Nojoto: Largest Storytelling Platform

Best घरा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best घरा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutचाललो घरा song download, घरा पासून शब्द, चला घरा, पाहुणा आला माझ्या घरा, चाललो घरा वाटेत मला सोंग,

  • 1 Followers
  • 1 Stories

Shivram Masurkar

जय गणेश

read more
हे गणेशा एकदंता हे लंबोदरा 
या दुडूदुडू धावत माझ्या घरा..

मुर्ती तुझी लोभस अती सुंदर !
नाजूक नेत्र परी मोठे उदर !!
गळ्यात शोभे मोती कंठी हार !
नेसले भरजरी पिवळे पितांबर !!
वाहन मोशक शोभतो बरा..

निसर्गही नटला तुझ्या स्वागता !
नेसुनी गर्दहिरवा शालू पाचूचा !!
पिवळ्या रानफुलांची रास भूवरा !
जणू कोवळा मखमली गालीचा !!
हर्षाने बरसती पाऊस धारा...

जीवास आता तुझाच ध्यास !
जरी दूर गावा माझा वास !!
तूझ्या भेटीची लागली आस !
संपत चालला श्रावण मास !!
आनंद घेऊनिया माझ्या दारा..

हे गणेशा एकदंता हे लंबोदरा 
या दुडूदुडू धावत माझ्या घरा..

:-शिवराम:-
9619835048 जय गणेश

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile