Find the Best माझं Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutहोऊदे तुझ न माझं लगीन, साधं माझं रूप song, इतका चुकलं ना माझं, पाहिलं तुला मन माझं उरलं, काळीज माझं तू,
शब्दवेडा किशोर
#माझं एक आयुष्यातलं अर्धवट राहिलेलं पत्र....!!! माझं एक आयुष्यातलं अर्धवट राहीलेलं पत्र..पोहचेल का कधी तुमच्यापर्यंत ??.. किती सहजपणे भुतकाळरूपी नदी प्रवाहात वाहुन गेलेल्या काळात रमण्याची शक्ती आपल्याला देवानं दिली आहे नं..?? त्याच जुन्या आठवणीत पुन्हा पुन्हा आपण जगतो,रडतो,हसतो अन् नव्याने जगत असतो.... पण त्यावेळी जिवंत असतो का आपण....? मुळात जगणं अन् जिवंत असणं ह्यातला फरक ओळखायच्या भानगडीतच पडत नसतो...बस चाललेय नं तर चालू द्या.. याच विचारात आपण बरेचदा आयुष्य जगणं कायम ठेवत असतो..पण नाही हं.. मी जगताना तर फक्त मी गमावलेल्या माझ्या सर्व माणसांच्या आठवणीत जिवंत होतो. मग मी मला आयुष्यात जगण्यासाठीचे बाकीचे क्षण वाया गेले असं समजु का..??? तेच क्षण पुन्हा कधीतरी डोळे मिटण्याआधी एकदा तरी दिसतील का ??.. भेटतील का ??..बोलतील का ??.. ह्या अन् अशा कित्येक प्रश्नचिन्हासोबत रडत कन्हत काढलेल्या आयुष्याचं मी काय आणि कसं गणित मांडायचं...?? खूप काही राहुन गेलंय.. माझं माझ्या त्या खास असलेल्या सगळ्याच लोकांशी बोलणं.. माझी कुणाशी तरी ती अल्लड बालिश मस्ती अन् कुणावर असंच रुसणं रागवणं.. हजार चेहऱ्यातुन कुणा एकालाच माझ्या अस्तित्वाच्या आरशात बघणं अन् ते माझं असं बघताना चारचौघात अडखळणं.. सगळंच तर राहुन गेलंय ना..?? मला असं वाटतंय की बहुतेक खरंच जिवंतपणी माझं जगणंच राहुन गेलंय.... पण आता ना ती लोकं आहेत...ना तो त्यांच्या बरोबरचा घालवलेला बरा वाईट काळ.... जन्माला येताना रित्या हाताने आलो अन् आता आयुष्याचा अस्त होत असताना सुद्धा मी रित्या ओंजळीनेच जातोय.... खंत मनी हीच राहील... माझं एक आयुष्यातलं अर्धवट राहिलेलं पत्र.. पोहोचेल का कधी तुमच्यापर्यंत..?? @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #माझं_आयुष्य
Kunal Salve
स्वप्नांत माझ्या येणं जाणं बंद करशील का ? कधीतरी शब्दांना खरंखुरं ओठी आणशील का ? मी काय रोजच प्रश्न मांडायचे सांग मनात साऱ्या प्रश्नांचे उत्तर "हो मी तुझीच" आता तरी देशील का ? #सत्य #स्वप्न #माझं #तुझं
Ekta Gour
तु नसताना तुझ्या, शिवाय काहीच दिसेनां, एक पन दिवस, तुझ्या शिवाय नाही रमेनां, लेखकानों💕 नवरा बायको किंवा प्रेयसी आणि प्रियकर यांचं नातं हे असं खेळकर असतं.क्षणात अबोला तर क्षणात गोडवा.असे हे छोटे छोटे क्षण आयुष्याला खऱ्या अर्थाने परिपूर्ण बनवतात.चला तर मग,आज आपल्या जोडीदाराला एक काव्यांजली अर्पण करूया,थोडीशी खट्याळ थोडीशी खुसखुशीत. आजचा विषय हाच आहे तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना... #तुझंमाझं #तुझं #माझं #collab #yqtaai #marathiquotes #marathikavita #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
लेखकानों💕 नवरा बायको किंवा प्रेयसी आणि प्रियकर यांचं नातं हे असं खेळकर असतं.क्षणात अबोला तर क्षणात गोडवा.असे हे छोटे छोटे क्षण आयुष्याला खऱ्या अर्थाने परिपूर्ण बनवतात.चला तर मग,आज आपल्या जोडीदाराला एक काव्यांजली अर्पण करूया,थोडीशी खट्याळ थोडीशी खुसखुशीत. आजचा विषय हाच आहे तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना... #तुझंमाझं #तुझं #माझं #Collab #yqtaai #marathiquotes #MarathiKavita #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read moreAbhishek Panchal
खरं सांगायचं तर , माहितेय मला तुझं माझं नाही जमत पण तुझ्यापासून दूर जाऊन , मलाही नाही करमत पूर्ण कविता खाली दिलेली आहे तू ऐकत नाही माझं , तुझंच खरं करते आगाऊ बोलते तू आणि मला शब्दात धरते भोळा भाबडा मी , तुझं सारं ऐकून घेतो राग गिळून माझा , मग तुला माफ करतो तर मग , मी तुझ्यावर रागावत नाही म्हणून सुरू होतेस तू
तू ऐकत नाही माझं , तुझंच खरं करते आगाऊ बोलते तू आणि मला शब्दात धरते भोळा भाबडा मी , तुझं सारं ऐकून घेतो राग गिळून माझा , मग तुला माफ करतो तर मग , मी तुझ्यावर रागावत नाही म्हणून सुरू होतेस तू
read moreShankar Kamble
*चांद पेरला नभात* *भार दाटे नक्षत्रांचा* *कूस बदलते रात* *डोळा श्राप जागण्याचा..* *कळी अबोल खुलेना* *काया सतेज सुकली* *वेडी आसं घोंगावते* *वाटं नजर एकली..* *काय शोधते नजर?* *दूर दूर या वाटंला* *नाही अजून सांगावा* *खिन्न पारवा भेटला..* *शुभ्र चांदणं तळ्यात* *बिंब तुझे उमटले* *क्षण थबकले तिथे* *सर मोती निसटले..* *दारी तोरण आशेचे* *कधीपासून सजले* *ओली हळद माखली* *डोळे पाण्याने भिजले..* *सूर सनई दाटला* *आता झाले मी परकी* *नको बोलं लावू मला* *लाज काकणां सारखी..* ©Shankar Kamble #विरह #भेट #प्रेम #व्याकूळ #जीव #माझं प्रेम #विरही_जीवन… #Rose
manoj_commando4747
#माझं social media आयुष्य माझी फेसबुक ला साडे चार हजाराची फ्रेंडलिस्ट आहे. माझ्या फेसबुक पोस्टला 300 लाईक येतात. माझ्या पोस्टला 50 कमेंट येतात. 500 whatsapp contact आहेत. स्टेटस 300 हुन जास्त लोक पाहतात. 50 पेक्षा जास्त react करतात . इंस्टा ला 500 फोल्लोवेर आहेत , पाच हजार फ्रेंड नको. पाचच असावेत. चौघं खांदा देणारे, एक डोळे पुसत फुलं टाकणारा. कधी गरजेला निम्म्या रात्री दार वाजवलं, तरी पोटभर जेवू घालणारी. कशाला 500 whatsapp contact ? मोजकेच फ्रेंड असावेत, पण तुझ्या आधी मी मरतो असा हट्ट धरणारे असावे. शेकडो लाईकचा ,आणि रेऍक्ट चा आजिबात उपयोग नसतो. एकच लाईक मिळावी,आणि गरजेला react होणारा एकच असावा, आयुष्यभर निर्मळ मनानं लाईक आणि react करणारी. लाइक नको, कमेंट नको, react नको. विनंती फक्त एकच आहे, नको नुसता दिखावा , तर खरीखुरी साथ असुद्या , जशी तुमची असेल त्याहून जास्त माझ्याकडून असेल👍 manoj_commando4747 #IndianArmy #loveindianarmy Prajwal Bhalerao Pravin kadam
#IndianArmy #loveindianarmy Prajwal Bhalerao Pravin kadam
read moreSavidhan Kamble
छोट्याश्या रोपट्यासारखी, डुलडुल डोलणाऱ्या फुलासारखी, इंद्रधनुश्यातली सप्तरंग सारखी, शांत नदीसारखी हसणारी,खळखळणाऱ्या झारीसारखी वाहणारी, भिरभिर डोळ्यांनी माझी वाट बघणारी, मी गर्दीत दिसेनासा झाल्यावर कावरीबावरी होऊन मला शोधणारी, अशीच आहे ती, काळजी घे म्हणून स्वतः च पावसात भिजणारी, कविता नाही समजली तरी व्वा खूप छान बोलणारी माझ्या आठवणी जीवापाड जपणारी, स्वज्वळ,गोड,प्रेमाच्या छायेत विसावा देणारी मला पूर्ण करणारी, ती अशीच आहे...!! #माझं पागल पिल्लू #Savinam
prakash maroti totewad
सखे.. पुसटल्या आहेत त्या पाऊल खुणा ज्यांनी आयुष्यभर काळजात घर केलं होतं... होय सखे त्याच पाऊलखुणा ज्यांनी उध्वस्त केलं माझं आयुष्य.. माझं जीवन.. माझं जगणं... क्षणात. सखे.. तुझे तेच पाऊल तुझी तीच खुण पुसटशी जरी लागते चाहूल.. काळीज धस्स.. करतंय. मी ठेवलंय स्वतःला बंदिस्त साखळदंडात जखडून.. पण तरीही अंतर्मनातील गाभाऱ्यात पुन्हा शोधतो मी तुझ्या जपलेल्या पाऊलखुणा... होय तुझ्याच पाऊलखुणा... ( आशाई ) प्रकाश तोटेवाड पंढरपूर पाऊलखुणा
पाऊलखुणा
read moreमनातले बोल...
तु सोबत असताना मन माझ कमालीचा खूष होत, तुझ्याबरोबर घालवलेल्या प्रत्येक क्षणाला पुन्हांदाआठवत.. मन माझ, आठवत तुला असतं आवाज तुझा ऐकायला मिळावा , म्हणून वेड ते माझ्याबरोबर भांडत .. नेहमी तुझ्या बरोबर राहाव म्हणून ते हट्टाला पेटतं, तू भेटल्यावर मात्र खुदकन हसतं.. स्पर्श तुझा होताच मनीमन लाजतं, असाच स्पर्श तुझा नेहमी मिळावा अशी मागणी माझ्याकडं ते करतं.. तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दांनी मन माझं विरघळलत, तुझे बोलणे ऐकून मन माझं वेड्या सारखं नाचत.. मध्येच शांत होऊन मलाच प्रश्न विचारत, माझ उत्तर न मिळताच उगीच ते एकटं एकटं रडत.. -sayali... #poetry
🖋️रत्नदीप मोहिते
राणी जशी तुझ्या प्रेमाची चटक लागली होती ना कधीकाळी तशीच किव्हा त्याहून जास्त चटक लागलेय मला आता लिहिण्याची.. कधीकधी वाटतं जे राहून गेलंय बोलायचं बरंच काही ते सगळं एखाद्या अत्तर मारलेल्या तुझ्यासारख्याच शुभ्र कागदावर लिहून मोकळं व्हावं.. एखादं पत्र धाडावं अनपेक्षित असं.. पण तुला ना वाचण्याची आवड ना माझं ऐकण्याची सवड तू करून मोकळी झालीस आयुष्याच्या साथीदाराची निवड.. माझं मी स्वतःशीच बोलत राहीन वेड्यासारखं.. असेल कुठेतरी कोणीतरी माझं लिखाण वाचून मला समजणारं कदाचित... #chatak #tu #likhan #lekhak #marathiqoutes #rapgeek_ratnadeep #marathikavi #kavita