Nojoto: Largest Storytelling Platform

Best सांगणार Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best सांगणार Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutसांगणारा translate in english, सांगणार नाही, भविष्य सांगणारे, भविष्य सांगणारा, सांगणार कधी,

  • 2 Followers
  • 1 Stories

Rutuja Dorwat

#Art #Artist

read more
कुणी म्हणतं की काय तो एक चित्रकार आहे मामुली,
कुणी म्हणत ती काही फुटकळ लिहीत बसते,
कुणी म्हणतं वेळेची बरबादी करतो तो,
कुणी म्हणत की दुसरं काही जमत नाही म्हणून करतो हे तो,
लोक काय म्हणत रहातात हो, काही वाईट गोष्टी बोचणाऱ्या,
तो शृंखला चितारतो हो पिंजऱ्यात बंद असताना,
ती करते शब्दसाधना शब्द संपलेले असताना,
कोण सांगणार त्या शिकलेल्यांना अभिनय सोपा नसतो,
कोण सांगणार नुसतं फोटो काढणं आणि चांगला फोटो यात फरक असतो,
अहो कलाकाराचं दान घेणं सोपं नाही,
उगाच कुणीही उठून कलाकार बनत नाही,
आधी जखम करून घ्यावी लागते, त्यावर पाणी मारून ती चिघळावी लागते,
जखमेवर मीठ चोळलं की जखम परत भळभळते,
त्याच जखमेच भांडवल जगाच्या बाजारात केलं,
की उपाधी कलाकार मिळते।
कलाकार होणं सोप्प नाही हो,
फक्त कलेचं वेड जपता आलं पाहिजे।
- ऋतुगंधा #art
#artist

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile