Find the Best आयुष्याच्या_वाटेवर Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
hemlata mandle
BeHappy शुक्र करो गुनाह की बदबू नहीं आती! वर्ना ये दुनिया रहने के काबिल ना होती,!! ©hemlata mandle #beHappy#life #Life_experience #आयुष्याच्या_वाटेवर #आयुष्य_जगताना
#beHappylife #Life_experience #आयुष्याच्या_वाटेवर #आयुष्य_जगताना
read moreशब्दवेडा किशोर
#आयुष्य.. आयुष्य किती खडतर दगडांचा प्रवास आहे शेवाळलेल्या जीवनात तोल सांभाळण्याचा भास आहे कधी वाटते मनाला सुख फक्त घरात आहे भरलेल्या घरातही माणुस एकटाच हमखास आहे...... जिथे असे सोबत तिची शेवटला जात नाही ज्यांच्या साठी जगतो माणुस त्यांच्या अटी बेहिसाब आहे एकांत छळतो काळजाला वाटतं सोबत तिची मिळावी गोंधळलेल्या मनस्थितीत तिचा कलह अमाप आहे...... ओझं मनावरचं मी कुणापुढे हलकं करावं तरी कसं ज्यांच्या त्यांच्या आयुष्यात ट्रेसचा विलाप आहे अंत नाही कशाचा अन् सुरुवातही सापडत नाही मध्य काळात या मग होई हतबल मन शोध खल्लास आहे...... आत्महत्या नाही पर्याय याला प्रत्येकाला समजावे लागेल मनस्थाप असला कितीही तरीही जीवनाचा मात्र एकदाच प्रवास आहे..... @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर
hemlata mandle
"चांगल्या वेळेपेक्षा चांगली माणसं महत्वाची असतात....... चांगल्या वेळेमुळे चांगली माणसं भेटतीलच असे नाही...... कारण चांगल्या माणसांमुळे चांगली वेळ येऊ शकते....... ©hemlata mandle #kinaara #indianpictures #india🇮🇳 #Indian_kavi #आयुष्य #आयुष्याच्या_वाटेवर
#kinaara #indianpictures india🇮🇳 #Indian_kavi #आयुष्य #आयुष्याच्या_वाटेवर
read moreशब्दवेडा किशोर
#नात्यांचा झरा नात्यांचा वाहतो सदा मज भोवताली झरा तरीही मी एकटाच आहे कारण इथले भरपुर झरे फक्त गढुळ आहे कितीदा साफ केले तरीही शंका कुशंका अन् फसव्या मृगजळाने भारलेले नात्यांचे हे गढुळ तळे आहे ज्याचा त्याचा स्वार्थाचा धंदा मी मात्र एकटाच आहे खुप सारे उपाय केले पण तरीही त्यातली गढुळता अजुनही गाढ आहे नात्यांच्या झऱ्याचं पाणी सदा गढुळच का हे मात्र आजही मज न सुटलेले कोडे आहे नात्यांचा वाहतो सदा मज भोवताली झरा अन् तरीही मी एकटाच आहे @ शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर
शब्दवेडा किशोर
#आयुष्य माझे.... सुटल्या क्षणाचे आवेश भरल्या मनाचे जगुन घेतले अन् जगतोय मी आयुष्य माझे उरल्या सुरल्या त्या सुवर्णमय आठवणीचे राहील्या त्या सोनसळी क्षणाचे बघून झाले आयुष्य माझे शोधून सुखाचे क्षण सारे लपवुन अन् जपुन ठेवले मी आयुष्य माझे तुझ्या हिताचे माझ्या मतांचे संपुन चालले आयुष्य माझे तुझ्या पावलांचे ठसे काळजाचे मिटवून ते ठसे घेत गेले ते आयुष्य माझे धागे मनाचे बंधन प्रेमाचे उसवुन गेले ते आयुष्य माझे कोण कुणाचे नाही मनाचे उलगडून झाले आयुष्य माझे @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर
शब्दवेडा किशोर
@प्रश्नचिन्ह गाव माझा आजही धोक्यात आहे वादळाचा जोरही रोषात आहे पावसाला जाण नाही आता इथल्या जीवांची अन् माणसांची भय पुराचे वाढले ते अंतरात आहे राहिले ना आता इथं आपले कुणी पुसाया विचाराया सदा साचलेले दुःख याच डोळ्यात आहे सावरावे मी सांगा कितीदा या मनाला गीत त्या दुःखी मनाचे आजही ओठात आहे ही उत्तरं शोधू कशी मी जीवनाची प्रश्नज्योत माझ्या मनीची आजही कोड्यात आहे मन सदा घाबरलेले जीवनमरणाच्या रेषेवर आजही चालत आहे संपेल का कधी धावपळीचं जगणं कळेना मजला आजही इथं सर्वांचं ध्यान फक्त फुकाच्या संपत्तीत आहे संपेल का हे शापीत जगणं कधी हा ज्याला त्याला जन्मानेच लाभलेलं एक प्रश्नचिन्ह आहे @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर
शब्दवेडा किशोर
#आयुष्य..न संपणारा एक प्रवास आयुष्य न संपणारा एक प्रवास आहे सुखदुःखांचा सहवास आहे जन्ममृत्यूच्या जाळ्यात विणलेला एक मखमली फास आहे आयुष्याच्या प्रवासात ऊनसाऊल्यांचा खेळ आहे सुखांनी दुःखांसोबत केलेला सुंदर मेळ आहे आयुष्याच्या प्रवासात नात्यागोत्यांचा वास आहे निराशेच्या ढगाआड आशेचाही अलगद भास आहे आयुष्याच्या प्रवासात फुला-काट्यांचे दान आहे ऊन-पाऊस-वादळ-वाऱ्याचं अनुभवाचं वरदान आहे आयुष्याच्या प्रवासात मैत्रीची साथ आहे रक्ताने रक्ताशीच केला इथं विश्वासघात आहे आयुष्याच्या प्रवासात हातातला हात नकळतपणे सुटणार आहे, श्वासाशी श्वासांचा करारही नकळतपणेच तुटणार आहे आयुष्याच्या प्रवासात सुखाचाच शोध आहे अंतरंगी झाकताना मनात त्याचा बोध आहे भल्याबुऱ्या कर्माचा इथेच हिशोब होणार आहे @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर
शब्दवेडा किशोर
#आयुष्य..एक रंगमंच मनाची थकावट जाईल असा या धरेचा रंगमंच हवाय ह्या धावपळीच्या आयुष्यात मोकळा श्वास हवाय चेहरे नव्हे तर मन वाचण्या पुरेसा वेळ हवाय मुखवट्यापासून दूर कुठेतरी शांत एकांत हवाय मन भरलंय मोठेपणाने अहंकारही मिटलेला हवाय खोट्या प्रतिष्ठेचा बोजा बाजूला ठेवलेला हवाय माणूस म्हणूनही आता एक स्वल्पविराम हवाय पक्षांसारखं विहरण्या मुक्त आकाशाचा मधुबंध हवाय.. @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर
शब्दवेडा किशोर
#असेही एकदा व्हावे.... असेही एकदा व्हावे मी न बोलताच तू मला जाणावे व्यक्त-अव्यक्तपणे साद घालावे.. अव्याहतपणे आपण बोलत राहावे पूर्णपणे मोकळे व्हावे.. असेही एकदा व्हावे.... एकांतात काही क्षण घालवावे मुक्याने संवाद साधावे.. तुझ्या मिठीत घट्ट सामवावे जसे नदीने सागरा मिळावे.. असेही एकदा व्हावे.... केवळ तुझ्या मनधरणीने मी माझा रुसव्यांचे गणित विसरावे मी मुक्त स्वैरपणे या जगी बागडावे पक्ष्यांप्रमाणे नभात विहरावे.. असेही एकदा व्हावे.... केवळ तुझ्या स्पर्शाने मी वेदनेतून आनंदाकडे जावे तू नि मी वेगळे न राहता एकजीव बनून राहावे.. असेही एकदा व्हावे.... @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर
शब्दवेडा किशोर
#आयुष्यमैफिली.... संपुनी गेला दिवस सारा झुरल्या उरीच्या आठवणींखाली सांज सोन्या सुमधुर या मैफिलींची घनगर्द ही काळी रात झाली घेत उसासा तरी मग स्वतःशी हृदयबंध सारे निखळवु पाही शोध घेण्या मग स्वतःचा संपणारी ती वेडी जिद्द नाही @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर