Nojoto: Largest Storytelling Platform

Best उन्हाळा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best उन्हाळा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutउन्हाळा in hindi, उन्हाळा पावसाळा हिवाळा in english, उन्हाळा ऋतु कविता, उन्हाळा ऋतू माहिती हिंदी, उन्हाळा चित्र,

  • 4 Followers
  • 4 Stories

Amita

Shankar Kamble

सूर्य कोपला आभाळी ओली लव्हाळी सुकली
जीव मातीचा कोरडा मान धाटाची वाकली

उर उमाशी घामाशी कशी सोसावी काहील?
आत बाहेर वणवा कधी सांगावा जाईल?

भासे सावली पारखी करू कुणाशी सलगी?
घुटमळे वावटळ फेर धरुनी कलगी

झाडां–झुडपांना कसा?भार पानांचा पेलेना
दूर लोटल्या खाईत दैन्य पाचोळा जाईना 

मोटं लागली उचकी तळ गाठला सुखाचा
पोटं हापाटी खिलारं ऐक हंबरा जीवाचा

हात निढळी ठेवून काळ्या ढगाला मागतो
सरो ताप दुनियेचा दिल्या वचना जागतो

©Shankar Kamble #Saffron #सूर्य #उन #ताप #गर्मी #उन्हाळा #उकाडा #विरह #शेतकरी #माती

gaurav

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे आला आला उन्हाळा.. #आलाआलाउन्हाळा चला तर मग लिहूया.

read more
गारवारा शोधती नजरा झळाळत्या रखरख उन्हाच्या...
    चैत पालवी फक्त झाडाला....
   ऊंच ऊंच अंबर किती रखरखात दिसतो...
   सावली शोधण्या गडबड ओढावतो.....
   तहानेने जरा व्याकुळ शुद्ध झिरा पाहण्या वर्दळ...
    आटुन गेली नदी आटला धबधबा त्याचा खळखळाट...
झाडाची सावली जणु जीवन दायीनी....
 आरामाची गोड थोडी डुलकी....
  गावाचा पार ना मोकळा पिंपळ झाड...
   गप्पा रंगती आठवणींच्या त्या काळच्या आड...
   जपली आजुनी ती प्रेमाची माणुसकी....
    निमित्त त्या बंध भोळ्यापणाची....
    जमीन जशी आग ओकती झाली ....
    झाडांच्या ऊंच फांद्यावर पक्षांची घरटी.....
    रखरख ऊन्ळ्या तुझ्या या कालाची ....
    तुझ्यामुळे दोन शाब्दीक आठवणी.... शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
आला आला उन्हाळा..

#आलाआलाउन्हाळा

चला तर मग लिहूया.

Nikesh Bharane

खिडकी आडून... #खिडकी #आडून #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #QuotesOfNikesh #उन्हाळा

read more
उन्हाळ्याचे दिवस होते,
दुपारला बंद खोली मध्ये बसलो होतो मी.
खोलीत सारा अंधार होतं,
दरवाजे,खिडकी सर्व बंद होते.
पंख्याच्या हवेने टेबलवरील फाईल चे पाने उडत होती,
खिडकी मधून प्रकाशाची बारीक किरण आत येत होती.
मी उठलो,
खिडकी जवळ गेलो.
खिडकी उघडून त्याच्या आड बघितले,
मैदानात लहान मुले खेळत होते.
मी एक क्षण मैदानातील मुलानं कडे बघितले 
आणि एक क्षण टेबल वरील फाईल कडे,
जाणवलं त्या खिडकी आडून मला माझ्या बालापणाने बघितले,
आयुष्यातून दूर गेलेल्या त्या उन्हाळ्याच्या सुट्टीने बघितले.... 
खिडकी आडून...
#खिडकी #आडून
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
#quotesofnikesh  #उन्हाळा

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile