Nojoto: Largest Storytelling Platform

Best अलक Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best अलक Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutअलक्षित का अर्थ है, अलकापुरी का समानार्थी है, अलकनंदा क्या है, अलकापुरी कहां है, अलक्षित का अर्थ हिंदी में,

  • 7 Followers
  • 43 Stories

dhanashri kaje

#अलक

read more

dhanashri kaje

#अलक

read more
अलक -तिचे अस्तित्व
ती भयानक रात्र तिच्या आज ही लक्षात होती. ती रात्र वैऱ्याची रात्र होती. एक भयानक रस्ता. त्यात मुसळधार पाऊस आणि विजांचा कडकडाट. त्या पावसामध्ये तिचे अस्तित्व. ती.… "एक पिशाचीनी"

©dhanashri kaje #अलक

dhanashri kaje

राधिका च नुकतच लग्न झालं होतं तिला सासर देखील मनासारखं मिळालं होत. पण म्हणतात न नव्याने फक्त नऊ दिवसच असतात अगदी तसच तिच्या ही आयुष्यात झालं तिच्या स्वप्नातल्या घराचे फक्त नऊ दिवसच चांगले ठरले त्या नंतर हळू हळू त्यांचं खर रूप समोर येऊ लागलं अगदी राधिकाच्या नवऱ्याने देखील आपल खर रूप दाखवायला सुरुवात केली. तिला सगळे हुंड्या साठी त्रास देऊ लागले पण राधिका शिकलेली होती त्यामुळे तिला सगळ माहीत होत तिने ठरवल आता सहन करायचं नाही तर प्रतिकार करायचा ती तडक उठली पोलिसांकडे गेली आणि सगळ सांगितल पोलीस त्यांना घेऊन गेले आपल्या आत्मविश्वासाने तिने प्रतिकार केला होता  #paidstory #अलक

dhanashri kaje

आज गणू खूप उदास होता. त्याला शाळेत जावस वाटत नव्हतं माहीत नाही का पण त्याला कुठला तरी खूप त्रास होत होता ही गोष्ट त्याच्या आईने बऱ्याचदा नोटीस केली होती. पण तिचा समज होता की गणू ला तर सुट्टी मारायची सवयच आहे पण अस नव्हत तो कधी ही शाळेचं नाव काढलं की बहाने शोधायला सुरुवात करायचा एक दिवस गणू शाळेत गेला होता आणि असच त्याचा मित्र विराज दोघ गप्पा मारत बसलेले असताना अचानक विराजने त्याला विचारलं तु आजकाल शाळेत का येत नाहीस तेव्हा त्याला गणू सांगतो. राजीव सर वाईट आहेत ते मला चुकीचा स्पर्श करतात हे ऐकून आईला आणि शाळेला धक्का बसतो  #paidstory #अलक

dhanashri kaje

विशाल एक चुणचुणीत हुशार मेहनती मुलगा होता.
अभ्यासात नेहमी पहिला यायचा पण एक दिवस त्याच्या आई वडिलांना त्याची शाळा बदलावी लागली तस तो कुणाशी ही पटकन मैत्री करत असे त्यामुळे यावेळी ही त्याला ऍडजस्ट व्हायला वेळ लागला नाही आणि नवीन शाळेत ही त्याचे बरेच मित्र बनले पण यामुळे त्याच अभ्यासाच मात्र नुकसान झालं आणि केवळ चुकीच्या संगतीमुळे तो चक्क फेल झाला  #paidstory #अलक

dhanashri kaje

स्वप्नीलला मंजरीची खूप भीती वाटायची. इतरांसारखच त्याचाही समज होता मांजर आडवी गेली की काम होत नाही. आणि चुकून एखाद्या वेळी जर अस झालं तर मात्र तो सगळा दोष बिचाऱ्या मांजरीला द्यायचा पण एक दिवस अस झालं की तिचं मांजर आडवी गेली आणि स्वप्नील चा जीव वाचला आणि त्याची कायम स्वरुपी भीती गेली. यालाच म्हणतात. ' मांजर आडवी जाणे' निव्वळ अंधश्रद्धा आहे

  #paidstory #अलक

dhanashri kaje

शंतनु (अलक)
तो खूप मेहनती मुलगा होता. त्याला आपल्या आयुष्यात खूप काही करायचं होत. आणि त्यांनी ते करून देखील दाखवल आपल्या आई बाबांचा तो हरहुन्नरी मुलगा होता. त्याच्या आई वडीलांना त्याचा अभिमान होता. पण एक दिवस अशी काही कोरोनाची लाट पसरली ज्यात त्याची सगळी स्वप्न वाहून गेली आणि त्याच्या वर बेरोजगारीची वेळ आली  #paidstory #अलक

dhanashri kaje

अलक: 2 (अनाथ)
तो एकटाच आपल्या इवल्याश्या हातात एक तुटकी फुटकी गाडी घेऊन भेदरलेल्या नजरेने आपल्याच आई बाबांच्या शवाकडे एकटक बघत उभा होता. त्याला काय माहीत होत एक दिवस आपण अनाथ म्हणून जगणार आहोत आयुष्यभरासाठी...  #paidstory #अलक

dhanashri kaje

आज आकृती आणि विराज खूप खुश होते. कारण त्यांना खूप गोड मुलगा झाला होता त्याला पाहून त्यांचा जस काही आनंद गगनात मावत नव्हता. त्यांनी तर त्याच नाव सुद्धा ठेवल होत 'आविर' आणि एक दिवस त्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला जेव्हा त्यांना समजल तो 'तो नाही ती' आहे आविर नाही अवनी आहे.  #paidstory #अलक

dhanashri kaje

अलक(परिचय)
'अलक' एक असा प्रकार ज्यातून कमीत कमी शब्दात पण मनाला भिडणारा विषय आपण लोकांपर्यंत पोचवू शकतो. आज पर्यंत अलक बद्दल वाचून होते ऐकून होते एकदा तसा लिहीण्याचा प्रयत्न देखील करून पाहिला आता परत तश्याच छोट्या स्वरूपातल्या कथा घेऊन येत आहे. नव्याने नीट सुरवात करायला बघा आवडतात का.
  #paidstory #अलक
loader
Home
Explore
Events
Notification
Profile