Nojoto: Largest Storytelling Platform

Best मी_एक_शापीत_जोकर Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मी_एक_शापीत_जोकर Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 3 Stories

शब्दवेडा किशोर

#मी....हुकमी एक्का की शापीत जोकर..प्रश्नचिन्ह आहे ना..??
मोकळ्या माझ्या जिवाला या फक्त इतका घोर आहे
पाय मागे ओढतो जो कोणता तो दोर आहे
घातला आहे दरोडा काल ज्याने माझ्या काळजावर
तो दडी मारून बसला आत उरात माझ्या तो असा कोण चोर आहे
संपला हा श्रावण ओल्याचिं त्या सरींचा अन् संपला आषाढही तो
नाचतो आहे तरीही जिंदगीचा हा मोर आहे
ढाल आहे भंगलेली मोडली तलवार आहे
छाटल्या बाहूत माझ्या पण अजूनी जोर आहे
रापलेल्या चेहर्‍यावर या माझ्या लोकहो जावू नका
एक छोटेसे कोवळेसे पोर आहे अंतरात माझ्या
तू जरी विसरून गेली ते बेभान असे कोरडे आभाळ माझे
मी तुझी सांभाळली अद्यापही ती नवरत्नांची एक कोर आहे
दिधलेस शापीत एकटेपण हृदयास माझ्या
तरीही तो मी मानला माझा अभिमान आहे
दुनियेच्या गर्दीतल्या असलेल्या
एकटेपणात माझ्या मी आजही
कुणासाठी हुकमी एक्का तर कुणासाठी
एक शापीत जोकर आहे
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #मी_एक_शापीत_जोकर

शब्दवेडा किशोर

#गुज हे तुझ्या-माझ्या अनोख्या प्रितीचे....

मनात माझ्या गुज प्रीतीचे
चटकन उमलती पटकन मिटती
तु सदा मज कोड्यात जगवते
म्हणून माझ्या आयुष्यास एकटेपणाच्या
शापांच्या नजरा ह्या लागती
आजही मी तुझ्यातच खुलतो
अन् तुझ्यात विरघळतो
तरीही तु ही वेडी प्रीत ना जपती
तुझ्या हृदयी मी असूनही खुळ्यागत
तु मज जगी शोधत फिरती
माझ्या अस्तित्वाचे खूप प्रश्नचिन्ह आहे
पण ते ना कधी तु स्वतःस समजावती
सदा स्वतःचा ठेका जपूनी मला आजही
सदोदीत दुःखाच्या असंख्य झळा
तुजकडूनच मिळती

©शब्दवेडा किशोर #मी_एक_शापीत_जोकर

शब्दवेडा किशोर

माझे मलाच आता शापीत पाखरागत 
हे जगणे कबुल नाही
हलक्या कलेवरांचे मजभोवतीचे
असे फिरणे कबुल नाही
भरल्या खतावण्या ह्या
काळ्यानिळ्या वळांनी
ही टवटवीत दु:खे
अजुनी मलुल नाही
सांगु कशास आता जगण्यास
जगण्यातल्याच माझ्या मी लाख सबबी
शब्दांस आजही मी नटवी पण
तयास आता तो आधीची मखमली झुल नाही
मिटल्या पापण्या मना पटेना
ही हुल कौतुकाची
गुंतेल पाय अनाहुत कुठल्या वळणावर
असले मज कुठलेच खुळ नाही
शापीत एकटा जोकर मी या
दुनियेच्या रंगमंचावर
मी सदा अससे सर्वांचा पण
बहुधा मजला माझं असं कुणी नाही
सोसुनी दुःख सदा मी दुनियेसमोर हसणार
अन् सतत स्वतःच्या मनास सांगणार की
येऊ दे कितीही खडतर वेळ पण 
मी डगमगणार अन् खचणार नाही

©शब्दवेडा किशोर #मी_एक_शापीत_जोकर

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile