Find the Best जणू Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutवो जो आँखों से एक पल ना हो जणू, जणू देह ही पंढरी lyrics, आकाशाची जणू परी ही, चंद्रिका ही जणू, गुड नाईट जणू शायरी,
राकेश डाफळे...
*पाऊस मात्र पडत होता..* ओढ लागली होती पावसाची, सर्वजण वाट पाहत होते आतुरतेने... एकदा तरी बरसना, अशी विनवणी करत होते... माय अनवाणी फिरत होती पाण्यासाठी, शेतकरी राजा तडफडत होता... अचानक आभाळ भरून आलं,
read moreVaibhav Mirgal
"शृंगार साज " नटण्याची ना हौस तुला, नाही शृंगाराची गरज । अशी लाखात एक देखणी तू, वेगळा तुझा साज ।। नितळ शुभ्र कांती तुझी, किती तेजोमय दिसते । जणू राणी पद्मिनी माझी, मलाच तू भासते ।। नाक जणू चाफेकळी आणि ओठ गुलाबपाकल्या । चिंचपेटी ती मोत्याची, उठून दिसते तुज्या गळ्या।। नाजूक नाकी शोभे नथ, माथी कुंकू चंद्रकोर । हाती वसे चुडा कंकण, शालूला का कुणाची सर ।। पायी पैंजण चांदीचे, करती तालात छमछम । कुडी कानात शोभती, कशी लाजती चमचम ।। वेडे बघ ना जरा, समोर मढवलेल्या दर्पणात । तो ही म्हणतो कसा ? फिकी पडेल रंभा क्षणात ।। मज करिती नयन घायाळ तुझे, होता एकमेका नजर । छेडून जाते हृदयाची तार, भरूनी येतो प्रणयाचा हुंकार ।। झालो मी बावरा आता ,तुझी स्तुती करता करता । शब्द शब्द जोडून सारे, झालो निःशब्द मी आता ।। ...वैभव सुरेश मिरगल
Mahesh Lokhande
जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र माझा इथेच झाला परमप्रतापी थोर शंभूराजा सह्याद्रीचे कडे गर्जती ह जय जय शिवराय दरीदरीतून नाद घुमतो हरहर महादेव स्वराज्याचा मंत्र म्हणत लाख अर्पिल्या माना स्वातंत्र्यास्तव मरण जिंकीती हाच मराठी बाणा हिंदवी स्वराज्याचे स्वप्न इथे झाले साकार इंग्रजांविरूध्द इथेच बनले थोर प्रतिसरकार अजंठ्याचे सुंदर लेणे जणू नाभीतली कस्तुरी पराक्रमाची कथा सांगते रायरी देवगिरी मुंबई ती जललहरीवरती जणू मोती समुद्रात अरबीसमुद्रे मंथुनी काढिले जणू ते नवनीत कोकणकिनारा फळाफुलांनी नटला स्वागताला सुंदरता ती मोह घाली सदा समुद्राला भव्यरूप घेऊन सह्याद्री रोखे परकीयांना नरदुर्गांची सोबत त्या दिसे भव्य सेना उड्या घेती कड्यावरूनी नद्या दख्खनपठारावर काळी आई खेळ खेळवी अंगा खांद्यावर कृष्णा भीमा गोदा विणती सुंदर हिरवे जाळे बंधूप्रेमाने येथे बहरले माणुसकीचे मळे कवी-महेश लोखंडे जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र
read moreMahesh Lokhande
वर्षाराणी आभाळ भरलं ढगानं सार्या वीजही नाचू लागली गडगडाटी वाद्यांसोबत वाजत गाजत आली वर्षाराणी आली गड्यारे वर्षाराणी आली अमृतथेंब बरसू लागले धरतीही मोहित झाली हिरवाईचा साज लेवुनी सज्ज स्वागता झाली इंद्रधनुचा हार घालुनी हसतमुखाने आली पशूपक्षी नवमृदगंधाने हो पहा चकित झाली जलमोती पिऊनी ताजे पालवी फुलून गेली झाडे वेली चिंब होऊनी मोहरूनीया गेली पाने टवटवली सारी रस्त्यांची स्वच्छता झाली नवनिर्मितीची जगी जणू जणू दिवाळी आली वर्षाराणी
वर्षाराणी
read moreShani Rathod 007
Happy Birthday Sonu Nigam आयुष्यात जिंकाल तेव्हा असे जिंका की जणू जिंकायची सवयच आहे... हराल तेव्हा असे हरा की जणू सतत जिंकायचा कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहोत!...
Govinda Polad
काय जणू चांदणे डोळ्यांत तुझ्या मी पाहिले बांध सारे तोडुनिया अश्रू माझे वाहिले स्वप्नातली अप्सराच तू पायी पैंजण घातले स्वर माझ्या तारकांचे होऊनी गुलाम राहिले आसमानाच्या स्पर्ध्येला सह्याद्रीची जणू डोर तू काळ्याशार नभांवर उमटलेली चंद्राची जणू कोर तू विरलेल्या मृगजळाचा जणू परिभास मी जाणला क्षीण झालेल्या देहाला श्वास कसा तू आणला - गोविंद अनिल पोलाड ( विद्रोही कवी विचारमंच )
Shivani Tonpe
I never ❤ती नजर भेट 💑👀 आज तो दिवस आला ज्या दिवसाची मी वाट पाहणं कधीच सोडून दिलं होत पण आज अंगावर कोणी मोहिनी फिरवावी आणि सगळं जग विसरून त्या सुंदर मोहक मंतरलेल्या जगात आम्ही दोघेच असाव अस काहीस झालं.....त्याची नजर जणू त्या एकांतात मला काही सांगत होती पण मी वेडी मात्र पहिली नजरानजर होऊन पुन्हा घाबरून त्याच्या आकर्षित कासावीस नजरेला भेट देण्यास विरोध करत होते....पुन्हा तो मोहक क्षण मला अनुभवायला मिळेल का...? पुन्हा हे मनमोहक जग मला पाहायला मिळेल का...? तो जरी असला तरी आताची ओढ पुन्हा असेल का....? साऱ्या प्रश्नांनी अगदी डोक्यात कल्लोळ केला होता....पण त्याची नजर मात्र माझ्या कडून काही केल्या हटली च नाही....मन तर केव्हा च जाऊन त्याच्या कडे पोहोचलं होत पण शरीर मात्र तिथेच प्रश्नांचे कोडे सोडवत विचार्गरस झाले होते....त्याची नजर माझे मन असे भेटले की जणू चंद्राला चांदणी गवसली....चाकोराला दुष्काळात सुनामी यावी....आणि आमच्या निस्वार्थ प्रेमाची कळी आज पुन्हा उमलली.. त्याचे निरागस डोळे आणि माझे सौरवैरा झालेलं मन दूर असून ही एकमेकात गुंतून केव्हा सुखद संपले होते....पण माझी नजर जी त्याला पहिल्यांदा भिडली खरच संपूर्ण ब्रम्हांड आमच्या प्रेमावर फुलाची उधळण करत असल्याची पाऊती मात्र नक्कीच मिळाली पुन्हा हा क्षण येईन याची आता पर्वा नाही पण ही भेट नजरेस थेट होऊन अगदी हृदयाच्या खोलवर जाऊन नवीन जग करून बसली आणि आखं आयुष्य आज मी काही क्षणात जगले याची खात्री मात्र नक्की च झाली😌❤ शिवानी टोणपे🙏🏻😊 नजर भेट❤️😞
नजर भेट❤️😞
read morePrashant Kadav
......तू..... आज प्रवासामध्ये भेटलीस तू भासलीस जणू काही स्वप्नातील स्वप्नपरी तू सतत हसतेस गालातल्या गालात तू हसून करतेस समोरच्याला घायाळ तू बोलण्यातून भासते जणू एक स्वप्नपरी तू एक नजर पाहताच कोनालाही भुरळ पाडणारी तू भुरळ पाडून त्यालाही आपलंसं करणारी तू आपलंसं करून बहुतेक नेहमीं सोबत राहणारी तू प्रत्येक गोष्ट किती भाऊकतेने सांगणारी तू सांगूनही सतत बडबडणारी तू एवढं सर्व असूनही career ला प्राधान्य देणारी तू काहीतरी करून दाखविनार एक चमकदार व्यक्तीमत्व तू बघ बसल्या बसल्या तुझ्यावर कविता करायला भाग पाडलस तू जीवनात अशीच राहा हॅपी shappy तू हसून करत रहा संकटांचा सामना तू नक्कीच यशस्वी होशील जीवनाच्या शर्यतीमध्ये तू....👍💐 एक स्वप्नवेडा(PK) #intraveling#dontknowthegirl#justwanttodothis#fun
Swapnil Pawar
हवेत विरलेला एक एक आठवणींचा क्षण, दरवेळी एकांतात त्यालाच शोधत असते माझे मन. कणाकणात सामावल्या जणू कित्येक कडू गोड आठवणी, सदैव अवती भवती रेंगाळतात काहीच नसतांना ध्यानीमनी. हळूच एखादी आठवण वाऱ्याची झुळूक होऊन येते, जुन्या कुठल्यातरी दिवसांची ती एक चाहूल मनाला देते. भुलवून जातं मनाला जणू त्यातलं सारं जग तिथे अवतरते, हसू येत आपसूकच अन मन आनंदाने बहरते. त्या काल्पनिक पात्रांना स्पर्श करावा वाटतो, पण ते तर असतं मृगजळ नुसतंच मनाला चकवते. ©स्वप्नमयी #martahi #poetry #swapnmayi
Kiran Kshirsagar
*गुलमोहर* त्या रणरणत्या उन्हात गुलमोहर रक्तलालिमा लेऊन सर्वांगावर बहरून आला नव्याने अंगोपांगी भासतो जणू तो ध्यानस्त योगी निष्पर्ण जरी तो झाला असला फुलाफुलांनी खूपच डवरला लपेटल्या ज्वाला सा-या देहावरती चिताच पेटली जणू धगधगती ग्रीष्मातही त्याचे खूलते किती रूप पानगळ होऊनही दिसेना कुरूप वर्ण त्याचा कसा गर्द लाल भडक आग अोकतो जणू सुर्यावरच तडक डोईवर घेई तप्त ग्रीष्माच्या उन्हाला सावली शीतल तरी देई वाटसरूला डोईवर बांधला जणू शेला लाल लाल दिमाखात उभा जसा राजाचा महाल *किरण क्षीरसागर* *नाशिक* #NojotoQuote