Find the Best गेला Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutगेला का भजन, गेला का, गेला ना, भिजून गेला वारा song download, भिजुन गेला वारा song,
शब्दवेडा किशोर
#गेला अवकाळी पडून.... गेला अवकाळी पडून मेघ आश्वासनांचे दाटले घोषणांची बरसात होऊन थेंब शब्दांचे सांडले बांधाने बघा आता कॅमेरा फिरेल ताफा येईल सरकारी फुकटच्या पंचनाम्याने रकाने भरतील मग कागदावरी सुका म्हणू का ओला नाव त्याला काय देऊ अरे दृष्ट दुष्काळा तु उभा राहीलास अनाहुतपणे माझ्या दारी सांग मी पाय कसे रोवू माझ्या सातबाऱ्यावर झाला साऱ्या कर्जाचाच डोंगर गळी माझ्या पुन्हा पुन्हा आवळला जाई सावकारी फास सांग कसा ओढु मी नांगर अद्रक लसुण अन् कांद्याचीही निष्ठूर पावसा मान मोडली गहू हरभऱ्यांना गर्भातंच तडे भेटतात ज्वारी बाजरीही मग उभ्या उभ्यानंच रडे नाही द्राक्षे तारुण्यात नाही डाळी त्या शेतकऱ्याच्या हातात चार महिन्यात नाही का रे पडला तु पोटभर आता अवजड घेऊनी कोसळूनी का रे मुखी आलेला दाणा तुच ओरबाडून नेला अवकाळी आलास अन् घेऊन गेलास आयुष्यातला बहर सांग मज मग तुच आता कसा टाकु तो मंडप आज मी कन्यादानासाठी बाप म्हणून मी लाचारीचं जीणं हे जगतो सांग मजला तुच किती झुरु मी माझ्या काळजाच्या तुकड्यासाठी लाडाकोडात वाढवली लेक माझी हो लाडकी कशी करु सांग बा तिची पाठवणी माझी झोळी झाली तुझ्या अवकाळी कृपेमुळे रे फाटकी संपून गेले ते नेत्यांचे कोरे दौरे अन् पंचनामे गाड्याघोड्यांचा तो ताफा देखील माघारी परतला आकडे मोड केली फक्त कागदी चेक माझा तो कोराच पडला.. चेक माझा तो कोराच पडला.... @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #चेक_माझा_तो_कोराच_पडला
Shru-Bhore
भिजु नको म्हणुन सांगणारे त्याला आता कोणी ना राहिले , अाज पडत्या पाऊसात मी पाऊसाला पाहिले ; चिंब करण्यास त्यास धरतीही पुरली नाही ,कारण विचरल्यावर म्हणाला माझ्या हक्काची छत्री डोईवर नाही; त्याला धरतीने विचारले तुला भिजायची काय गरज आहे , तोही हसुन म्हणाला चालायचचं पाऊसाळा दिवस आहे ; भिजण अती झाल्यावर देहात थंडी भरली सहन न झाल्याने त्याने आडोशाला दडी मारली ;कसे कोण जाणे आले तिथे कोणी ,प्रेमाच रागवण ऐकल्यावर पाऊसाचेही हसे झाले; चिंब भिजला पाऊस तेथुन निघुनी गेला , जड अंतकरणासह मन मात्र कोरडेच ठेऊन गेला .
Gaurav Dalvi
मावळे फक्त शिवाजी महाराजांचे...🚩🚩 l राजाचा ध्यास जंजिरा l l घेऊन साध निघाला मावळा लढायला l l अभेद्य च्या भक्कम बुरुजावर भगवा फडकावायला l l मराठा मर्द छातीचा भंडारा लावला माथ्याला l l पाटीवर हात शिव विचारांचा करून नमन शंभु राजाला l l गनिमी कावा ठेवून रक्तात शिरतो शत्रूच्या जबड्यात l l गद्दारीचा आळ शिरावर फितुरीचा डाग l l बदनामीच्या उसळत्या आगीत जाळतो स्वतःचा अभिमान l l स्वामीनिष्ठेच्या त्या कठोर दुबळ्या मनाची करतो तयारी l l काबीज करण्या जंजिरा घेऊन कल्पना शंभुची l l उतरला पराक्रमी योद्धा करण्यास सिद्धीला उध्वस्त l l सुगावा लागू न गावला लांडग्यांच्या कळपात l l दिव्य ते करून शौर्य गर्जला तो नडला गुर्म्मित l l हरला तो फसला मावळतीचा सूर्य दिसला l l वक्त त्याचा संपला सिद्दीने मस्तानीशी छाटला l l अखंड जंजिरा हादरला दगडाचा देह स्वराज्यासाठी मेला l l अखेरीस मावळ्यातून मावळून गेला कोंडाजी बाबा वीर योद्धा l l अखेरीस मावळ्यातून मावळून गेला कोंडाजी बाबा वीर योद्धा l मावळे फक्त शिवाजी महाराजांचे...🚩🚩
मावळे फक्त शिवाजी महाराजांचे...🚩🚩
read moreAkash shyam yadav
पुन्हा तिचीच आठवण,,,, आज पाऊस पहिल्या सरीत पुन्हा तिचीच आठवण करून गेला,,,,, आठवण करुनी पहिल्या सरीत स्पर्श तिचा होत राहिला,,,।। स्पर्श होताच गाली, तिचीच आठवण करून गेला,,, म्हणून,,,, सतत पाऊस थेंबा थेंबात आठवण पुन्हा तिचीच करुन गेला ,,,,।। मनी ध्यानी , आठवणी करुनी आभाळातून थेंबा थेंबात बरसुनी, मातीमधूनी गंध तिचाच होत राहतो,, काय सांगू , काय वाटे,,, काय सांगू , काय वाटे,,, या मना,,,,,,,,,,,,,, कधी रडवतो, कधी हसवतो कधी रडवतो, कधी हसवतो कधी तिच्या सोबतचे क्षण आठवूनी नभ ओले करून जातो,,,, असाच पाऊस येतो जातो आभाळातून बरसत राहतो, आभाळातून बरसुनी मनी पुन्हा तिचीच आठवण करत राहतो,,,,।।।।
Dilip Jain
------- अनोखे गेट टुगेदर --------- लेखक--- C.R. . दिलीप जैन मो नं 9923101041 ***************************************** आज रविश एलीफेंटा ला आला होता, सोबत त्यांचा काॅलेज च्या मित्रांचा ग्रुप होता, आता
read more#pranLee
तुझी प्रत्येक सवय आवडू लागली तुला बघण्याची आस वाढू लागली खूप वळण घेतली तुला पाहण्यासाठी, अखेर तू दिसली, मला बघून मनात हसलीस, तुझे हसणे आपल्यातील दुरावा दूर करून गेला, आणि पुन्हा पुन्हा तुला बघण्याची आस मनात जागवून गेला...
Bhaurao Palekar
विश्वासघात जंगलात एक हरिणीचे पाडस चरत होते. अचानक तेथे एक चित्ता आला. पाडस जीव वाचविण्यासाठी दाट वेलीच्या जाळ्यात घुसले. त्याला पकडण्यासाठी चित्ताही त्या जाळीत घुसला. पाडस छोटे होते ते सहजच जाळीतून पळून गेले. मात्र चित्ता अडकून बसला. त्याच वेळी एक शेतकरी तेथून जात होता. चित्त्याने शेतकऱ्याला त्याला जाळीतून काढण्याची विनंती केली. परंतु शेतकरी म्हणाला," तू जंगली प्राणी ! तुझा काय भरवसा ! तुला सोडल्यावर तू मलाच खावून टाकशील." चित्त्याने तसे करणार नाही असे आश्वासन दिले. शेतकर्याने त्याला मुक्त केल
read moreविशाल मोरया
चातकाची तहान भागवून पाऊस खूप दूर निघून गेला होता .... तिच्यासाठी असलेला तो "आडोसा " माझ्यासाठी अनेक आठवणी सोडून गेला होता,,, असं होतं माझं प्रेम, जो एका पावसात भेटलेला होता... प्यासा झालंला हा वेडा,तुझ्या एका थेंबासाठी तरसला होता... फक्त तूच
फक्त तूच
read moreChetan Khedkar
C.K Diary.. आजचा पाऊस मला काहीसा लागुन गेला.. तिच्या आठवनीने मला नाहीसा करून गेला.. पन नाही सोबत दोघांची होती नाही वाट दोघांची होती.. बस प्रेम माझयासाठी एक अंधश्रद्धा आहे.. एवढच न बोलता सांगुन गेला.. By C.K Chetan Khedkar
उनाड बोरकर
सरता सरता पाऊस, हाहाकार माजवून गेला. काठावरचा गाव माझा, पाण्यात बुडवून गेला. रातभर कारभारीण, पावसासंग भांडत राहिली. लेकराला घेऊन उराशी, पाण्यातून वाट काढत राहिली. होतं-नव्हतं सारं, वाहून गेलं कालच्या पुरामध्ये. आजतागायत कृष्णामाई, शिरली नव्हती घरामध्ये. मोडलं घराचं छप्पर, कोसळल्या चारी भिंती. दगड-विटांच्या ढीगाऱ्याखाली, संसारास मूठमाती. खांबावरची 'बा'ची तसबीर, मात्र हारासकट वाचली. उध्वस्त घरटं पाहून, माझी माय आतून खचली. माणसानं माणूस तेवढी वाचवला, गुरं-ढोरं गेली वाहून. अंगणातील तुळस उभी राहिली, वृंदावनी घट्ट पाय रोवून. लेकराचं दप्तर-पाटी, चिखलामध्ये शोधतो आहे. ओसरलेल्या आभाळाकडे, सावली तेवढी मागतो आहे. आता काळी माय माझी, आभाळ पाहात बसते. कोसळलेल्या पिकांना, जगण्याचं बळ देत बसते. एकलव्य