून सापडेना ही वाट हरवली जेंव्हा
परतुन पावलांचा कुणी माग काढतो तेंव्हा..

थबकून तळ्याच्या काठी का पूर आसवे ढाळी?
गर्भार सावल्या पंक्ती लेणे मिरवती कपाळी..

पाचूने जडले होते मोहरले पान दवाचे
दैवात अवेळी सुकणे बोचते शल्य कशाचे?

सांधला बांध मनाचा स्पुंदतो श्रावण डोळा
कुरतडले कोंब कधीचे तरतरला खोल उमाळा..

हळूवार घालते साद दूरदेशी रुसला रावा
पंख यावे मजं भाबडी गंध रातराणी न्यावा..

निसटून चालले श्वास राहिले भास कोरडे
वळीवाच्या चार सरींना रान आतुर का एवढे?

©Shankar Kamble #Alive #वाट #वाटते #भास #सखी #भाव #देह #लाज #प्रेम

Dileep Bhope

#वाट

read more

Simran

#वाट बघतेय तुझी मागे बघण्याची

read more

Kunal Salve

चालतांना वाट एक, ती वळली एक वळणावर 
मी तरीही वाट चालत राहिलो ती येईल पुन्हा म्हणून,
नको तिचा पाय पडायला कोणत्या काट्यावर ! #वाट 
#आस 
#मराठीलेखणी 
#yourqoutetai

Sujata Darekar

सुप्रभात मित्रानों आजचा नवीन विषय आहे कालच्या मिड नाईट पोयम ची एक ओळ, कधी हरवली वाट... #कधी #हरवली #वाट #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला नक्की भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
कधी हरवली वाट धुक्यात
कधी हरवली कुशीत रे
गंध फुलांचा दरवळ होऊन
निजले स्वप्न उशीत रे

निळ्याशार डोळ्यांमधली
शाई सरसर गळू लागली
अन् स्पंदनांचे वेग कसे ते 
राहिले ना मुशीत रे

कुजबूज झाली अधरांची
गजबजले हे हृदय वेडे
आनंदल्या आज असंख्य
मनभावना खुशीत रे

रगडता हे देह ओले
वसंताची ती रम्य पहाट
प्रसन्न झुलती वादळ वारे
राहिले ना दुषीत रे

स्वच्छ भोर निरभ्र नभी
चांदण्या या खुलू लागल्या
आलावरच्या खळीमधूनी
सांगून गेल्या गुपीत रे सुप्रभात मित्रानों
आजचा नवीन विषय आहे
कालच्या मिड नाईट पोयम ची एक ओळ,
कधी हरवली वाट...
#कधी #हरवली #वाट 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला नक्की भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Ganesh Shinde

जुन्या आठवणींत किती ते रमावे,
कुण्या कारणांनी स्वतःस थांबवावे,
पुन्हा त्याच वळणावर किती घुटमळावे,
वाटते आता सोडूनि हि वाट रोजची,
आज थोडे पुढे निघून जावे। #वाट #पाऊल

अल्पेश सोलकर

मित्रानों💕 आज आपण रोजचं चॅलेंज जरा बदलूया. आज मी देईन दोन शब्द आणि त्या दोन्ही शब्दांचा वापर करायचा आहे एकाच वाक्यात. आणि हो वाक्य गद्य स्वरूपाचं असावं. शब्द आहेत – एकदा,वाट

read more
एकदा वाट...सत्याने 
चालू लागली...!
अनेकांतील .. वाटेतील.. छुपी वाट..
सत्याच्या आडवी येऊन...
 सत्य वाटेला बूजवू लागली...! मित्रानों💕
आज आपण रोजचं चॅलेंज जरा बदलूया.
आज मी देईन दोन शब्द आणि त्या दोन्ही शब्दांचा वापर करायचा आहे एकाच वाक्यात.
आणि हो वाक्य गद्य स्वरूपाचं असावं.

शब्द आहेत –
एकदा,वाट

pooja d

राजा, तुझी वाट सुटना
तुझं नाव सुटना ।।
 
या भरल्या जगात माझं
अस कुणीच वाटत नाही
मन सारख तुझ्याकडच वळत राही,
राजा, तुझी वाट सुटना,तुझं नाव सुटना ।।

सवय तुझी जडली मला भारी
तू जीवनात आलास त्याबद्दल आभारी
फक्त आता पाय घेऊ नकोस माघारी,कारण
राजा, तुझी वाट सुटना, तुझं नाव सुटना ।।

घेतलेली वचन असा कसा तू विसरून जाई
तुझं अस वागणं बर नव्ह बाई,
माझ्यासाठी थोडी करत जा ना तू घाई
राजा, तुझी वाट सुटना, तुझं नाव सुटना ।।

 #वाट #प्रेमकविता #मराठीकविता
loader
Home
Explore
Events
Notification
Profile