Find the Best तरीही Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutतरीही word in english, तरीही meaning in english, चुकली दिशा तरीही आकाश एक आहे, तरीही इन हिंदी, तरीही मीनिंग इन इंग्लिश,
bhakti
मिळालेल्या कडूगोड अनुभवांना अगदी दाबून ठोकून ऊभं केलंय घरांच्या मेढी म्हणून... तरीही चुकार आठवणींना मात्र संयम कसा तो माहीतच नाही.. कधीतरी येतात वळचणीतून बाहेर अन् ऊभ्या राहतात खिडक्यांत.. तावदानांचा आवाज होत राहतो सारखा टकटक,... टकटक... टकटक नको नको करतो कानांना.... तरीही वाजतच राहतात केंव्हातरी भुर्रकन उडून जातात मग खिडकीतून... वार्यासोबत ढग बनतात मग गळत राहतात पागोळ्यांतून टपटप...टपटप..टपटप...!! दीप...!!
मानससूत्र
जगणं शाश्वत नाहीये तरीही आपल्याला कुणी "100 वर्षे जगा" म्हटल्यावर आपण खुश होतो.. आणि मरण शाश्वत आहे तरीही आपल्याला कुणी "मर" म्हणलं तर आपण नाराज होतो.. जीवनाचं सत्य ओळखा #जीवन
राकेश डाफळे...
*पाऊस मात्र पडत होता..* ओढ लागली होती पावसाची, सर्वजण वाट पाहत होते आतुरतेने... एकदा तरी बरसना, अशी विनवणी करत होते... माय अनवाणी फिरत होती पाण्यासाठी, शेतकरी राजा तडफडत होता... अचानक आभाळ भरून आलं,
read moreMadhushree Ganu
प्रेम असं संपत नाही.. कोणी आपलं नसलं तरीही.... आता सोबत नसली तरीही.... मधुश्री #प्रेम
Mayur Langi
पाहिलंय मी स्वतःला, स्वतःच्या सावलीसोबत बोलताना, अगणित तारे गगनी, तरीही त्यांना मोजताना ........! पाहिलंय मी स्वतःला, स्वतःच्या स्वप्ननासोबत चालताना, अपूर्ण सारी विस्कटलेली, तरीही सोबत घेऊन फिरताना .......! पाहिलंय मी स्वतःला, स्वतःच्या असण्यावर हसताना, त्रास होत असेल, उभा आराश्यासामोर असताना ......! पाहिलंय मी स्वतःला, स्वतःच्या आयुष्यात जगताना, आनंदी राहण्यासाठी, सुख काय असतं शोधताना ......! पाहिलंय मी स्वतःला, स्वतःच्या हातून हारताना, दुसऱ्यांच्या बगीच्या फुलवता, स्वतःमात्र कोमजता.....! मयुरमेश २८-०५-२०१९
ADITYA CHAVAN
तू मनात असूनही का एवढी दूर आहे.. याचाच त्रास मला आज होतो आहे.. आसवांद्वारे ते व्यक्त करण्याचा, या डोळ्यांचा ही बेत आहे.. तरीही पापण्यांद्वारे त्यांना, अडवून मी ठेवत आहे.. पण कधीतरी बांध मनाचा फुटतो आहे.. मग नकळत अश्रूंचे अनावरण होत आहे.. तरीही येशील तू केव्हातरी अशी, मनाची समजूत मी काढतो आहे.. तुझ्या आठवणींच्या ओझ्याखाली, रोज क्षण क्षण मी मरतो आहे.. तरीही कधीतरी होईल मग आपलेही मिलन, याच आशेवर मी आजवर जगतो आहे.. विरह आता सहन मला नाही होतो आहे.. आपल्या मिलनाची वाट मी बघतो आहे..
Shiva Gaikwad
कुणाचेच नसतात हक्क कुणावर पण... तरीही डोळे भरतातच ना ? मुळात अपेक्षाच करु नये अशा पण.... तरीही आस लागतेच ना ? हिशोब मांडायचा सारा तर आकडे पडतील कमी...., तरीही सुख मोजताना पापण्या भिजतातच ना...??? लाख झाला असेल मनाचा दगड...., तरीही आठवणींनी त्याला पाझर फुटतोच ना....?? जोडलेली नाती तुटताना मनात वेदना होतातच ना ...?? या सगळ्यातनं हाती उरायचे असते शून्य...फक्त एक शून्य.. पण..... तरीही जीव जडतातच ना .....? shivashankar
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited