Nojoto: Largest Storytelling Platform

Best आईबाबा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आईबाबा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 8 Followers
  • 7 Stories

Shankar Kamble

बाप आभाळ आभाळ माय जमीन ओलती
पेरा सुखाचा रुजण्या ऊनं, वादळ झेलती

बाप गळ्याचा कासरा माय पान्ह्याचा हंबरा
ओढ देतो ओढावतो जसा घराचा उंबरा

बाप जळणारा दिवा माय मिणमिण वात
जशी सावली उन्हाची एकमेकां दे सोबत

बाप काटेरी फणस गरे मधाळ ती माय
थोपटवी,झोपटवी घट आकारत जाय

बाप पहाड खंबीर माय सुईतला धागा
हळूवार सांधतसे उसवल्या खोल जागा

बाप उरांत हुंदका माय आसवाचा पूर
रित्या ओंजळी भरल्या थवा पाखरांचा दूर

बाप कळस राऊळी माय गाभारा देवाचा
होवू कसा उतराई? श्वास गहाण पायाचा

©Shankar Kamble #Flower #आई #बाप #वडील #माया #माय #आईवडील #आईबाबा #आईची_माया #प्रेम

Aakash Udeg

आईबाबा...

बऱ्याचदा आयुष्यात खचतो मी,
आई...तेव्हा तुझीच कुस शोधतो मी,
बऱ्याचदा रस्त्यात धडपडतो मी,
बाबा...तेव्हा तुझाच हात शोधतो मी,

होत असं बऱ्याचदा,
जग सार विरूद्ध भासत,
मग होते जाणीव तुमची,
आणि जग सार इवलुस वाटत.
 #मराठी #मराठीलेखणी #आईबाबा #yqbaba #yqdidi 
#newwritersclub 
Drop a ❤️ if you feel my words 😉

Rashmi Hule

Meaning :- जिसका श्वास हु 'मै' वो मेरी "माँ " जिसका विश्वास हु 'मै' वो मेरा "बाबा" मेरे जिवन को आपने आकार दिया है आपका ये कर्ज़ मै कैसे उतारु.... #आईबाबा #मी #yqtaai #yqdidi #yqbaba #bestyqmarathiquotes

read more
विश्वास ज्याचा' मी'तो माझा "बाबा" 
श्वास जिचा 'मी' ति माझी "आई" 
दिला माझ्या आयुष्याला आकार 
कशी होऊ तुमची उतराई....  Meaning :- जिसका श्वास हु 'मै'
वो मेरी "माँ "
जिसका विश्वास हु 'मै' वो मेरा "बाबा"
मेरे जिवन को आपने आकार दिया है
आपका ये कर्ज़ मै कैसे उतारु....
#आईबाबा #मी #yqtaai #yqdidi #yqbaba #bestyqmarathiquotes

kalyani dhabale

#guru #Family #friends #Love family

read more
respected all guru....

आयुष्याचे पहीले पाऊल टाकण्यापासून ते
आयुष्याच्या प्रत्येक नागमोडी वळणावर चालणे शिकवणारे  माझे गुरू..#आईबाबा
आयुष्य जगताना मिळणाऱ्या माणसांना आपलस करून सोडण..आणि त्यांना जपणं शिकवणारे माझे गुरू #दादा didu आणि फादर nil(jiju)
जीवनाचे गणित शिकवणारे व माझ्या ज्ञानाचे घडे  भरणारे...माझे आजपर्यंत लाभलेले सगळे गुरु....#respected teacher
माझे दुःख वाटून सुखात बदलविनारे..रक्ताचे नाही तर स्नेहाचे नाते जपणारे माझे स्नेही #caring frdss
ह्यांना गुरु पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा....











_kalyani dhabale #guru #family #friends #love #Nojotofamily

lifehacker_marathi

Aakash Sharad Padvi

 #आईबाबा

Shivram Masurkar

चार शब्दासाठी चार ओळी
चार ओळीसाठी चारही वेद चाळले ...
आई बाप या शब्दासाठी
चार वेदही अपुरे भासले .. #आईबाबा

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile