Nojoto: Largest Storytelling Platform

Best कोणी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best कोणी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutन्यूट्रॉन का शोध कोणी लावला, महानिर्वाण या नाटकात कोणी हिरवट, सृष्टीची रचना कोणी केली, कोणी आहे, विजेचा शोध कोणी लावला वीडियो,

  • 35 Followers
  • 93 Stories

Shankar Kamble

गझल...

जाणत्या नेणत्या पणाचे हिशोब सारे राहून गेले
बंद मुठीतून ओघळणारे क्षण अत्तरी वाहून गेले

गुदमरलेल्या श्वासांनाही उसने थोडे श्वास मिळाले
डोकावून मग झरोक्यातूनी उनं बोचरे पाहून गेले

जगण्यासाठी धडपड करते धडावेगळे शीर अजूनी
नाळ गुंतली पाझर ओला किती उन्हाळे नाहून गेले

गर्द हिरवी झुकलेली नाजूक डहाळी आंब्याची
नवलाईचा मोहर गळता रूपं दर्पणी दावून गेले

रुळलेली ती वाट आजही रोज चालतो निगुतीने
शोध नव्या वाटांचा घेता वाटं पुरती लावून गेले

शांतीचा मी पाईक आहे साक्ष देतो वधस्तंभ हा
खबरदार जर खरे बोलशील जल्लाद सारे धावून गेले

कशांस नुसती उठाठेव ही? सूर्य अस्तास कधीच गेला
एक खुळी पण आस पेरली गीत पहाटे गावून गेले

©Shankar Kamble #MerryChristmas #गझल #मराठीप्रेम #जीवन #सुख #झुंज #लढा #कोणी #सत्य

Shru-Bhore

read more
भिजु नको म्हणुन सांगणारे त्याला आता कोणी ना राहिले , अाज पडत्या पाऊसात मी पाऊसाला पाहिले ; चिंब करण्यास त्यास धरतीही पुरली नाही ,कारण विचरल्यावर म्हणाला माझ्या हक्काची छत्री डोईवर नाही; त्याला धरतीने विचारले तुला भिजायची काय गरज आहे , तोही हसुन म्हणाला चालायचचं पाऊसाळा दिवस आहे ; भिजण अती झाल्यावर देहात थंडी भरली सहन न झाल्याने त्याने आडोशाला दडी मारली ;कसे कोण जाणे आले तिथे कोणी ,प्रेमाच रागवण ऐकल्यावर पाऊसाचेही हसे झाले; चिंब भिजला पाऊस तेथुन निघुनी गेला , जड अंतकरणासह मन मात्र कोरडेच ठेऊन गेला  .

Dilip Jain

------- अनोखे गेट टुगेदर --------- लेखक--- C.R. . दिलीप जैन मो नं 9923101041 ***************************************** आज रविश एलीफेंटा ला आला होता, सोबत त्यांचा काॅलेज च्या मित्रांचा ग्रुप होता, आता

read more
------- अनोखे गेट टुगेदर ---------

लेखक--- C.R. . दिलीप जैन 
मो नं 9923101041

*****************************************
आज रविश एलीफेंटा ला आला होता, सोबत
त्यांचा काॅलेज च्या मित्रांचा ग्रुप होता, आता

Manish Kanade

आता सगळ्यांनाच ठाऊक आहे
महागडा टिव्ही बंद असतो दिवसभर 
सुंदर फर्निचर, नसतं कोणी त्यावर 
सगळे पाहुणे,  स्मार्ट झालेत 
मी नको तुझ्याकडे आणि तू नको माझ्याकडे 
सगळ्यांनाच ठाऊक आहे...

मायेची नाती कोरडी होऊ लागली 
ऑनलाइन मैत्रिपुरात वाहू लागली 
डोळ्यातील अश्रू गालावरच सुकू लागले
टिपणार कोणी नाही ..... 
सगळ्यांनाच ठाऊक आहे

एकटेपणा घालवण्यासाठी आम्ही 
ट्रॅफिकमध्ये फिरतो 
अचानक एखादी गाडी आलीच समोर 
तर घट्ट हात धरून मागे ओढणारं कोणी नाही 
सगळ्यांनाच ठाऊक आहे

महागातला महाग पदार्थ आम्ही
ए सी रेस्टोरंट मध्ये बसून खातो
पण घराबाहेरील ओट्यावर बसून
आईने चारले.ला चिऊ काऊंचा घास 
गोष्टींपुरताच राहिला आहे...
हेही सगळ्यांनाच ठाऊक आहे

आता सगळ्यांनाच सगळं ठाऊक असतं
त्यामुळे कुठलीही गोष्ट उलगडणे
म्हणजे काय असतं
हे कुणालाच ठाऊक नाही....
                - मनिष ज्ञानदेव कानडे #संभ्रम#

Shubhada

read more
कोणी सूर्य विकतो 
अपेक्षांच्या शिधेसाठी 
कोणी मर्म गहाण ठेवतो 
विश्वासाच्या ओसरीसाठी 
शोधत फिरतो वणवण 
कोणी अनुभवांची शिदोरी 
कासावीस होत जातो  
क्षणभर इथल्या जगण्यासाठी

शुभदा

राकेश डाफळे...

*पाऊस मात्र पडत होता..* ओढ लागली होती पावसाची, सर्वजण वाट पाहत होते आतुरतेने... एकदा तरी बरसना, अशी विनवणी करत होते... माय अनवाणी फिरत होती पाण्यासाठी, शेतकरी राजा तडफडत होता... अचानक आभाळ भरून आलं,

read more

Mrunali Parkar

पुस्तकांसारखे खरे मित्र तुम्हाला कुठेच सापडणार नाहीत.. 🙏

read more
खूप वेदना होत असतील ना  तुला?... कोणी आता जास्त स्पर्श करत नाही  म्हणून 😟कित्येक पंडित घडले तुझ्यामुळे... आता वाली नाही कोणी राहिले... फोल्लोवेर्स  कमी झाले ना तुझे?... ते  तर आता फेसबुक वर ... इन्स्टा वर  विखुरले गेले.. पुस्तकांसारखे खरे मित्र तुम्हाला कुठेच सापडणार नाहीत.. 🙏

swapnil sarode

read more
जखम तर प्रत्येकाकडे 
असतात
फरक फक्त एवढाच
कोणी त्या शिवून घेतल्या 
तर कोणी लिहून
💘

Vikas Sarwade

read more
माणूस  लहानाचा मोठा होत असताना आजूबाजूचा समाज, तेथील वातावरण त्याच्यावर अप्रत्यक्षपणे काही संस्कार करत असतात आणि त्यावरुन तो जगण्याचे काही नियम बनवतो.त्याच्या त्या नियमात जर कोणी बसत नसेल तर तो नाती तोडत जातो. त्याच्या विचारांच जर त्याला कोणी भेटल तर तो स्थिरावतो. एखाद्याची मानसिकता बदलणे सोप्पी गोष्ट नसते✍

Priya Tambde

nandudi

read more
2 Years of Nojoto वाटलंच नव्हतं ग कधी
कोणी माझ्यावर सुद्धा कविता करेल ...!
कवितेची सुरुवात मलाच बनवून
जीवापाड प्रेम करेल .....!!!

वाटलंच नव्हतं ग कधी
एक अनोळखी ओळखीची होऊन जाईल...!!
ती एक छोटीशी ओळख 
नवीन नात निर्माण करून जाईल....!!!

वाटलंच नव्हतं ग कधी 
मला हवं नको ते न बोलताच समजून जाईल...!
माझ्यापेक्षा लहान असूनसुद्धा 
आई सारखी काळजी घेईल......!!

वाटलंच नव्हतं ग कधी 
कोणी माझ्या सोबत न राहता
नेहमी माझीच बाजू घेईल....!!
तिच्या सततच्या रागवण्यात पण
प्रेम दिसून येईल........!!!!
           तुझीच प्रिता  nandudi
loader
Home
Explore
Events
Notification
Profile