Nojoto: Largest Storytelling Platform

Best तूच Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best तूच Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutतूच दुर्गा तू भवानी, तूच माझी आई देवा lyrics, तूच गजानन तूच साई lyrics, तूच माझी पिल्लू रानी, तुझ सुखकर्ता तूच दुखहर्ता,

  • 30 Followers
  • 93 Stories

Kunal Salve

तूच          माझी                         आस 
हृदयात     तूच माझ्या                  पास
वेडी         स्पंदनेही तुझीच           खास
बावरी       होऊनि,छळती तुझेच     भास ! #तूच #हृदयात#वेडी #बावरी

yogesh atmaram ambawale

जीवनात एक दिवस असा ही यावा,
चेहरा माझा तुझ्या कुशीत असावा.
सर्वत्र घोर अंधार असतानाही,
नजरेस मात्र चेहरा तुझाच दिसावा. #तुझा_चेहरा#तूच#एक_दिवस#yqtai#yqdidi#yqmarathi#

Vin's Bansode

#तूच आहे

read more

Geeta Darakhe❣️

read more
कामाला कामाची गरज नको                 😌पुरावा माणुसकीचा
माणुसकीला स्वार्थाची ओढ नको
जग वेळया थोडं बेभान होऊन
माणुसकीला थोडं हृदयात ठेऊन
   
                       निस्वार्थ तू कधी होऊन तर बघ
                         आनंद त्या क्षणाचा घेऊन तर बघ
                      जग कधीतरी त्या खारुताई सारखा
                     सोड स्वार्थ तू त्या पछाडलेल्या प्राण्यासारखा

माणुसकीला तुझ्या कधी नको देऊ दुरावा
माणूस म्हणून जगतोय याचा कधी तर दे पुरावा
सूर तुझ्या जीवनाचा तूच पकडू शकतोस
माणुसकीला माणसाच्या तूच ओळखू शकतोस
स्वार्थ तुझ्या जीवनातला तूच टाळू शकतोस…❣️geet❣️

Siddhi Rahate

read more
रूप असे तुझे चंडिका, अन तूच तू भवानी
होऊन महिषासुरमर्दिनी ये तू आज धावूनी

व्याकुळले मन माझे, तुला साद घालते आई 
तुझ्याविना माझा, आता कोणी कैवारी नाही

विनाश करत असे अपार वाढती दुष्कर्म तयाचे
क्रोधाच्या उठती ज्वाला अन धगधग मनात साचे

तुला पदर पसरते आई जाणून माझी तू भक्ती घे
नाश करण्या राक्षसाचा मला तूच आता शक्ती दे

-Siddhi Rahate

Swati Mahendra Jadhav

माझी आई नक्की वाचा डोळ्यात पाणी येईल

read more
चार दिसाची पाहुनी म्हनून आलीस माझ्या घरी 
बघता तुजला डोळा टचकन पाणी माझ्या भरी
 तूच का ती दिसली नाही तर जीव कासावीस होई
 रूप तुझे आठवते अजूनही ही का नाही मनात आनंदले तुला पाहून 
दुःख वाटे तुझा चेहरा मी पाहते मनात माझ्या कालवाकालव होते तू कुठे गेलीस की वाट तुझी मी पाहात होते
 तुझ्याशिवाय कुठेच मी कधीच राहात नव्हते 
पण एक दिवस असा आला तुला सोडून जावे लागले 
तुझ्या डोळ्यातील काळजी आणि अश्रू मी पाहिले 
आज जेव्हा तू घरी माझ्या आलीस
 कीती दमलीस अन् किती थकलीस
 तेज तुझ्या चेहऱ्यावरचे उडून गेले कुठे 
शोधत होते तुझ्या चेहऱ्यावरचे ते भाव जुने
 शाळेतून मी येत होते जेव्हा
 तू समोर दिसलीस की मनात आनंद वाटे तेव्हा 
तुझ्या ताटातला घास ठेवीत होतीस तू 
आठवते मजला आज हि असे कुणीच करत  नाही आता
 पण तू इतकी थकालीस पाहून मन माझे आतून रडते 
 वाटते मजला जुने ते दिवस परत यावे 
तुला बिलगुनी सारे सुख घ्यावे
एक दिवस तू म्हणालीस तुझ्या घरी कधी आलो तर पोह्याचा घास तरी करशील का 
तुझे बोलणे माझे हसणे यावे परत दिवस ते 
काय दिसत होतीस टवटवीत अन् गोजिरवाणी 
आज मग तू अशी का आजारी तीच तू ग सुंदर अन् माझी खरी तुझे भाव मजला सारे कळत होते तुझ्या चेहऱ्यावरचे सारे हसू खोटे चार दिवस आलीस तू माझ्या घरी पाहूनी  
गेलीस माझ्या मनी चुटका देऊनी
पण जन्मोजन्मी तूच मिळावी तुझ्याच उदरी मी जन्म घ्यावा
अन् तू सदैव अशीच राहावी माझ्यासाठी माझी आई...........
(कवीयत्री : स्वाती महेंद्र जाधव)
          🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 माझी आई नक्की वाचा डोळ्यात पाणी येईल

Akshay N

प्रिय वही,
आजकलच्या जीवनात तूच एक साथी
माझ्या मनातील भावना फक्त तुझ्याच हाती;

तूच माझी प्रिय नि तूच माझी प्रियसी
माझे साठवलेले शब्द फक्त तुझ्याच पाशी;
जशी ठेवतो तशी तू राहते,
डोळ्यातील पानी कागदात वाहते"!!
साध भोळ मन फक्त तुलाच कळत,
म्हणून माझ मन तुझ्या कळे वळत!! #मनातीलभावना

शब्द शृंगार 9359164650

love

read more
मनातल कधी तरी तुझ्या गुलाबी ओठांवर यावं आयुष्याची सरणारी प्रत्येक संध्याकाळ तुझ्या सहवासात सरावी अन् रोजच्या दिवसाची सुरवात तुझा मनमोहक तेजस्वी चेहरा पाहून व्हावी.... तुझ्यासोबत तासन तास गप्पा माराव्यात अन् अलगद तुझ्या खांद्यावर डोक ठेवून अलवार तुझ्या कुशीत शिरावं.... मंद अश्या एखाद्या संध्याकाळी समुद्र किनारी तुझ्या कमरेभोवती हातात हात गुंफून बसावं अन् त्या लाटांना पाहत तुझ्या मोकळ्या कुरळ्या केसात मी भान विसरून गुंतून जावं.... त्या बेभान धडकणार्या किनार्यापासून लाटांना दूर जाताना होणाऱ्या वेदना तू बघाव्यात पण चुकून कधी त्या विरहदायक वेदना तु मला देऊस नकोस हे मी प्रत्येक श्वासातून तुला सांगावं कारण तूच माझा श्वास तूच माझा आत्मा तूच माझं सर्वस्व तूच माझं आस्तित्व तुझ्याविना माझं आयुष्य म्हणजे फक्त आणि फक्त शुन्य.... love

Vikas Jagtap

मेनका ❤️

read more
तूच माझी मेनका, तूच माझी रंभा...
तुझ्यातच गुंतला आहे , माझ्या जीवनाचा खोळंबा..
असतील कितीही संकटे , नको करू तू कशाचीही चिंता..
 तुझी स्वप्ने पूर्ण करणे , हाच माझ्या जीवनाचा अजिंठा..
                                (लेखक- विकास जगताप) मेनका ❤️

Prakash Gore ( Raj )

Raj .....

read more
तूच मला मोडणार
पुन्हा तूच जोडणार
जरा काय दूर गेलो 
तूच जवळ ओढणार .            राज .... Raj .....
loader
Home
Explore
Events
Notification
Profile