Nojoto: Largest Storytelling Platform

Best पौर्णिमा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best पौर्णिमा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutपौर्णिमा समानार्थी शब्द मराठी, पौर्णिमा विरुद्धार्थी शब्द मराठी, पौर्णिमा समानार्थी शब्द, पौर्णिमा कधी आहे, पौर्णिमा 2020,

  • 4 Followers
  • 3 Stories

Shankar Kamble

नभांगणी पुनवेचा 
         चांद शोभतो बिलोरी 
 लाट चुंबिते तटाला 
          प्रीत उसळे सागरी 

 मधु आलाप जुळूनी 
          योग साधला सुरम्य
 ओढ हूरहूर दाटे
         गूढ संवाद अगम्य

 दूध पिठोरी सांडले
         विखुरले भाव मोती
 सुख शयन त्यागुनी 
         मंद तेवतात ज्योती

 नेत्र कमळ उमले
       सूर व्याकूळ अधरी 
 कुंजवनी शीळ घुमे 
       देह फुलवी बासरी

 चित्तचोर काजव्यांची
        करू कोणाला कागाळी?
 सुख अवचित आले
        जशी सजली रांगोळी

 साक्ष देई कोण आता?
         झाला फितुर चांदवा
 तुझ्या पिरतीची नक्षी
        ओल्या हळदी गोंदवा

©Shankar Kamble #चांद #चंद्रमा #चंद्र #पौर्णिमा #प्रेम #हळद #गोंदण #साक्ष #“प्रेम” 

#parent

kalyani dhabale

व्रत..तुझ्यासाठीचं


श्रृंगार केल्याशिवायही मी तुला आवडते... 
पण मला आवडते तुझ्यासाठी सजणे... 
आठवून तुझं प्रेम कधी कधी ऊर भरून येतो
तू माझा म्हणून अभिमान वाटतो...

असेल जर पुनर्जन्म तर मी तुझीच होईन...
प्रत्येक जन्म तुझ्यासाठी घेईन 
माहीत आहे व्रताने काही आयुष्य वाढत नाही
तरीही व्रत हे निमित्त असतं बाकी काही नाही...

त्यात लपलेलंं प्रेम असते, जन्मजन्मांची प्रित असते...! #पौर्णिमा #व्रत

kunal dhakne

 #fullmoon #पौर्णिमा

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile