Nojoto: Largest Storytelling Platform

Best सगळं Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best सगळं Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutदोघात तिसरा आता सगळं विसरा, सगळं करून भागले, सगळं होतं, आपलं सगळं, सगळं कळत,

  • 13 Followers
  • 31 Stories

Sani Bhosale

read more
बाप्पा, बुडलं सगळं घरटं 
घरट्यातलं सगळं बुडून सडून गेलं
घरट्यातलं एक पिल्लु 
आईच्या कुशीतच मेलं
उरल्या पिलांना तरी वाचवना
बाप्पा आता तरी तू येणा

आईचा अन गाईचा एकच हंबरडा होतोय रे
एका बिस्किटापायी बाप माझा
गळ्या इतक्या पाण्यात जातोय रे
डोक्या इतक्या पाण्यात
आता एक थेंब पण आसवांचा बघवेना
बाप्पा आता तरी तू येणा.

किती जणांचे केले विसर्जन पाण्यात
कित्येक जणांना मारलं पाण्याविना
पाणी हेच जीवन
पाण्यासाठी अन पाण्यामुळे मरण तू थांबवना
बाप्पा आता तरी तू येणा

                                 सनी भोसले
                                      १०/०८/२०१९

Krushnarnav

#आठवण #एकटेपणा #अबोल_प्रेम #प्रेम_कविता तुझी आठवण आली की एकटं उदास वाटतं... कधीतरी नकळतच पाणीही डोळ्यात दाटतं... जीव लागत नाही आणि

read more
तुझी आठवण आली की
एकटं उदास वाटतं...
कधीतरी नकळतच
पाणीही डोळ्यात दाटतं...

जीव लागत नाही आणि
खायला ऊठतं घर...
हे एकटेपण सोडलं तर...
बाकी सगळं ठीक आहे...!

Read in caption.... #आठवण #एकटेपणा #अबोल_प्रेम #प्रेम_कविता

तुझी आठवण आली की
एकटं उदास वाटतं...
कधीतरी नकळतच
पाणीही डोळ्यात दाटतं...

जीव लागत नाही आणि

Yogesh Hiwrale

एक आठवण रोजची

read more
"आज सहज बसलो होतो, त्या नदी च्या काठी,
आठवल्या तुझ्या नि माझ्या भेटी गाठी.

पाण्याचा बहाणा करून, कशी चोर पाउलांनी 
येत होतीस.
मी दिसताच, सोबत आणलेली घागर, रिकामीच
नेत होतीस.

तू शतदा केलास प्रयत्न, माझी वाट पाहण्याचा.
तू शतदा केलास प्रयत्न, माझ्या आधी येण्याचा.
प्रयत्न तुझा फसत असे,नदी काठी तुझ्या आधी
 मीच तुला दिसत असे.

राग ही तुझा किती देखणा असायचा 
माझ्या पायात रुतलेला काटा तुझ्या डोळ्यात सलायचा
सगळं चित्र डोळ्यासमोर स्पष्ट दिसत होतं आज
एकटाच होतो म्हणून नदी समोर वाटली थोडी लाज

तू  दिलेली रबराची अंगठी, अजूनही माझ्या, करंगळीत आहे.
सोनंचांदी,सगळं खोटं,हीच खरी संपत्ती माझ्या ओंजळीत आहे
आता कारणमीमांसा कशाला,होईल मोकळा, कधी हा श्वास
केव्हा तरी येईल दिवस तो,हीच एकमात्र  आस " एक आठवण रोजची

अश्लेष माडे (प्रीत कवी )

read more
मला हेच वाटतंय कधीकधी, 
आजपर्यंत जे माझ्या मनात दडलं आहे, 
ते कुणालातरी सांगावं, 
माझ्या काळजातलं सगळं गाळ उपसून काढावं, 
जड झालेलं हे मन हलकं करावं, 
वाहून जावू द्यावं सगळं भळाभळा 
मनाच्या बाहेर, 
पण, कोणाला सांगावं? 
कोण माझ्या भावना समजून घेईल? 
भेटेल काय कुणी ज्याच्याजवळ खरंच वाटेल 
की, हे आपलं मन हलकं करावं, 
खरच वाटतेय कधीकधी 
मनातलं सगळं सांगून टाकावं... 
आणि मोकळं व्हावं ह्या गर्दीतून.. 
(प्रीत )

Suraj Solanke

read more
...ती...

अशी असावी ती ' तशी असावी ती 
सारेच करतात की विचार कशी असावी ती....
मोहक तिचे डोळे असावे ..
मादक तिचे ओठ असावे...
सुंदर तिचे बोल असावे...
गाल तिचे गोल असावे...
पाहताच क्षणी तिच्यात हरवून जावं
असं सगळं काही तिच्यात असावं....
पण हे सगळं काही नसले तरी चालेल...
फक्त सुंदर तिचं मन असावं....

                                        Suraj B solanke
                                         8485831418

Geetashri Alagundagi

read more
कुणी आपल्याशी बोलत नाही मग आपण का त्यांच्याशी बोलायचं ?
गरज म्हणून ? का कशाला करून घ्यायची 
कुणाची ही सवय इतकी की त्यांची गरज /उणीव 
आपल्याला भासावी....
हे सगळं, काही दिवसांपासुनच ठरवलेली मी 
त्याचा विषय आल्यावर मात्र सगळं विसरते ......

SD writes

कधी कधी आपण
खुपच गुंतुन जातो ना
एखाद्या व्यक्तीमध्ये
अपेक्षा करत राहतो...

पण अचानक असं 
काहीतरी घडतं
की आपण अपेक्षा 
केली हेच चुकलं
असं वाटत राहतं....

कधी त्या व्यक्तीला 
आपण नकोसे होतो
हेच समजत नाही
सगळं बंद करता येतं
फोन मेसेजेस सगळं...

पण मनाचं काय?
ते तर गुंतलेलं असतं 
आठवणीत त्या व्यक्तीच्या 
आणि आठवणी
सोबत असतात कायमच्या
आपण नकोसे असलो तरी..

शब्दस्नेह 
शुभांगी दिक्षीत  #प्रेम #अपेक्षा #आठवण #मन #क्षण

Sonal Darunkar

read more
मन

वेड मन डोलकावनार,
आभाळात असलेल्या ढगांसारख,
उंच उंच उडनार,
शहरणार, थरथरणार,
कधी कधी अचानक कोसळणार,
थेंबाचा वषाव करणार,
सगळं काही पटापट सांगून मोकळं होणार,
तर कधी स्वच्छंदि आणी स्तब्ध,
कधी पारदषी काहीही न लपणार,
तर कधी काळकुठ, गजबजलेलं ,
सगळं गुपित सांभाळून ठेवणार.




सोनल दारूनकर.

Vinayak Das

#Involvement is needed

read more
गुंतण महत्वाचं.कळतयं पण... 😊 पण आलाचं ना. हो, कळतयं पण भीती वाटते.. नाहकच असेल कदाचित पण आहे. आजच पहिल्यांदा भेटलो आणि गुंतलो.. खुप बोलावं वाटतं अश्या वेळी, पण विषय सुचतं नाहीत. तसे मला सावरायला जुने प्रश्न दिमतीला येऊन उभे होतेच या ही वेळी. 'तिला काय वाटेल?''काही गैरसमज तर नाही ना करुन घेणार ती?''हि पहिलीच भेट खरं तर, ही योग्य वेळ आहे का?' आणि तोच जुना प्रश्न 'खरंच आहे का आपली पात्रता,त्या योग्यतेची?' आणि या सर्वांसोबत एक नवाच प्रश्न आज नव्याने आला, 'तू पुन्हा प्रेमात कसं काय पडू शकतोस, काय ही तुझ्या पहिल्या प्रेमाची प्रतारणा तर नाही ना?' (खरं तर हा प्रश्न निरर्थक, पण तरीही आपलं अस्तित्व सिद्ध करून गेला)

प्रश्न, पहिलेही मला निशब्द करायचे आणि आज ही त्यांनी तेच केलं.ती मात्र निर्भिडपणे माझ्याशी संवाद साधत होती. शेवटी आपलंच मन आपली गोची करतं हे मात्र खरं. मी फक्त तिच्या प्रश्नांना उत्तर करत होतो. तिच हसणं न्याहळत होतो, कदाचित ती माझ्या अवघडलेपणावरचं तर हसंत नाहिये ना, असं ही वाटुन गेलं. पण छे हो, इतक नितळ, निरागस हास्य ते, त्यावर इतका कोता संशय घ्यावा.. माझीच मला लाज वाटली. मी निर्धाराने भावनांना सावरून होतो. भीत सुध्दा होतो... काय सांगव, हा बांध कधी तुटेल ही. बराच काळ या सुख वर्षावा भिजत असतांना, वेळ आपलं कार्य साधतचं होती, अविरत वाहण्याचं. खरं तर ज्या वेळी वाटंत असत, वेळ जरा काळ थांबावा तो तेव्हाच इतक्या लवकर निघुन जातो ना.... असो, दोन तासच ते, फक्त तिच सोबत असणंच, मनाला उधाण देणारं होतं... गुतांयच नाही अस मनाशी ठरवलेलं असतांना ही, तिच्यात नकळत गुंतत जाणं, अनोखं होतं, विस्मयातीत करणारं होत,

बाकी सगळं विसरायला लावणारं होतं. आज हे सगळं तुला सांगायच ठरवुनच आलो होतो, शेवटी तुच तर हक्काची मैत्रिण आहेस ना माझी...

माझ्या प्रिय डायरीस्

तुझा 'राही औरंगाबादी' #involvement is needed

Suraj More

पहिलं प्रेम

read more
ते पहिल पहिल प्रेम
ते पहिल पहिल प्रेम
आणि त्या निरागस आठवणी
हळूहळू प्रेम फुलत गेलं आणि मोठ्या छोट्या भेटी हृदयावर गडद रंगाचं प्रेम चढू लागल हळूहळू 
नंतर काहिसं अस झाल बदलू लागल्या काही गोष्टी दुरावा  वाढू  लागला  आणि  शांत  होऊन गेल्या रात्री
बोललो;खुप झाल आता,जाऊ आणि  समजवू
 सगळं जे झाल ते  विसरुन  सूरू कराव नविन सगळं पण; ऐकून  निशब्द झालो; ती बोलली मी तुज़सोबत नवतेच कधी; जी होती ती हे जग सोडून कधीच गेली.                    
                             पहिलं प्रेम पहिलं प्रेम
loader
Home
Explore
Events
Notification
Profile