Find the Best माऊली Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutमाऊली meaning in marathi, समाधिस्थ होता ज्ञानेश्वर माऊली, विठू माऊली तू माऊली जगाची lyrics, माऊली समानार्थी शब्द, विठुमाऊली तू माऊली जगाची लिरिक्स,
Jaymala Bharkade
Beautiful Moon Night माऊली पहाट पहाटे बाईला ग कशी लगबगीची घाई गोठ्यात ग गाई तिची सोडूनी दावण करे सडा सारवण बिगीन त्या सड्याच ग अंगणी उभी तुळशी वृंदावन रांगोळी म्होरं सजली कसी बेल फुले पिंडीला वाहुनी वात दिव्याची उजळे तुळशी भोवती बाई घरच्या दिव्याची पणती राबे बाप लेकरा साठी आप्तजणां ना मायेने जपे नांदे घरासाठी रातंदिन सुगंध सुखाच घरात तीचमुळे ती माऊली ग माझी ©Jaymala Bharkade #माऊली(Mother)....womenhood
#माऊली(Mother)....womenhood
read moreAniket Dhamdhere
जगियाचा योगी समाधिस्त होतो, मृत्युलोकाचा पाश तोडूनी देतो, ब्रम्हचैतन्यात न्हाहताना अमृताचे घोट रिचवितो, माऊली नामाचा जप त्रैल्योकात चिरंतन घुमतो. ©Aniket Dhamdhere #माऊली
Shankar kamble
आसावला जीव।ओसंडला भाव। अंतरीचा ठाव।सावळ्या तू।।१।। कातर मनाला।आठवं क्षणाला। काकडा ओवला।देहरूपी।।२।। मनं ओढावते।दर्शनांते आस। जीवां रात्रंदिस।ध्यास तूझा।।३।। तोडीयले बंध।पाश मायारुपी। अंतरी स्वरूपी।तूच सदा।।४।। काय करू सांग।चित्त उसवले। पाहतो वाटुले।पंढरीची।।५।। अंतरी उमाळा।तोची घननीळा। सांगू लडिवाळा।गूज मनीं।।६।। नाद प्रसवला।परब्रह्म देहीं। मनाचियां डोही।नाद रंगे।।७।। देहादेही एक।भाव समरूप। पापांचे कळप।सुटती बां।।८।। मागणें न दुजें।आतां उरे काही। मनीं वसे ठायी।पांडुरंगे।।९।। श्री. शंकर नागनाथ कांबळे ©Shankar kamble #वारी #विठ्ठल #पंढरपूर #माऊली #वारी_जांऊ #पांडुरंग #विठ्ठल_रखुमाई #सावळा
Sharmila'S Diary
सारे अक्षरे फिके पडतात "❤️ आई ❤️" या नावापुढे 😍 या दिवसाची खरंच गरज नाहीये, पण असं निमित्त रोज मिळावं सुखी ठेव त्या माऊलीला जिने मला जन्म दिला तसेच जगातल्या प्रत्येक माऊलीला दिर्घायुष्य लाभु दे 🌹आईसाठी कोणताही दिवस नसतो कारण प्रत्येक दिवस आणि प्रत्येक क्षण हा आईचाच असतो🌹 सर्व मातांना मातृदिनाच्या शुभेच्छा 🌹😘🙏🏻😇 #uwots #mothers_day #मातृदिन #mothersdayspecial #आई #माँ #माऊली #uwots #Nojoto
#mothers_day #मातृदिन #Mothersdayspecial #आई #माँ #माऊली #uwots
read morevijay jagtap
चंद्रभागेच्या किनारी वारकरी न्हाहली, आपल्या पाप -पुण्य तुन मोकळी जाहली, विठूच्या दर्शनाने त्यांना पंढरी पावली, सगळीकडे एकच जयघोष माझा विठू माऊली... सगळ्यांवर आहे तुझी छत्र छाया, तुही लावलीस तुझ्या लेकरांवर माया, मस्तक ठेवितो मी तुझ्या पाया, तूच आमचा माय-बाप,तूच आमचा राया... ज्ञानेश्वरांना दिलास विद्येचा भंडार, तुकारामांना घडवलेस देऊन अंकुशाचा मार, इतरांनाही दिलास तू आयुष्याचा सार, या मातीतून घडलेल्या शरीराचा, तूच आहेस कुंभार... गजर होत आहे तुझ्या अभंगाचा, लोकांवरही प्रभाव आहे तुझ्या भारुडांचा, स्वामी आहेस तू तिन्ही युगांचा, उठून दिसतोस तू सावळ्या रंगाचा... पालखी सोबत निघते सगळ्यांची वारी,🚩 घोड्याची पण असते सोबत सवारी,🐎 गोल रिंगणाची तर बातच आहे न्यारी,⭕ सगळ्यांच्या मुखात फक्त पांडुरंग हरी...🙏 माझा विठू माऊली #विज #VJ #माऊली #आषाढी #विठ्ठल #हरी #शब्द_लहरी
Rushikesh Kale
भक्त करितो नामस्मरण . देवा च्या द्वारी आलो शरण. केव्हा तू भेटशील रे विठ्ठला. करू दे आम्हा तुझे स्पर्श चरण . विठ्ठला देरे भक्ताला दर्शन. ऋषा म्हणे प्राण शरीरात असे जो वर . देवाची नि:स्वार्थ भक्ती तू कर . निष्काम होईल जेव्हा हे शरीर घेऊन जाया येतील परमेश्वर मग होईल भेट तुझी विठ्ठलाशी . -- ऋषिकेश अशोक काळे #पांडुरंग #माऊली
क.वि
जाहली लोक पायी पायी गोळा। भरविला बघा माणूसकी चा मेळा।। कुणाची माय कुणाचा बाप इथ। नाही ओळखीचा कोण जिथं तिथं।। संसार मायेचा सावळ्याचा भोळा। लाविला तुम्हा माऊली नामाचा लळा।। कुणाचा कोण वारीत सारे मायबाप। मागितला देती कुणीही मायेचा हात।। जयाची तया वाणीत तुका नामा बोले। चुकी दवा दिधली होय गजर माऊली माऊली।। -क.वि
Siddharth khed
#DearZindagi माझा माऊली विठ्ठला नाम घेता मुखी होईल सर्व सुखी पंढरीनाथ विठ्ठला तु माऊली रखुमाई विठ्ठला विठ्ठला तू देवारुपी विठ्ठला माझं माऊली तु माझं बाप विठ्ठला कमरेवरी हात तुझा विटेवरी उभा नाम घेता मुखी संसार माझं सुखी विठ्ठला विठ्ठला तू देवारुपी विठ्ठला माय विठ्ठला बा तुझी लेकरे सारी राहु दे हात तुझा आम्हां पाठीवरी धाक लागे भेटीसाठी भेट कधीतरी विठ्ठला विठ्ठला तू देवारुपी विठ्ठला उठ विठ्ठला, उभा निरंजन घेऊन हाती आलोया माऊली तुझ्या दर्शनासी भक्तगण सज्ज तुझीया ओवाळती विठ्ठला विठ्ठला तू देवारुपी विठ्ठला माय साधुसंतांची महती कमी जाहले देवधर्म नीती, संस्कारची तुटे धागा कलियुग आले, माणुसकी कमी झाले विठ्ठला विठ्ठला तु पांडुरंग तुच विठ्ठला विठ्ठला विठ्ठला तु देवारुपी तुच विठ्ठला विठ्ठला विठ्ठला तु माऊली तुच विठ्ठला विठ्ठला विठ्ठला तु रखुमाई तुच विठ्ठला ✍सिध्दार्थ विठ्ठल खेड सोलापूर
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited