Find the Best कधीतरी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutकधीतरी कुठेतरी,
Adi Salunke
कधीतरी ये... कधी आली आठवण तर ये, पण येताना तुझा काही वेळ घेऊन ये... वचनाचा मांडलाय डाव इथ सारा.. मागे फिरून बघ उना पडलाय समुद्र सारा... पाझरेना बघ हा पाषाण ही, हरवलेत अश्रू कोण्या शिंपल्यात तरी, त्या शिंपल्यात मोती बनून ये.. वाटलेच कधी तरी तेव्हा ये, आलीच आठवण तर कधी पण ये, पण येताना मात्र तुझा वेळ घेऊन ये... Dr.words @Adi_salunke 27 ©Adi Salunke #Love #कधीतरी ये#viral #Instagram #reel #miss you
Love #कधीतरी येviral #Instagram #reel #miss you
read moreKunal Salve
कधीतरी.... कधीतरी तुला मनभरून बोलावं मनातलं माझ्या जरासं तुलाही कळावं बोलता बोलता शब्द एक होतील आपले आणि कधी तू माझी चारोळी तर कधी कविता व्हावं ! तुला आवडेल ना आवडेल प्रेम माझं तू एकदा हृदयातून व्यक्त करावं माझ्या हृदयातील स्पंदनांना तू एकांतात एकदा तरी ऐकावं ! भावनांना माझ्या तुझ्या शब्दांनी नकळत मिठीत घेऊन निजावं काही मी काही तू बोलून मग, आसवांनीही बरसून प्रेमात भिजावं ! काय असते जवळीक काय आपुलकी नजरेनं एकमेकांसाठी दुरून अनुभवावं नाही राहून होत दूर ओठांनी पुटपूटता, मिठीत येऊन आपण,हेच प्रेम आहे एकमेकांना सांगावं ! #प्रेमरंग #प्रेम #कधीतरी #मराठी
Sujata Darekar
कधीतरी जीवनात असा क्षण येतो मनाप्रमाणे काहीच घडत नसते संकटे चहूबाजूंनी घेरली असतात मनाची तरी कासावीस सुटत नसते प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों सुप्रभात. आजचं कोलँब आहे कधीतरी... यावर नक्कीच तुम्ही सुंदर लेखन करु शकता. चला तर मग लिहा भरभरुन. #कधीतरी हे टँग करायला विसरु नका. #collab #yqtaai #marathiquotes #marathikavita #marathipoems #YourQuoteAndMine
प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों सुप्रभात. आजचं कोलँब आहे कधीतरी... यावर नक्कीच तुम्ही सुंदर लेखन करु शकता. चला तर मग लिहा भरभरुन. #कधीतरी हे टँग करायला विसरु नका. #Collab #yqtaai #marathiquotes #MarathiKavita #marathipoems #YourQuoteAndMine
read morepooja d
कधीतरी माझा ही विचार करत जा, माझ्या सुखांचा नाही तर मनाचा तरी विचार करीत जा.... कधीतरी तुझ्या स्वप्नात मलाही थोडीशी जागा देत जा अडगळ नाही मी हॉल मध्ये ही कधीतरी घेऊन बसत जा....... माझ्या ओठांचा नाही तर माझ्या डोळ्यांचा तरी विचार करीत जा, ओठ सुकले तर लीप बाम लावता येईल, डोळे सुकले तर कोणताच ड्रॉप काम करणार नाही....... मी आहे तोपर्यंत च फक्त म्हणेल मी, मी नसल्यावर तर तुला नक्कीच आठवेल मी, तेव्हा पश्चताप नको म्हणून आताच जरा, कधीतरी बायको म्हणून माझा विचार करत जा...... #कधीतरी #yqtaai #yourquotetaai
#कधीतरी #yqtaai #yourquotetaai
read more@sAnughrash7275
कधीतरी यावं तिनं... कधीतरी मला माझं म्हणावं तीनं पण ........कधीतरी ©Anuja soni #कधीतरी
Roshan Ingle
कधी तरी मी पण प्रेम करायचो ती कॉलेज ला येईल म्हणून तिचीच वाट बघत बसायचो कधी तरी मी पण प्रेम करायचो तिच्या साठी कॉलेजला लवकर जायचो तिला बघण्यासाठी शेवटी बसायचो तिने बघायला पाहिजे म्हणून नेहमी प्रयत्न करायचो कधी तरी मी पण प्रेम करायचो तिच्या नावाने मित्र सारी चिडवयची हे पाहून ती गालात हसायची दिवसभर तिलाच बघत राहायचो कधी तरी मी पण प्रेम करायचो नंतर दोन महिन्यांनी आली ती भेटायला लग्नाची पत्रिका देऊन म्हणाली नक्की ये तू लग्नाला तिच्याच लग्नात मग मी जेलबी वाटायंचो कधीतरी मी पण प्रेम करायचो कधीतरी मग तिने मला भेटायचं तिच्या मुलांनी मामा म्हणून मला हाक मारायच कुठंतरी बसून मग मी ढसा ढसा रडायचो कधी तरी मी पण प्रेम करायचो _Roshan Ingle #कधीतरी मीपण प्रेम करायचो
#कधीतरी मीपण प्रेम करायचो
read moreRutuja Dorwat
कधीतरी जगून बघावं स्वतःसाठी पण, झुगारून द्याव्या परक्या अपेक्षा, निडर बनवावी नजर स्वतःची, स्वतःची नवी वाट शोधताना। कधीतरी मन मोकळं करावं, तोडून टाकाव्या नाजूक शृंखला, मुक्त होऊ द्यावे शब्द सारे, व्यासपीठ स्वतःचे नवे बनवताना। जगून पहावं स्वतःच आयुष्य, स्वतःच्या मर्जीचे खांब उभारताना, निर्णय घ्यावे चुकून पहावं, कधीतरी स्वतःसाठी शून्यातून जग उभारावं।।
Rutuja Dorwat
कधीतरी जगून बघावं स्वतःसाठी पण, झुगारून द्याव्या परक्या अपेक्षा, निडर बनवावी नजर स्वतःची, स्वतःची नवी वाट शोधताना। कधीतरी मन मोकळं करावं, तोडून टाकाव्या नाजूक शृंखला, मुक्त होऊ द्यावे शब्द सारे, व्यासपीठ स्वतःचे नवे बनवताना। जगून पहावं स्वतःच आयुष्य, स्वतःच्या मर्जीचे खांब उभारताना, निर्णय घ्यावे चुकून पहावं, कधीतरी स्वतःसाठी शून्यातून जग उभारावं।।
शब्द शृंगार 9359164650
नको असतो प्रत्येक वेळी मला तुझा पैसा, तुझं स्टेटस, तुझी संपत्ती तुझ पद मग काय हवं असतं मला.... नक्की काय अपेक्षित असतं मला आपल्या नात्यांला.... काय पाहीजे असतं मला तुझ्याकडून नक्की मला ही सांगता येणार नाही पण हवे असतात तुझे दोन शब्द जिव्हाळ्याचे.... हवी असते ती एक नजर प्रेमाची.... हवा असतो तो एक नजरेचा कटाक्ष खट्याळपणाचा.... तुझ्या केसात गुंतलेल्या मनाला तो गुंता ही आवडतो कारण तो असतो तुझ्याच विचारांचा.... थकलेलो असताना हवी असतात तुझ्या हातांची बोटे माझ्या केसात अन् तो हात माझ्या डोळ्यांच्या पापण्यावर.... कधी कधी घाबरतो मी या निर्दयी जगाला वाटतं तु म्हणावं अरे मी आहे ना तुझ्यासोबत आणि मग हवा असतो तो हात मला माझ्या खांद्यावर, धीर देण्यासाठी खूप एकाकी वाटत कधी, हिरमुसायला होतं, रडायला येतं तेव्हा मात्र हवा असतो तो हात माझ्या हातात आधारासाठी, चालायचं असतं तुझा हात हातात घेऊन त्या शांत रस्त्यावरून, अनुभवायची असते तुझी सोबत त्या झाडाखाली बसून.... कधी तरी एकांतात अनावर होणाऱ्या भावनांना पाहिजे असतो तुझा तो अलवार स्पर्श जो मोहरून टाकतो मनासोबतच शरीरालाही.... मला ही गरज असते तुझी, मला ही हवे असतात ते धुंद मंतरलेले क्षण तुझ्या सहवासाचे, तुझ्या सानिध्याचे मग हळूच शिरावेसे वाटते तुझ्या मखमली कुशीत अन् हरवून जावं वाटतं स्वतः ला.... काही क्षण हवे असतात आपल्या फक्त आपल्या जाणिवांचें.... त्या विलक्षण अनुभुतिचे.... जगाला विसरुन तुझ्यातच गुंतायच असतं, विरघळायचं असतं पण नाही व्यक्त करता येतं मला माझ्या भावनाना शब्दात.... वाटतं तु समजून घ्यावसं मी काहीच न बोलता.... ओळखावसं मनातलं फक्त नजरेतूनच.... कधीतरी घे ना मला ही समजून.... कधीतरी दे ना मला ही ती आश्वासक नजर मला बघून... तु ही विसर ना कधीतरी या जगाला.... ये ना कधी तरी मोकळ्या मनाने आणि हो ना एकरूप माझ्याशी.... माझ्या विचारांशी.... माझ्या भावनांशी.... कधीतरी माझ्यातल्या माझ्याशी.... -निल इमरोझ