Nojoto: Largest Storytelling Platform

Best पूर Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best पूर Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutपूर्णिमा कब की है पूर्णमासी, जनवरी में पूर्णिमा कब है, मार्च में पूर्णिमा कब है, नवम्बर में पूर्णिमा कब है, जब मेहनत करने के बाद भी सपने पूरे नहीं होते,

  • 6 Followers
  • 6 Stories

Rashmi Hule

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों तुम्हाला माहितीचं असेल पश्चिम महाराष्ट्रात जलप्रलय आलाय. तिकडे असलेल्या सगळ्यांनी काळजी घ्या. कस असत ना या पावसाचं कधी कधी येतचं नाही तर कधी एवढा येतो कि पूराचा सामना करावा लागतो. चला तर मग आजचा विषय यावरचं आहे वर दिलेल्या पैकी कुठलाही शब्द वापरुन तुम्ही कविता करु शकता. #पूर #जलप्रलय

read more

पुर, जलप्रलय काही रोजचाच नोहे
देऊ चला मित्रानों सुदाम्याचे पोहे 
वाहते आहे अखंड घराघरातून पाणी 
कोसळते आहे वरून देवाची मेहेरबानी??
पाहून चिंध्या संसाराच्या, वाहतोय डोळ्यातून
कसे वेगळे करणार सांगा अश्रू महापुरातून??
करू मदत आपणही थोडी जसे जमेल तसे 
विस्कटलेला संसार आपल्या बांधवांचाच असे...  सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
तुम्हाला माहितीचं असेल पश्चिम महाराष्ट्रात 
जलप्रलय आलाय.
तिकडे असलेल्या सगळ्यांनी काळजी घ्या.
कस असत ना या पावसाचं कधी कधी येतचं नाही तर कधी एवढा येतो कि पूराचा सामना करावा लागतो.
चला तर मग आजचा विषय यावरचं आहे
वर दिलेल्या पैकी कुठलाही शब्द वापरुन तुम्ही कविता करु शकता.
#पूर #जलप्रलय

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों तुम्हाला माहितीचं असेल पश्चिम महाराष्ट्रात जलप्रलय आलाय. तिकडे असलेल्या सगळ्यांनी काळजी घ्या. कस असत ना या पावसाचं कधी कधी येतचं नाही तर कधी एवढा येतो कि पूराचा सामना करावा लागतो. चला तर मग आजचा विषय यावरचं आहे वर दिलेल्या पैकी कुठलाही शब्द वापरुन तुम्ही कविता करु शकता. #पूर #जलप्रलय

read more
खूप मजा येते आम्हाला जेव्हा तू बरसतो,
तुझ्या येण्यासाठी आम्ही नेहमीच तरसतो.
पण कधी-कधी तुझा खूप राग येतो,
जेव्हा तू सर्वत्र पूर येईल असा बरसतो.
येतोस तू आमच्यावर आनंदाचा वर्षाव करतोस,
पण कधी असा बरसतो की जीवनभर लक्षात राहील असा त्रास देतोस.
खरा मित्र तुझा शेतकरी,तुलाच पुजत असतो,
तू मात्र महापूर आणून त्याला मरणयातना देत असतो.
काय आमचं चुकतं, का तू असा वागतोस,
आमच्या सर्वांचा लाडका तू,
का आमच्यावर रागावतोस. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
तुम्हाला माहितीचं असेल पश्चिम महाराष्ट्रात 
जलप्रलय आलाय.
तिकडे असलेल्या सगळ्यांनी काळजी घ्या.
कस असत ना या पावसाचं कधी कधी येतचं नाही तर कधी एवढा येतो कि पूराचा सामना करावा लागतो.
चला तर मग आजचा विषय यावरचं आहे
वर दिलेल्या पैकी कुठलाही शब्द वापरुन तुम्ही कविता करु शकता.
#पूर #जलप्रलय

Shankar Kamble

*कसं आभाळ फाटलं* 
 *पाणी डोळ्यांत दाटलं* 
 *चिंब भिजला संसार* 
 *सुख पूरात लोटलं...* 

 *काडी– काडी जमविली* 
 *खोपा सुंदर विणला* 
 *रात्र भयाण काळोखी* 
 *चांद उजेडा शिणला...* 

 *शेतं शिवारं भिजली* 
 *मोती पाण्यात कुजली* 
 *घाम मातीमोल झाला* 
 *कळ उरांत थिजली...* 

 *घाव उरावरी कसा* 
 *सल भळभळ दाटे* 
 *सुख स्वप्नांचा चुराडा* 
 *मनी बोचतात काटे...* 

 *जाळ चुलीचा विझला* 
 *आग पेटली पोटात* 
 *जिवाभावाची माणसं* 
 *दूर पुराच्या लाटेतं...* 

 *पूर ओसरलं उद्या* 
 *सारं होईल सारखं* 
 *खुणां कोरलेल्या उरी* 
 *जीवा जगणं पारखं...*

©Shankar Kamble #पूर #पाऊस #पाणी #पाणी_पाऊस_देगा_देवा #

#baarish

Pandit Nimbalkàr

पूर

आला आला पुर 
गेलं घरदार वाहून 
गुरं ढोरं झोडपली 
डोळे वाहती पाहून ||१||

धप्प पडली भिंत 
दुर पळालो घाबरून 
भांडी कुंडी गडप 
मुलं बसती कुशी शिरून ||२||

बाप ढिगा खाली गाडला 
धरला हंबरडा दाबून 
माझी तीचं साऱ्यांची गत
जिवंत जरी गेलो मरून  ||३||

चिखल चिखल भोवती 
पाय रक्ताळले तुडवून 
भुक पोटाची रिकाम्या 
गेली पिकावानी सडून  ||४||

तहान मागलं का? पाणी
पाणी आलं मरण घेऊन 
दार ठोठावू आता कुणाचं 
दार स्वप्नांचे गेले उडून  ||५||
 
असा कसा कोप झाला 
गांव क्षणात गेलं वाहून 
खेळ जिवनाचा खेळाया 
बळ सांगा आणावं कुठून  ||६||

कवी गीतकार पंडित निंबाळकर 
मु पो सांगवी भुसार ता कोपरगाव 
जि अहमदनगर ७९७२५२३७१७

©Pandit Nimbalkàr #पूर , #panditnimbalkar , #kavita

Shreyas Sawakhande

 #पूर #कविता

Abhishek Mitake

पुन्हा एकदा...

पुन्हा तसाच एक विद्यार्थी
दरवाजाशी आला
सुन्न अश्या अवस्थेत
उंबऱ्यातच बसला!

मौनात उत्तर होते
न विचारलेल्या प्रश्नाचे
पाणी होते भरलेले डोळ्यात
घरात नांदलेल्या पंचगंगेचे!

बोलायला शब्द फुटत नव्हते
भावना डोळ्यातूनच ओसंडत होती
आमच्यात तेव्हा फक्त आणि फक्त
निरव शांतता होती....

जुन्या अनुभवाने
फक्त पाठीवर थाप दिली
तेव्हा तो जिद्दीने उठला
तसाच नि:शब्द लढायला निघाला.....

सर्व पूरग्रस्तांना समर्पित
श्रेष्ठ कवी श्री कुसुमाग्रज यांच्या कणा कवितेने प्रभावित....🙏

अभिषेक... #पूर#महाराष्ट्र#कणा#कुसुमाग्रज

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile