Nojoto: Largest Storytelling Platform

Best मैत्रीण Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मैत्रीण Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutअसावी एक मैत्रीण, मैत्रीण शायरी, माझी मैत्रीण कविता, मैत्रीण मराठी कविता, मैत्रीण कविता,

  • 9 Followers
  • 12 Stories

Kunal Salve

सहज तू

आज सहज तू आठवली
पुन्हा तीच माझी मैत्रीण होऊन 
साहजिकच होतं मग ,
हृदय गेलं परत तुझं होऊन ! #मैत्रीण  #प्रेम

pooja d

मैत्रीण म्हणून, मला प्रेयसी बनवलं
नात निभावण्याची वेळ येता, दूर केलं ।  #मैत्रीण #दोनओळी #twoliner

yogesh atmaram ambawale

खास आपल्या मैत्री साठी..एक छोटासा लेख..✍️ @manishadongrekulkarni #manishadongrekulkarni ओळख आमची दोन/तीन वर्षाची,ती पण समोरासमोरची भेट नव्हे मैत्री आमची YQ वरची. "मनिषा" नाव तिचे सॉरी तिचे नाही त्यांचे,त्या ज्या हिंदी गजल मराठीत अनुवादीत करून लिहितात. इथे YQ वर आमची पहिली ओळख झाली ती आजवर आहे आणि जोपर्यंत YQ राहील तो पर्यंत तरी नक्कीच राहील. कारण गेल्या दोन/तीन वर्षात आम्ही खुप गप्पा मारल्या आणि खुप भांडणे ही केली,पण..ही भांडणे जी झालीत ती त्यांच्याकडून झालीत माझ्याकडून नाही.🤭 आमची भांडणे ही जास

read more
मैत्री आमची...
( कॅप्शन मधील वाचावे ) खास आपल्या मैत्री साठी..एक छोटासा लेख..✍️
@manishadongrekulkarni #manishadongrekulkarni
ओळख आमची दोन/तीन वर्षाची,ती पण समोरासमोरची भेट नव्हे मैत्री आमची YQ वरची.
"मनिषा" नाव तिचे सॉरी तिचे नाही त्यांचे,त्या ज्या हिंदी गजल मराठीत अनुवादीत करून लिहितात.
इथे YQ वर आमची पहिली ओळख झाली ती आजवर आहे आणि जोपर्यंत YQ राहील तो पर्यंत तरी नक्कीच राहील.
कारण गेल्या दोन/तीन वर्षात आम्ही खुप गप्पा मारल्या आणि खुप भांडणे ही केली,पण..ही भांडणे जी झालीत ती त्यांच्याकडून झालीत माझ्याकडून नाही.🤭
आमची भांडणे ही जास

yogesh atmaram ambawale

शाळेतल्या मैत्रिणी.. #क्लासमेट #वर्गातलीती #मैत्रीण #शाळेतल्याआठवणी #yqtaai #शाळा निलम,बेबी,माधवी,कीर्ती,चारुशीला, गीता,सविता,कविता,अरुणा,अर्पणा, ह्याच्या पेक्षा जास्त नावं आठवणा. वीस बावीस मुली होत्या वर्गात लक्षात इतक्याच राहिल्या, 28 वर्षानंतर ही ह्या चांगल्याच आठवल्या,

read more
निलम,बेबी,माधवी,कीर्ती,चारुशीला,
गीता,सविता,कविता,अरुणा,अर्पणा,
ह्याच्या पेक्षा जास्त नावं आठवणा.
वीस बावीस मुली होत्या वर्गात
लक्षात इतक्याच राहिल्या,
28 वर्षानंतर ही ह्या चांगल्याच आठवल्या,
बाकी देव जाणो कुठे हरवल्या..😆😉 शाळेतल्या मैत्रिणी..
#क्लासमेट #वर्गातलीती #मैत्रीण #शाळेतल्याआठवणी #yqtaai #शाळा 
निलम,बेबी,माधवी,कीर्ती,चारुशीला,
गीता,सविता,कविता,अरुणा,अर्पणा,
ह्याच्या पेक्षा जास्त नावं आठवणा.
वीस बावीस मुली होत्या वर्गात
लक्षात इतक्याच राहिल्या,
28 वर्षानंतर ही ह्या चांगल्याच आठवल्या,

सुधाकर फाळके

मैत्रीण

     स्वप्नांनी मंतरलेल्या 
        अनोळखी वाटेवर..,  
तू भेटलीस मला
                       एका निसरड्या वळणावर...

                         माझ्या अधीर, अशांत मनाला
                      शांततेचा किनारा लाभला..,
             निखळले बंध सारे अन्
.                                     तुझ्या माझ्या मैत्रीचा उत्सव सजला..

                          तुझं आभाळाएवढं स्मित हास्य
.                   जणू ऊर्जेचा वाहता झरा..,
                              गर्दीत माणसांच्या एकटा उभा मी
.                        तुझ्या दोस्तीने दिला सहारा...

                                  भासता मृगजळ रणरणत्या उन्हात
                                      तूच माझा आधार अन् तूच विसावा..,
             तुझा अबोला असा की
                                               जणू माझ्या काळजाचा ठोकाच चुकावा...

                               प्रामाणिकतेचं वरदान लाभलेल्या
                                            आरशासारख मला तुझ्या नजरेनं पाहिलं
                     माझ्या खोडकर चुकांना तू 
                     सहजतेने माफही केलं......

           मी तुझ्या सोबत आहे
                           असं तू जेव्हां जेव्हां म्हणतेस..
                      जग जिकल्यासारख वाटतं 
.                                   तेव्हा तू माझ्या सोबतच असतेस...

                                         आनंद, सहवास, विश्वास आणि आदर
                                               सारं काही जपलसं मर्यादेच्या अलीकडे..
                                           आता माझी हृदस्पंदने बोलू लागलीयेत
                                                      जाऊया का थोडं मैत्रीच्याही पलीकडे...???
                                                      जाऊया का थोडं मैत्रीच्याही पलीकडे...???


~~                                                                सुधाकर फाळके #मैत्रीण

RJ कैलास नाईक

#मैत्रीण का प्रियसी,मित्र का सखा अनेक वेळा प्रश्न पडतात मनाला कधी बेधुंद जगणं कधी हळवं वागणं गुंते मनातले सांगणार तरी कुणाला? हवाहवासा तो सहवास क्षणांचा विरह कधी व्यक्त कधी अव्यक्त पणे फुलतं नातं प्रेम म्हणजे तरी वेगळं काय असतं

read more
मैत्रीण का प्रियसी,मित्र का सखा
अनेक वेळा प्रश्न पडतात मनाला
कधी बेधुंद जगणं कधी हळवं वागणं
गुंते मनातले सांगणार तरी कुणाला?

हवाहवासा तो सहवास क्षणांचा विरह
कधी व्यक्त कधी अव्यक्त पणे फुलतं नातं
प्रेम म्हणजे तरी वेगळं काय असतं
सर्वस्व देऊन व्हायचं असतं ना रितं?

विधीलिखित भावबंध जुळताना नसते तमा
कधी येते उधान भावनांना भरतीची लाट
सुखद क्षण आठवून त्यातूनच तर 
 काढावी लागते ना सुखद पळवाट ?
              RJ कैलास #मैत्रीण का प्रियसी,मित्र का सखा
अनेक वेळा प्रश्न पडतात मनाला
कधी बेधुंद जगणं कधी हळवं वागणं
गुंते मनातले सांगणार तरी कुणाला?

हवाहवासा तो सहवास क्षणांचा विरह
कधी व्यक्त कधी अव्यक्त पणे फुलतं नातं
प्रेम म्हणजे तरी वेगळं काय असतं

vikas pingale

#OpenPoetry मैत्रिण माझी बिल्लोरी, बुट्टूक लाल चुट्टुक चेरी
मैत्रिण माझी हूं का चूं!, मैत्रिण माझी मी का तू !
मैत्रिण माझी हट्टी गं, उन्हाळ्याची सुट्टी गं,
मैत्रिण माझ्या ओठांवरची कट्टी आणि बट्टी गं !
मैत्रिण रुमझुमती पोर, मैत्रिण पुनवेची कोर
मैत्रिण माझी कानी डूल, मैत्रिण मैत्रिण वेणीत फूल!
मैत्रिण मांजा काचेचा, हिरवा हार पाचूचा
बदामाचे झाड मैत्रिण, बदामाचे गूढ मैत्रिण
मैत्रिण माझी अशी दिसते, जणू झाडावर कळी खुलते
ओल्या ओठी हिरमुसते, वेड्या डोळ्यांनी हसते
मैत्रिण माझी फुलगंधी, मैत्रिण ञाझी स्वच्छंदी
करते जवळीक अपरंपार, तरीही नेहमी स्पर्शापार
मैत्रिण सारे बोलावे, मैत्रिण कुशीत स्फुंदावे
जितके धरले हात सहज, तितके अलगद सोडावे
मैत्रिण माझी शब्दांआड लपते, हासुनिया म्हणते,
पाण्याला का चव असते, अन् मैत्रिणीस का वय असते
मैत्रिण, थोडे बोलू थांब, बघ प्रश्नांची लागे रांग
दुःख असे का मज मिळते, तुझ्याचपाशी जे खुलते
मैत्रिण माझी स्वच्छ दुपार, मैत्रिण माझी संध्याकाळ
माझ्या अबोल तहानेसाठी मैत्रिण भरलेले आभाळ

संदिप खरे #मैत्रीण

Sarita Sawant

नाते ना रक्ताचे ना गोत्याचे
तरी ऋणानुबंध आयुष्यभराचे
ना ओळखीचे ना पाळखीचे
तरी साथी आहे सुखं दुःखाचे
ना माज कसला ना कसला अहंकार
नाते आहे निस्वार्थाचे
ना तू मोठा ना मी मोठा
नाते हे अतूट विश्वासाचे
सर ना याला दुसऱ्या नात्याची
गरज ना याला कोणाच्या होकाराची
तुझं तू माझं मी असलं तरी
माझ्यासाठी तू अन तुझ्यासाठी मी केव्हाही आहे
जीवाला जीव देणारे 
नाते हे हक्काने जपलेले
मैत्रीच्या फुलांनी आनंदाने बहरलेले.

सरिता सावंत #मैत्री #मैत्रीण #प्रेम#मराठीकविता

Yogesh Ambawale

#प्रियकर#मैत्रीण#प्रेम#ते_दोघे दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम आहे, फरक फक्त इतकाच आहे, त्याचे प्रेम हे प्रियकराचे प्रेम आहे तर तिचे प्रेम हे खऱ्या मैत्रिणीचे प्रेम आहे. मैत्रीण खुश आहे म्हणून प्रियकर ही खुश आहे,नाहीतर आतून खूप उदास आहे प्रियकर बिचारा एकाच आशेवर जिवंत आहे मैत्रीण आज ना उद्या प्रेयसी होणार हीच आशा त्याच्या मनात आहे.

read more
दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम आहे,
फरक फक्त इतकाच आहे,
त्याचे प्रेम हे प्रियकराचे प्रेम आहे
तर तिचे प्रेम हे खऱ्या मैत्रिणीचे प्रेम आहे.
मैत्रीण खुश आहे म्हणून प्रियकर ही खुश आहे,नाहीतर आतून खूप उदास आहे
प्रियकर बिचारा एकाच आशेवर जिवंत आहे
मैत्रीण आज ना उद्या प्रेयसी होणार हीच आशा त्याच्या मनात आहे.
मैत्रीण आनंदी खूप आहे कारण ह्याच्यासारखा तिला समजून घेणारा
दुसरा मित्रच नाही. #प्रियकर#मैत्रीण#प्रेम#ते_दोघे
दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम आहे,
फरक फक्त इतकाच आहे,
त्याचे प्रेम हे प्रियकराचे प्रेम आहे
तर तिचे प्रेम हे खऱ्या मैत्रिणीचे प्रेम आहे.
मैत्रीण खुश आहे म्हणून प्रियकर ही खुश आहे,नाहीतर आतून खूप उदास आहे
प्रियकर बिचारा एकाच आशेवर जिवंत आहे
मैत्रीण आज ना उद्या प्रेयसी होणार हीच आशा त्याच्या मनात आहे.

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile