Nojoto: Largest Storytelling Platform

Best पांडुरंग Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best पांडुरंग Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutधावून ये पांडुरंगा पंढरीच्या पांडुरंगा, धावून ये पांडुरंगा, एवढे दे पांडुरंगा, पांडुरंगाची भक्ती गीत, भक्ती गीत पांडुरंगाची,

  • 8 Followers
  • 11 Stories

Ganesh Shinde

आज मज भेटेल का हो पांडुरंग
भजनात त्याच्या मी होईन दंग

सावळी सुंदर माझी विठाई
उभी शेजारी गोजिरी रखुमाई

प्रेमळ हासे , भक्तांपाहें हरी,
शांतचित्ते तो, भवताप हरी,

पाहीन त्यास डोळा एकवार,
हृदयी साठवेन त्यास जन्मभर,

वंदीन चरणी ठेवुनी भावे माथा,
"ठाव दे तुजठायी पंढरीनाथा।।"
-कृष्णसखा #एकादशी #पांडुरंग #yq_gns

Ganesh Shinde

विठ्ठला!

करू किती संसाराच्या वाऱ्या, संपेना येरझाऱ्या,
देह आता थकलासे, तू पाव विठ्ठला।

ध्यानी लागे ना हे द्वाड चित्त, शोधी एक निमित्त
बुडी मारी वासनेत, तू धाव विठ्ठला।

मांडूनि खोटा खेळ का खेळू, किती कर्दमी लोळू,
सुख काय ते एकदा, तू दाव विठ्ठला।

वाटते सारे संग सोडुनिया, धरावा पांडुरंग,
दास तुझ्या चरणाचा, तू राव विठ्ठला।

काही ना उरले आता माझे, सारेच असे तुझे,
रडू काय कुडीपाठी , तू गाव विठ्ठला।

तरलो संसारी तरी तुझ्या कृपेने, न उरले मागणे,
होई आता बुडत्याची ,तू नाव विठ्ठला।

लोटू नको दूर बालका या, लेकरांच्या मायबापा,
देई मज तुझ्यापाशी, तू ठाव विठ्ठला। #पाव_विठ्ठला #धाव_विठ्ठला #विठ्ठल #पांडुरंग #Yq_gns

Ganesh Shinde

नाना रंगे रंगविला मी पांडुरंग,
परि अंतरी सावळाच तो।
नाना नामे दंगविला मी श्यामरंग,
परि अंतरीची जपमाळाच तो। #पांडुरंग #नाम #yq_gns

somnath gawade

#पांडुरंग हरी

read more
जगाचा राणा विठू माझा सावळा
भक्तांसाठी त्याच्या मनी असे कळवळा
पंढरीला दरवर्षी भरतो भक्तांचा मेळा
एकदा तरी पहावा नयनरम्य हा सोहळा
     #पांडुरंग हरी

somnath gawade

#पांडुरंग माझा

read more
प्रामाणिक काम करत
असताना तो सतत 
बरोबर असतो.
भले आपण चुकलो तरी
निस्तरण्यासाठी तोच तर
उभा असतो.
पांडुरंग माझा....


 #पांडुरंग माझा

Nishigandha Kakade

वारीस खंड पडला,दुरावा जरी जाहला,
श्री चरणास पाहण्या,हा जीव आतुरला!!!

टाळ, मृदंग चिपळ्या,तयारी झाली की हो सारी,
खोचूनी कासोटा,लेऊनी पदर,डोई डोई तुळस भारी!

दिऊन निरोप सासरी,ओढ लागलीसे जीवा,
किती कौतुके जाहली,वेळ वारीला लाभावा!

थकले होते किती मी रे,राबले कष्टाने संसारी,
नाही भूक भागली तरीही,ध्यास तुझाच तो उरी!

लेक कुशीत रडली,सासू खूप रे बोलली,
गोठा हांबरनारी गाय,मी रे तशीच सोडली! 

सख्या निघाल्या माझ्या,पाय पळू ते लागती,
फुले ,सुगंधी अत्तरी,झुले पालखी सोबती!

चाले सर्ज्या-चाले राजा,नाचे टाळ-विण्या संगे,
नसे फिकीर जगाची,जरी पाऊस धारा ओथंबे!

रूनझुन वाजे घुंगरमाळा,होई आरती ठाई ठाई,
स्पर्श करी पालखीला,लहान पोरे,बाप्या अन बाई,

पडे सडा रांगोळीचा,रस्त्यावरी जागोजागी,
होई दर्शना गर्दी अफाट,जेव्हा घोडा धावे ग रींगणी!

धरी फेर खाकिवाला,फुगडी घाले म्हतारबाबा,
नाचे सारेच वारीला,लहान-थोर फेटेवाला!

फिटे पारणे नेत्रांचे,जेव्हा दिसे सोन्याचा कळस,
तुका,नामा,जनी,चोखा,भेटे हर एक श्वासात!

तुळशीमाळ सजली ती,चंदन टिळा तो कपाळी,
देव माझा कसा दिसे?जसा राजबिंडा ग हरी !

गर्जे आसमंत सारा,बळ येई भक्तांमधी,
होई जल्लोष सुखाचा,भजे रामकृष्ण हरी!

©Nishigandha Kakade #वारी #पांडुरंग #दर्शन #विठ्ठल_रखुमाई

Aarya Rathod

#पांडुरंग पांडुरंग 👏👏

read more
काश्याला फिरतोस रे वेड्या मानसा,
               तुझ्या दारी आले 
                विठु माऊली...!

             भक्तित गुंग झालास तू माझ्या,
              तुझ्या मना मनामधे 
              बसलाय  विठु माऊली...!

©Aarya Rathod #पांडुरंग पांडुरंग 👏👏

Shankar kamble

आसावला जीव।ओसंडला भाव।
अंतरीचा ठाव।सावळ्या तू।।१।।

कातर मनाला।आठवं क्षणाला।
काकडा ओवला।देहरूपी।।२।।

मनं ओढावते।दर्शनांते आस।
जीवां रात्रंदिस।ध्यास तूझा।।३।।

तोडीयले बंध।पाश मायारुपी।
अंतरी स्वरूपी।तूच सदा।।४।।

काय करू सांग।चित्त उसवले।
पाहतो वाटुले।पंढरीची।।५।।

अंतरी उमाळा।तोची घननीळा।
सांगू लडिवाळा।गूज मनीं।।६।।

नाद प्रसवला।परब्रह्म देहीं।
मनाचियां डोही।नाद रंगे।।७।।

देहादेही एक।भाव समरूप।
पापांचे कळप।सुटती बां।।८।।

मागणें न दुजें।आतां उरे काही।
मनीं वसे ठायी।पांडुरंगे।।९।।

श्री. शंकर नागनाथ कांबळे

©Shankar kamble #वारी 
#विठ्ठल 
#पंढरपूर 
#माऊली 
#वारी_जांऊ 
#पांडुरंग 
#विठ्ठल_रखुमाई 
#सावळा

RJ कैलास नाईक

#पांडुरंग पांडुरंग

read more
 #पांडुरंग पांडुरंग

pranav...

जयवंत...

read more
🙏वारी🙏

माऊली तुजियामुळं 
पावन झालाय आळंदीचा सिद्धेश्वर ।।
जसा भक्त पुंडलीकामुळं
जाहला पांडुरंग ।।

नाथ पैठणहुनं आलं ।
  शोधली अनाथ समाधी ।।
गुहेमधी शिरुनी, काढीली ।
गळी कासलेली मुळी आधी ।।

वसुंधरेची एकच फेरी । 
भक्तांचं लक्ष पाऊल अंतर ।।
दुरुनिया पाहे पांडुरंग ।
नेसुनिया केसरी पितांबर ।।

    वरुनी पाहता दोन पालखी वाटा ।
वसुंदरा गळी शुभ्र माळ भासे ।।
जसे पांडुरंगचे कर्णी ।
   बिलगले दोन मासे ।।

सहस्र सूर कंठांचा,टाळांचा नाद !
मृदुंगाची थाप ।। ऐकुनी नाचे, 
पांडुरंग मायबाप ।।
              *(जयवंत)* जयवंत...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile