Find the Best निसर्गप्रेमी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
DRx. Shital Gujar✍️
भाषेचे ज्ञान असे की सकाळची सोनेरी किरणे जसे| गुरुजी तुमच्या बोलण्यातून शब्दकोशात शब्द वेचते जसे || शिक्षणाचा सरितेला शुद्ध निर्मळ झरे वाहती| विद्यार्थ्यांच्या दिशादर्शनासाठी प्रयत्नांची नेहमी बळकट दोरी हाती|| निसर्गावर प्रेम करायला शिकवले | वृक्षांची तुम्ही आम्हाला बोलायला शिकवले || वाचनाची गोडी रुजवण्यासाठी अथक प्रयत्न | विविध उपक्रम राबवून बनले तुमचे विद्यार्थी रत्न|| एक आदर्श शिक्षक , कलावंत, गुरुजी तुम्ही लाभले | शिकवण्याची कला आणि अनेक कला अंगी तुम्ही जोपासले || मराठी कवितेतून आम्हाला शिकवले माणुसकीचे धडे| गुरुजी तुमच्या प्रयत्नातून भविष्य घडे || तुम्ही आमचे मायबाप शिक्षक बनले | कर्म असे तुमचे आदर्श व्यक्तिमत्व बनले || शब्दांचा साठा माझ्याकडे ओंजळभर | तुमच्या कर्तुत्वाला मापता येणार नाही सर|| - ✍️शितल गुर्जर✍️ 💐वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा आदरणीय संतोष पाटील गुरूजी💐 आमचे आदरणीय जीवन सुंदर उमलताना विद्यार्थ्यांसाठी नेहमी सावली म्हणून आम्हाला नेहमी मार्गदर्शन करतात गुरुजी तुमचा प्रत्येक शब्द उत्साहपूर्ण असतो. विद्यार्थ्यांच्या वाचनाची आवड निर्माण करून त्यातून आकलन किती झाले ,हे देखील जाणून घेता. गुरुजी जे बोलतात ते कृतीमध्ये देखील आणून दाखवतात. तुम्ही आम्हाला निसर्गावर प्रेम करायला शिकवले . ते ह्या कठीण काळात आम्हाला ते कळले.माग जो व्यक्ती निसर्गप्रेमी असतो त्या कठीण काळात त्याला कसलीही कमी भासत नाही हे सिद्ध झाले . तुम्हाला आई जिजामाता उदंड आयुष्य दे
आमचे आदरणीय जीवन सुंदर उमलताना विद्यार्थ्यांसाठी नेहमी सावली म्हणून आम्हाला नेहमी मार्गदर्शन करतात गुरुजी तुमचा प्रत्येक शब्द उत्साहपूर्ण असतो. विद्यार्थ्यांच्या वाचनाची आवड निर्माण करून त्यातून आकलन किती झाले ,हे देखील जाणून घेता. गुरुजी जे बोलतात ते कृतीमध्ये देखील आणून दाखवतात. तुम्ही आम्हाला निसर्गावर प्रेम करायला शिकवले . ते ह्या कठीण काळात आम्हाला ते कळले.माग जो व्यक्ती निसर्गप्रेमी असतो त्या कठीण काळात त्याला कसलीही कमी भासत नाही हे सिद्ध झाले . तुम्हाला आई जिजामाता उदंड आयुष्य दे
read moreShankar kamble
*पानगळ ही सरली* *नवा बहर तो आला* *पालवींची नक्षी ओली* *साज शृंगारून शेला* *तरुलतेवर पर्ण* *तेजदीप उजळले* *इंद्रधनु कुंचल्याचें* *सप्तरंग उधळले* *नवचैतन्याने सारी* *शहारून सृष्टी गेली* *थरथर जाणीवेची* *अंतराचे फुल वेली* **कात टाकते अवनी* *मखमली हिरवळ** *गजभार सुमनांचा** *दाटलांसें परिमळ** *मनां पालवी फुटली* *आशेचे कोंब रुजले* *नक्षत्रांच्या मांगल्याचे* *दारी तोरणं सजले* ©Shankar kamble #पानगळ #बहर #पालवी #सृष्टी #निसर्ग_सौंदर्य #निसर्गप्रेमी #झाडं #वेली
#पानगळ #बहर #पालवी #सृष्टी #निसर्ग_सौंदर्य #निसर्गप्रेमी #झाडं #वेली
read moreVinayak Mahajan
आपल्या पूर्वजांची आठवण म्हणून एक तरी झाड लावा... पक्ष्यांच्या आश्रया साठी एक तरी झाड लावा... निसर्गप्रती कृतज्ञ होऊन एक तरी झाड लावा... आरोग्यदायी वातावरणासाठी एक तरी झाड लावा... निसर्गाचे सौदर्य फुलवण्यासाठी एक तरी झाड लावा... पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी एक तरी झाड लावा... क्रांती विरांचे स्मरण,देश भक्तांचा अभिमान म्हणून एक तरी झाड लावा... विनायक महाजन📜🖋️ #झाडे_वाचवा #निसर्गप्रेमी
Vinayak Mahajan
आपल्या चुकांना पडद्याआड करून काळाला दोष देणार मनुष्य खरंच आपल्या अधोगतीला आमंत्रण देतोय,अस सर्वत्र दिसतंय... बेसुमार जंगलतोड करून वैराण वाळवंटे निर्माण झाल्यामुळे प्राणीही बेघर झालेली आपल्याला दिसतायेत... 2020मधे सर्व बाजूंनी संकटाचा वेढा घालून उभा असलेला काळ खरंच मानवाने केलेल्या चुकांची दुरुस्ती करण्याचा संदेश या ठिकाणी देताना दिसतोय... विनायक महाजन...📜🖋️ #निसर्गप्रेमी #मराठी
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited