Nojoto: Largest Storytelling Platform

Best स्वप्नातली Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best स्वप्नातली Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutस्वप्नातली तू परी, स्वप्नातली राणी तू, स्वप्नातली तू, स्वप्नातली माझ्या परी, स्वप्नातील रानी,

  • 5 Followers
  • 5 Stories

yogesh atmaram ambawale

घारे घारे डोळे तुझे,भुरे भुरे केस
तुझ्या हृदयात येऊन राहण्या,
पार केली माझ्या मनाने वेस. #बार्बी #स्वप्नातली परी
#कल्पना #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with Kalpana Halge

yogesh atmaram ambawale

स्वप्नातलं जग #collabratingwithyqtaai #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #Collab #अक्षरे #मराठीकविता #स्वप्नातली #प्रपोज १ तु २ खुप ३ सुंदर ४ दिसतेस ५ पूर्वीपासून

read more
तु
खुप
सुंदर
दिसतेस
पूर्वीपासून
मला आवडते,
आज सांगितलंय
मनातलं सारं तिला
जवाब देणार होती ती
पण अचानक आई आली,
अंगावरून गोधडी खेचली
नि बोलली चल उठ लवकर
आंघोळ कर नि जा लगेच कामाला,
नुसताच सपनात बडबडतोस
समोर जा नि आज बोलूनच ये तिला
खरंच सांगतो खूप आवडतेस तू मला. स्वप्नातलं जग
#collabratingwithyqtaai  
#withcollabratingyourquoteandmine #yqtaai #collab #अक्षरे  #मराठीकविता #स्वप्नातली #प्रपोज 
१ तु
२ खुप
३ सुंदर
४ दिसतेस
५ पूर्वीपासून

Monica Bora

Sanket D Thorat

Arun Chinchangi

#स्वप्नातली परी...

वाटतं...मलाही असावं कोणी जीवाभावाचं
तो भाव माझ्या जीवाचा तूच असशील का ?
सांग, माझ्या स्वप्नातली परी तु होशील का...?

घालतोय साद तुला...
ती साद माझ्या हृदयाची तु ऐकशील का ?
रंगवायचंय चित्र आयुष्याचं मलाही...
त्या चित्रातील ते रंग आयुष्याचे तू बनशील का ?
सांग, माझ्या स्वप्नातली परी तु होशील का...?

गायचंय बेभान होऊन प्रेमगीत तुझ्यासवे...
त्या गाण्यांचा माझ्या आवाज तू होशील का ?
व्हायचंय लिहतं तुझ्याचसाठी...
ते शब्द तु माझे होशील का ?  
सांग, माझ्या स्वप्नातली परी तु होशील का...?

बांधायचीय न सुटणारी कधीही...
ती गाठ जीवनाची तु बनशील का ?
पहायचंय...अन् पाहतच तुला रहायचंय...
मग ती नजर तु माझी होशील का ?
सांग, माझ्या स्वप्नातली परी तु   होशील का...?

घुसमटलेत श्वास तुझ्या अाठवांनी...
त्या घुसमटल्या श्वासांना मोकळे  तु करशील का ?
निर्जीव झालाय हा देह सखे...
या देहात तु प्राण नवा फुंकशील का ?
सांग, माझ्या स्वप्नातली परी तु होशील का...?

निरर्थक आहे हे जगणं तुझ्यावाचून...
आता या जगण्याला अर्थ तु नवा देशील का ?
तुझ्याशिवाय नाहीच जगायचं...
जगण्याचं माझ्या ते कारण तु बनशील का ? 
सांग, माझ्या स्वप्नातली परी तु होशील का...?

बुडायचंय आकंठ प्रेमात तुझ्या...
साथ आयुष्यभर तु मला देशील का ?
मी म्हणजे तु अन् तु म्हणजेच मी...
समीकरण हे जीवनाचे माझ्या तू बनशील का ?
सांग, माझ्या स्वप्नातली परी तु होशील का...?

वाट पाहतोय अगदी वेड्यासारखा...
प्रेमवेड्याची या ती वाट स्वर्गीय तु बनशील का ?
सांग, सखे माझ्या स्वप्नातली परी तु होशील का...? 

 ✍ - अरुण शि.चिंचणगी.                                                                                                                                                                                                                                                                                                  माणगांव ता.चंदगड  जि.कोल्हापूर
२३/१०/२०१९ #स्वप्नातली_परी...

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile