Nojoto: Largest Storytelling Platform

Best कितीदा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best कितीदा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutकितीदा नव्याने तुला आठवावे song download, कितीदा नव्याने तुला आठवावे lyrics, कितीदा नव्याने तुला आठवावे download, कितीदा नव्याने तुला आठवावे मराठी सोंग, कितीदा नव्याने तुला आठवावे रिंगटोन,

  • 5 Followers
  • 5 Stories

Dharmendra Gopatwar

#कितीदा नव्याने

read more
कितीदा नव्याने ..✍️

   _कितीदा नव्याने 
स्वप्न.. तुझे मी बघावे !
बंद डोळ्यांत ..तुला
पापणी ही बघावे ..

बंद डोळ्यात तुला 
सांग . !  कसा मी जपू रे
     पापणी ही उघडता
 भीती विरहाची उरी रे ..

मी मनाशी जपावे
      किती काळ तुझे सप्न 
प्रतिक्षा मिटे ना 
न घडे का ? 
प्रत्यक्ष नयनांशी भेट . .!

       प्रतिक्षेत तुझ्या . .
 नयन हे , दूर पाही .
न जाणतो मी 
कधी तुझी भेट होई !

कितीदा नव्याने 
तुला अंतरी स्मरावे
प्रत्ययी न येता स्वतः शी
मी हरावे . .

क्षण हा का . . ?
भेटी आधीच विरह भासे ,
वेदनांना ही जणू हुंदके दाटे . .

न जाणता जाणतो तुला मी
मज भेटी साठी आतुरता तुला ही . . ;

       किती वेळ स्वप्नांत 
खेळशील तू . .
किती काळ एकान्त 
मला देशील तू . .
            
किती काळ तुला मी स्मरावे ?
तुझ्याविना का मज प्रत्यय उरावे !

कितीदा नव्याने ..पुन्हा
तुझे नाव ओठी 
         आतुरता पुन्हा ही तुझ्या भेटीसाठी 

कितीदा स्वप्न मी 
तुझ्या मिलनाची बघावे . .
       स्वप्नातून समक्ष नयानांशी तु यावे ____

                                      📖_ ध. वि . गोपतवार_✍️

©Dharmendra Gopatwar #कितीदा नव्याने

RJ कैलास नाईक

#कितीदा केली असेल फसवून स्वताला गोंडस शब्दांशी न सांगता फितुरी ओघळून गेले अश्रू कैकवेळा डोळ्यातून बांध घातले होते पापण्यांना जरी। क्षण होतेच सुगंधित म्हणतेस तर वेदना का सल देतात उरी ओशाळतो मी आठवून तुझे रूप

read more
 #कितीदा केली असेल फसवून स्वताला
गोंडस शब्दांशी न सांगता फितुरी
ओघळून गेले अश्रू कैकवेळा डोळ्यातून
बांध घातले होते पापण्यांना जरी।

क्षण होतेच सुगंधित म्हणतेस तर
 वेदना का सल देतात उरी
ओशाळतो मी आठवून तुझे रूप

Ajitkumar dorge

अजितकुमार

read more
मेलो कितीदा मी गेलो कितीदा 
ना सावरलो मरणातुणी 
जीव घेणाऱ्यांनीच नेला 
जीव काढूनी सरनातुणी अजितकुमार

Suyash Waghmare

अनभिज्ञ #Suyash #Love #relation #onesidelove

read more
अनभिज्ञ...
चूक नव्हतीच माझी काही,जीव आपोआप जडला,
खुणावले मी कितीदा,तुला अर्थ नाही कळला...

जेव्हा जेव्हा पाहिले मी तुला,वेगळाच आभास झाला,
अनुभवले मी कितीदा,तुला भासही न झाला...

प्रत्येक रात्री स्वप्नात तू माझ्या कुशीत होती,
प्रयत्न केले मी कितीदा,पण माझा डोळा नाही लागला...

असायची तू माझ्या रोजच्या,जेवणातल्या भातावरच वरण,
करपला भात कितीदा,तुला वासही ना आला...

चातकावाणी तुझ्यासाठी तडफडत मी होतो,
साद घातली मी कितीदा,तुझा प्रतिसाद नाही आला...

जीव सोडला मी,हात तुझा दुसऱ्याच्या हातात पाहून,
हात दिला मी कितीदा,तुझा प्रतिहात नाही आला...

प्रत्येकवेळी तुझ्यासाठीच जन्म माझा व्हावा,
जन्म घेतले मी कितीदा,तुला कळवळा न आला...
                           -सुयश भि.वाघमारे अनभिज्ञ #suyash #love #relation #onesidelove

Kavi Yogi ♥️

 #कितीदा#Marathi #मराठी #कवी 
#कविता #मराठीकाविता #कवियोगी #KaviYogi 
#Kavi #Kavitaa
#Heart
#Love
#compassion
#Feelings
#shayari

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile