Nojoto: Largest Storytelling Platform

Best काव्यरसिक Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best काव्यरसिक Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 1 Stories

omkar kapase

माझे सर्व शिक्षण झालेल्या भूमीचे मी काहीतरी देणे लागतो, त्या साठी हा कवितेचा अठ्ठास, #कविता #हिंदी #मराठीकविता #काव्यसंग्रह #काव्यरसिक

read more
कर्मवीर अण्णा तुम्ही परत या?
कसं सांगू तुम्हाला आजही गरज लागते प्रत्येक क्षणाला।
काळ्या ढेकळांचे रान श्रमसाधनेन फुलवलं।
'कमवा व शिका' योजनेन मन कसं कणखर बनवलं।।
कर्मवीर अण्णा,
बांधा-बंधावरचे पोरगं आता शिकू लागलय,धडपडल,उठलं,बसलं तरी "स्वावलंबी" शिक्षणाचे ब्रीद घेऊन बाहेर पडू लागलय।
म्हणुन,कर्मवीर अण्णा तुम्ही परत या?
कर्मवीर अण्णा,
तुमच्या एका बीजाने काय करामत केली सांगू।
त्या बीजाचा वटवृक्ष कसा बनला हे
तुमच्या समोर कसे मांडू।।
रयतेच्या मातीतून तयार झालेले नवरत्न अजूनही संस्था घडवतात।
पण त्यातीलच काही खडे संस्था बिघडवण्याचा प्रयत्न करतात।।
हे सर्व बघायला कर्मवीर अण्णा तुम्ही पायजे व्हता म्हणून,कर्मवीर अण्णा तुम्ही परत या?
चारमजली इमारत बांधून रयत शिक्षण संस्थेची बरोबरी करतात।
राजकारणाच्या नावाखाली स्वतःला शिक्षणसम्राट म्हणुन घेतात।।
म्हणुन,कर्मवीर अण्णा तुम्ही परत या?
रयत शिक्षण संस्थेची मुले Rural ,farmer family मधून belong करतात असे म्हणून,
तुमचेच बापे लाखोंच्या Donation च्या नावाखाली नवीन संस्था उभारतात।
म्हणुन,कर्मवीर अण्णा तुम्ही परत या?
कर्मवीर अण्णा,राजकारणाचे लोण संस्थेत पण पसरू लागलंय मतपेढी साठी संस्थेची ढाल करून पाहू लागलंय।
म्हणुन,कर्मवीर अण्णा तुम्ही परत या?
तुम्ही परत येऊन तरी काय करणार,
सत्तेसाठी हापापलेली माणसे तुम्हाला पक्षाचे तिकीट देऊन पाहणार।
अहो,कर्मवीर अण्णा 
सत्तेसाठी सावित्रीबाईंचे नाव अग्रण्य घेतलं जात,
परंतु स्वताःचे मंगळसूत्र विकणाऱ्या लक्ष्मीबाईंचे
नाव अंधारात ठेवलं जातं।।
म्हणुन,कर्मवीर अण्णा तुम्ही परत या?
कर्मवीर अण्णा तुमची दूरदृष्टी काय कमालीची हो!
स्ववलंबी शिक्षणाचे ब्रीद अजूनही उपयोगी पडते नाय का हो!
म्हणुन,कर्मवीर अण्णा तुम्ही परत या?
आमच्या देशात जाती-पतींचे राजकारण केलं जातं,
असे आपण बघतो।
परंतु, शिक्षणाच्या गंगेतून'जात-पात' नष्टं करणाऱ्या महामानवाला आपण सगळे जण विसरतो।।
म्हणुन,कर्मवीर अण्णा तुम्ही परत या?
:-ओंकार कापसे

कर्मवीर पुण्यतिथी ९मे २०१९ माझे सर्व शिक्षण झालेल्या भूमीचे मी काहीतरी देणे लागतो, त्या साठी हा कवितेचा अठ्ठास,
#कविता
#हिंदी
#मराठीकविता
#काव्यसंग्रह
#काव्यरसिक

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile