Find the Best झालो Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutबहिरा झालो या जगी, सैराट झालो जी डीजे सॉन्ग, rangeela झालो जी, चढती झालो दे, पागल झालो,
MANISH MANDAVGANE
😊😊😊 पाहता पाहता मोठे झालो सगळेच गणित बदलत गेले छोट्या छोट्या आनंदाचे क्षण केव्हाच उडून गेले || ☺ आता फक्त आठवणी राहिल्या ते दिवस भरभर सरत गेले छोट्या छोट्या आनंदाचे क्षण केव्हाच उडून गेले || ☺ खेळापेक्षा अभ्यास हि गोष्ट महत्वाची वाटायची नाही 'खेळून झाल्यावर अभ्यास' हि गोष्ट घरातल्यांना पटायची नाही☺ गल्लीमध्ये क्रिकेट खेळणे म्हणजे मोठी धमाल असे दोन दगडांच्या stumpa मध्ये world cup ची मजl असे☺ सागरगोटे,पतंग,भोवरे सोबती सारेच सोडून गेले छोट्या छोट्या आनंदाचे क्षण केव्हाच उडून गेले || ☺ शनिवारच्या सकाळी शाळेचे आवरताना धांदल होई आणि म्हणता म्हणता दंग्यांमध्ये रविवार हळूच निघून जाई☺ वर्गातील भांडणे सोडवताना शिक्षकांच्या नाकी दम येई आम्हाला 'वळण' लावायच्या नादात शेवटी घरात्ल्यानाच 'बाक' येई !☺ आता फक्त वीकेंड आले त्यातले निरागसपण संपून गेले छोट्या छोट्या आनंदाचे क्षण केव्हाच उडून गेले || ☺ स्पर्धेच्या जगातले सर्वात पहिले दहावीचे वर्ष आले पाहता पाहता सर्व सवंगडी अभ्यासाच्या मागे लागले☺ क्लासेस, college, tution च्या गडबडीत 'परीक्षा' हेच उद्देश बनले आणि बालपणीचे सुंदर दिवस आयुष्याच्या डायरीत मागे पडले☺ पाहता पाहता मोठे झालो सगळेच गणित बदलत गेले छोट्या छोट्या आनंदाचे क्षण केवच उडून गेले || ☺ आजच्या मोठ्या income मध्ये साठवलेल्या भिशी ची मजा नाही मधल्या सुट्टीच्या डब्याची चव office च्या lunch -break ला नाही...!☺ आजच्या फोर व्हीलर long drive la सायकल च्या डब्बल सीटची सर नाही रात्रभर मारलेल्या गप्पांची गम्मत आजच्या whats app chatting ला नाही...!☺ गुंफता गुंफता नात्यांचे बंध किस्से सारे आठवत गेले आज थोडे थांबून मागे पाहताना अश्रू माझे ओघळून गेले |☺
mauli pawade
#गाथा_चिंतन सावध झालों सावध झालों ! हरिच्या आलो जागरणा !! जेथे वैष्णवांचे भार जयजयकार गर्जतसे !! गाथा सेवक mp || सार्थ तुकाराम गाथा || ||अभंग क्रमांक ३|| सावध झालो सावध झालो| हरिच्या आलो जागरणा||१|| जेथे वैष्णवांचे भार|जयजयकार गर्जतसे||२|| पळोनिया गेली झोप| होते पाप आड ते||३|| तुका म्हणे तया ठाया| वोल छाया कृपेची||४ || भावार्थ-मी विचाराने निश्चित जागा झालो .म्हणून हरिच्या भजन जागारास आलो .||१||ज्या हरिजागरात वैष्णवांचे समुदाय हरिनामाचा घोष करीत होते ||२ ||त्या नामघोषाने माझी झोप पळून गेली आणि जे पाप भजनास आड आले होते तेही पळून गेले ||३ ||तुकाराम महाराज म्हणतात जेथे वैष्णवांचा हरिजागर चालतो
|| सार्थ तुकाराम गाथा || ||अभंग क्रमांक ३|| सावध झालो सावध झालो| हरिच्या आलो जागरणा||१|| जेथे वैष्णवांचे भार|जयजयकार गर्जतसे||२|| पळोनिया गेली झोप| होते पाप आड ते||३|| तुका म्हणे तया ठाया| वोल छाया कृपेची||४ || भावार्थ-मी विचाराने निश्चित जागा झालो .म्हणून हरिच्या भजन जागारास आलो .||१||ज्या हरिजागरात वैष्णवांचे समुदाय हरिनामाचा घोष करीत होते ||२ ||त्या नामघोषाने माझी झोप पळून गेली आणि जे पाप भजनास आड आले होते तेही पळून गेले ||३ ||तुकाराम महाराज म्हणतात जेथे वैष्णवांचा हरिजागर चालतो
read moreVaibhav Mirgal
"शृंगार साज " नटण्याची ना हौस तुला, नाही शृंगाराची गरज । अशी लाखात एक देखणी तू, वेगळा तुझा साज ।। नितळ शुभ्र कांती तुझी, किती तेजोमय दिसते । जणू राणी पद्मिनी माझी, मलाच तू भासते ।। नाक जणू चाफेकळी आणि ओठ गुलाबपाकल्या । चिंचपेटी ती मोत्याची, उठून दिसते तुज्या गळ्या।। नाजूक नाकी शोभे नथ, माथी कुंकू चंद्रकोर । हाती वसे चुडा कंकण, शालूला का कुणाची सर ।। पायी पैंजण चांदीचे, करती तालात छमछम । कुडी कानात शोभती, कशी लाजती चमचम ।। वेडे बघ ना जरा, समोर मढवलेल्या दर्पणात । तो ही म्हणतो कसा ? फिकी पडेल रंभा क्षणात ।। मज करिती नयन घायाळ तुझे, होता एकमेका नजर । छेडून जाते हृदयाची तार, भरूनी येतो प्रणयाचा हुंकार ।। झालो मी बावरा आता ,तुझी स्तुती करता करता । शब्द शब्द जोडून सारे, झालो निःशब्द मी आता ।। ...वैभव सुरेश मिरगल
Parivartan Jagzap
गुंता आयुष्याचा सोडवावं म्हणलं मग एक-एक गणित मांडत गेलो प्रत्येक वळणाचा graph काढला आराखड्याची अंमलबजावणी केली समीकरणे सखोल पाहिली समिकरणांची उकल काढली प्रमेयांची सत्यता पडताळली सिद्धांतांनी गोची केली नियमांशी संधी केली सगळ्यात माजुऱ्या भूमीतील वाकवलं हवे तसे आकार दिले गणितांची मांडणी अगदी आखीव-रेखीव झाली अन, साऱ्या गणितांना एका पटलावर आणलं अवाक झालो, बेफिकीर झालो, बेमालूम उधळलो, शोधाशोध झाली उत्तरांची माझा आनंद मिळाला, आपल्या नात्याचं गणित मांडलेल्या, हातभरून रंगलेल्या, तुझ्या मेहंदीत…. हातभरू रंगलेल्या, तुझ्या मेहंदीत….
Ashu
रंगात रंगुनी तुझ्या हरवले भान मी तुझ्या हसण्यात स्वच्छंद झालो मी डोळ्यात हरवून तुझ्या तुझे अंतरंग झालो मी रंगात रंगुनी तुझ्या माझाच न राहिलो मी स्पर्श तुझा अनुभवण्यासाठी होळीचा रंग झालो मी तुझ्याच प्रेमरंगात रंगली मी चिंब झालो मी, दंग झालो मी #lovepoem
pravin singare
पापी म्हणून मिरवत गेलो स्वतःला गंगेत न्हाहुन पावन झालो नाही लाटेपरी उसळत राहिलो जन्मभर डोळ्यातील तिच्या श्रावण झालो नाही
Kunal Bane
तू हात दिलास, मी बेफिकीर झालो तू साथ दिली, मी नभ फिरलो तू हाक दिलीस, मी स्पंदनात अडकलो तू श्वास दिला, मी रुजू लागलो तू दिलासा दिला, मी त्यात गुरफटलो तू उजेड दिला, मी त्या खालची सावली झालो तू क्षण दिले, मी आठवणीत गुंतलो तू पेहेराव दिला अन मी तो घेत गेलो पण कुणास ठाऊक तू फक्त एक वादळ होती, अन मी त्यात स्वतःला हरवत होतो, काळजाला घाव देऊन तू परती निघून गेली, अन मी आता तुझ्या विरह पायी मनाला वेदना देऊ लागलो.
Tejas Malpeddiwar
चालत्या या जीवनात एक ठिकाणी येऊनी स्तब्ध झालो. पहिल्या पाऊसाचा आनंद घेणाऱ्या वनासारखा गुंग झालो. जणू मोठ्या वाळवंटात फिरता फिरता एका तळाशी आलो. या भावनांच्या वाऱ्यात मंद झालो. या प्रेमाच्या सुगंधाचा अनुभवात बेभान झालो... बेभान झालो :- तेजस भावना
भावना
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited