Nojoto: Largest Storytelling Platform

Best माहेर Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best माहेर Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutमाहेर कविता, माहेरची साडी मराठी चित्रपट डाउनलोड, माहेरची साडी मराठी चित्रपट, माहेरची साडी मराठी पिक्चर, माहेरची साडी मराठी,

  • 5 Followers
  • 5 Stories

शब्दवेडा किशोर

#माहेर झालं परकं आता कुठे शोधू आई तुला....
माहेर झालं परकं आता कुठं शोधु आई तुला
घरीदारी अंगणात नाही दिसत परसदारी
अनाहूतपणे एका काळोख्या क्षणी सांग ना
का आणि कोणत्या गेलीस सदनात....
तुझ्या जाण्यानंतर गं आई जाईजुई मोगराही कसा सुकुन गेला
आता तुझा स्पर्श नाही त्याला रुसुनी तोही बसला....
आधी दारात राहात असे तु मुर्तीसम वाट पहात माझी
पून्हा पून्हा नजर माझ्या वाटेकडे असे तुझी....
येताच मी दारात गं तु मजवरुनी तुकडा ओवाळून टाकत होती
दृष्ट नको लागावया म्हणून किती काळजी तु करत होती....
बनवुनी सारे कष्टाने खाऊ घालत होतीस मज मायेने
 तब्बेतीची काळजी घे बोलत होतीस तु चिंतेने....
बांधुनीया देई गाठोडे ती सर्व आवडत्या गोष्टींची
परत परत सांगायची सुध्दा की आठवण ठेव ग माहेरची....
आता शोधते नयन माझे तिची सावलीही दिसत नाही
गेली कोणत्या गावास कोणासही ठावे नाही....
जन्म घ्यावा पोटी तुझ्या फिरूनीया जन्मा यावे
आई कुशीत शिरुनीया तुझ्या परत लहानगे मी व्हावे
आई कुशीत शिरुनीया तुझ्या
परत लहानगे मी व्हावे....
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #माहेर_झालं_परकं

शब्दवेडा किशोर

#माहेर झालं सुनं....
नाही राहिलं रे कुणी वाटे खंत ही मनाला
वाट झाली सुनी सुनी कसं जाऊ मी माहेराला
माझं माहेर असे डोंगराच्या कुशीत
असं गाव ते सुंदर सारं गाडलं मातीत
घर कौलारू अशी जशी मोत्यांची नक्षी
रानावनात सारी बागडे रानाची पक्षी
राहिल्या जागेवर गप्पा ओस पडली रे चावडी
नाही दिसत रे कुणी नाही गाव भानगडी
नाही समजला इशारा क्षणात दुःख कडा कोसळे
असा दैवाचा फेरा स्वप्न मातीत दडले
कसा काढू मी गाळ कशी उपसू माती
कधी सापडेल पुन्हा मला माझ्या मायेची ती नाती
नाही राहिलं माहेर नाही माहेरची माणसं
माहेर झालं सूनं ना आता मोहरे माहेरची कणसं
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #माहेरची_आठवण

Shankar kamble

ओळखीच्या खुणां साऱ्या
आज परक्या वाटल्या
ओल सरतां मायेची
भेगां मनांत दाटल्या।१।

घालमेल उंबऱ्याची
जीव झाला कासावीस
सोसवेना होरपळ
डोळां चातकाची आस।२।

शीळ पाखरांची कानी
श्रावणातला हिंदोळा
घुटमळ पानोपानी
गंध दरवळ वेल्हाळा।३।

सये तुटलं माहेर
लेकपणाला पारखी
माझं फाटलं आभाळ
ऊन-सावली सारखी।४।

कसा आवरू हुंदका
किती निरपावं पाणी
कोंब खुडता उमाळा
भळभळ दाटे मनी।५।

नको कोरडा दिखावा
वरवरचं बोलणं
अंग पोळलं उन्हांत
आता कुठलं शिंपण?।६।

©Shankar kamble #माहेर #माहेर_सासर #लेक #मुलगी #सासरी #झोका #आठवण 

#Childhood

Swati Mahendra Jadhav

माहेर म्हणजे जिव्हाळ्याचा विषय..#माहेर. #कविता #stay_home_stay_safe

read more
माहेरचे अंगण..

माझ्या माहेरची वाट चालता चालता..
 मनी दाटला आठवणींचा उजाळा..
लहानपणीचा खेळ अंगणी मांडला तो डाव..
मनी दाटला मायेचा तो भाव..
माझ्या माहेराच्या अंगणी या ग! सख्यानो..  
खेळ लपाछपी आणि पाठशिवणीचा मांडू या..
 किती किती लहानपणीच्या आठवणी आठवू ग सये आता..
मनी दाटला अश्रूंनी गळा माहेराचं गुण गाता गाता.. 
माझ्या घराचे अंगण आणि शाळेचे ते पटांगण..
मनी दाटला अभिमान... ऊर भरला भरला..
माझ्या अंगणी पोहचता माय उभी ती दारी..
हाती तुकडा नी पाणी आनंदाने डोळे तिचे भरी..
घरी पाऊल टाकता टाकता तिची जेवणाची घाई..
सांग तुला काय वाडू भाजीभाकरी की दुधावरची सायी..
घर माझेच ते पण आता काही वेगळेच भासे..
सारे माझेच असे पण परतीची वाट मात्र दिसे..
गोड कौतुक आणि लाड करून घेता..
विसरून गेले मी चार दिवसाचा तो पाहूणचार होता..
रात्र सरता सरता उद्या दिवस निरोपाचा..
अंगणात उभा राहून बांध फुटला आठवणींचा..
काही राहिले तर नाही ना सारे न्याहाळून झाले..
माझ्या मायेच्या माणसांना डोळ्यात साठवून झाले..
जड अंतकरणाने बाहेर पाऊल निघाले..
आईचा निरोप काळजी घे सांगून झाले.. 
सारे अंगण पाहता पाणी पापण्यांच्या आत दडे..
पुन्हा येण्याच्या आशेने आठवणी मागे पडे..
माझ्या माहेरचा निरोप घेता घेता..
मनी दाटला पुन्हा आठवणींचा उजाळा..

©Swati Mahendra Jadhav माहेर म्हणजे जिव्हाळ्याचा विषय..#माहेर. #कविता

#stay_home_stay_safe

Sarita Sawant

माहेर जस की स्वर्गच जणू
मायेने कुरवळलेला हात तिथे आहे
जीवापाड असणाऱ्या प्रेमाचा स्पर्श तिथे आहे
लाडात पडलेला धपाटा तिथे आहे
दुडू दुडू पडलेली पाऊले तिथे आहेत
बाबासवे बोललेली बडबडगीते तिथे आहेत
मी आणि माझचं करणारा हट्ट तिथे आहे
तू मी तू मी करणारा भाऊ तिथे आहे
कधी रूसणारी कधी हसणारी बहीण तिथे आहे
सुखात दुःखात साथ देणारी मैत्रीण तिथे आहे
तिथे आहे प्रेम,जिव्हाळा
सख्यांच्या प्रीतीचा लळा
तिथे आहेत कडू गोड आठवणी
तिथे आहे साठवणीतली गाणी
तिथे आहे अल्लडपण
तिथे आहे उमगलेले शहाणपण
तिथे आहे नाळेचं नात
तिथे आहे  अस्तित्व अजूनही माझं
माहेर जस की स्वर्गच जणू

सरिता सावंत #माहेर #लग्न #सुख #कविता

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile