Nojoto: Largest Storytelling Platform

Best वाटा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best वाटा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutवाटाणा in english, वाटाड्या कविता, मोडून या वाटा, वाटाणा बाजार भाव, वाटाड्या अर्थ,

  • 6 Followers
  • 8 Stories

somnath gawade

एखादा आपल्या 
वाटेकडे डोळे
लावून बसला
असेल तर त्याच्या
वाट्याला आपला
 वेळ दिला पाहिजे.
🤣😂
 #वाटा
#सोमचंद्र

somnath gawade

#वाटा

read more
समाजातील धूर्त
मंडळी 'खारीचा'
वाटा देऊन
 'सिंहाचा'
वाटा दिल्याचा
आव आणतात.
🤣😆😂
 #वाटा

somnath gawade

#वाटा

read more
नोकरदार वर्गाच्या खात्यामध्ये 
जमा झालेल्या पगाराला कधी
गरजेच्या तर कधी 'चैनी'च्या
'वाटा' असतात.🤣😂

 #वाटा

Suyash Ananda Gulig

आधी चालायचो आता टाळतोय, 
तुझ्याकडे जाणाऱ्या वाटा मी!..

तुला तर तेव्हा ही वाटायचो,
आता ही वाटतो खोटा मी!..

- सुयश गुळीग

©Suyash Ananda Gulig #खोटा #वाटा #तुला

Shankar kamble

*गर्द दाटला अंधार सभोवती* 
 *हरवून गेल्या वाटा* 
 *वादळात भरकटे किनारा* 
 *नेती दूर लाटा* 

 *हाती गवसले होते काही* 
 *क्षणांत निसटून गेले* 
 *प्रकाशातले जगणे सरले* 
 *घन अंधारून आले* 

 *क्षणिक सुखाचे रंग फसवे* 
 *मोहवी मन चार क्षणाला* 
 *बहर सरता येई पानगळ* 
 *एकाकी जग भास उद्याला* 

 *नभांगणी तळपती अविरत* 
 *अगणित तेजोराशी* 
 *काळोखाचा श्राप भोगतो* 
 *काजवा मी मंद प्रकाशी* 

 *माझ्याच कोशी गुरफटलो* 
 *विणले अभासी जाळे* 
 *उतरता भोग समाधी* 
 *निवळले गढूळ जळ निळे*

©Shankar kamble #अंधार #काळोख #वाट #वाटा #काळोख😢🖤Fearofdarkness😢काल 

#Moon

Sneha Gujrathi

अनोळखी वाटांवर नेहमीच हरवतो आपण 
पण ओळखीच्या वाटांवर हरवण्यात एक वेगळीच गंमत असते.

- Sneha Gujrathi #अनोळखी  #वाटा

rajesh pol

Badrinath Kumar Shalu Kumari Vani Princess Madhavi Choudhary Balakrishna

read more
पुन्हा तोच रस्ता त्याच वाटा 
चार दिवसाचाच  हा बाजार आहे ।

पुर अोसरला म्हणे ;
डोळ्यात महापूर  तसाच आहे ।

प्रश्न तेच आहेत 
सोडवणार कोण ? 
म्हणे आहो;
हा चार दिवसांचाच  बाजार आहे।

पडक्या भिंती लिंपून घ्या 
म्हणे ;चार दिवसांचाच  हा 
पावसाळा
आहे।
पुन्हा पूर येणार नाही 
सरकारचा अंदाज आहे ।

आता पुर अोसरला म्हणे
आश्वासनांचा  महापूर आहे।

गेलेत सुट्टीवर स्वच्छ भारत अनुयायी
म्हणे;
तरी फेसबुकवर अपडेट मात्र
फोटो त्यांचाच  आहे ।

पाहिले पुरात मी ही 
सशक्तताना हात  धुताना
पाहिली मी या डोळ्यांनी 
अशक्तांना भुके मारताना ।

खरंच दंड शक्तीला मान आहे 
शिकवून गेला महापुर आहे।
पुन्हा तोच रस्ता त्याच वाटा 
साला ;
चार दिवसाचाच   बाजार  आहे  ।

म्हणे पुन्हा घर उभी राहतील आता 
पण; कुणाची हा खरा प्रश्न आहे ।
पुन्हा तोच रस्ता त्याच वाटा 
साला ;
चार दिवसाचाच   बाजार  आहे  ।
  राजेश Badrinath Kumar Shalu Kumari Vani Princess Madhavi Choudhary Balakrishna

MRk💝

#वाटा तूझा नि माझा rithu navya Satyam Rajput Mukesh Mali Purwansh Katre shayar Akash kumar

read more

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile