Nojoto: Largest Storytelling Platform

Best तुझ्यामुळे Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best तुझ्यामुळे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutतुझ्यामुळे झाली राणी माझ्या, तुझ्यामुळे माझ्या नशिबाचा वडापाव, तुझ्यामुळे झाली राणी, तुझ्यामुळे झाला राणी नशिबाचा वडापाव, तुझ्यामुळे झाला राणी,

  • 1 Followers
  • 1 Stories

Shankar kamble

*तुझ्यामुळे......* 
 *भावनांचे कैक पैलू* 
 *हळुवार उमगले तुझ्यामुळे* 
 *नात्यांमधली ओढ अनामिक* 
 *मनांस कळली तुझ्यामुळे* 

 *ऋणानुबंध हे शतजन्मीचे* 
 *जुळून आले तुझ्यामुळे* 
 *अंतरीचे दुवे सांधले* 
 *एक जाहले तुझ्यामुळे* 

 *उष्ण काहिली तप्त उन्हाची* 
 *होरपळ सरली तुझ्यामुळे* 
 *तनां-मनांला सुखावणारी* 
 *झुळूक लाभली तुझ्यामुळे* 

 *दाटला अंधार सभोवती* 
 *वाट गवसली तुझ्यामुळे* 
 *दीपस्तंभ तू जीवनातला* 
 *नाव किनारी तुझ्यामुळे*

 *ओंजळीतले किती उसासे* 
 *गीत जाहले तुझ्यामुळे* 
 *हरवले ते पुन्हा गवसले* 
 *सूर निरागस तुझ्यामुळे* 

 *काजव्याचे मंद चमकणे* 
 *दैव लाभले तुझ्यामुळे* 
 *उत्तुंग भरारी पंख पसरले* 
 *गगन ठेंगणे तुझ्यामुळे*

©Shankar kamble #ValentineDay #Valentine #प्रेम #तू #तुझ्यामुळे #तुझ्यासाठी 

#roseday

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile