Nojoto: Largest Storytelling Platform

Best विचारा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best विचारा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutमैं विचारा किस्मत हारा, किस्मत हारा मैं विचारा, त्यांना विचारा, कोडे विचारा,

  • 1 Followers
  • 1 Stories

Suraj Kanthawar

suraj

read more
City [8/1, 14:36] Ravi Tawade: संजयभाऊ देरकर यांच्या मार्गदर्शना खाली कार्यकर्त्यांची बैठक संपन्न
आगामी निवडणुकीच्या संदर्भात चर्चा
 आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे सध्या वाहू लागले आहे. त्यादृष्टीने सर्वच उमेदवार आता प्रचाराच्या कामाला लागले आहे. आज रविवार दिनांक31 जुलै रोजी रात्री 8 वाजता संजयभाऊ देरकर यांच्या मार्गदर्शना खाली कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आगामी विधानसभेबाबत चर्चा करण्यात आली.
या बैठकीत कार्यकर्त्यांना संजयभाऊ देरकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच कार्यकर्त्यांनीही विविध विषयांवर चर्चा केली. आगामी विधासभा निवडणूक लढण्याचा निश्चय करण्यात आला असून आता केवळ काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कामाला लागा असा आदेश संजयभाऊ देरकर यांनी यावेळी दिला. या चर्चेला मोठ्या संख्येने वणी पंचायात समिती  भागातील समर्थक उपस्थित होते.
[8/2, 10:05] Golu Bhat: *प्रिय* ,
        *अमिर खान* 
         
आपण येत्या 4 तारखेला चंद्रपूर जिल्ह्यात येत आहात आम्हा चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेसाठी खुप अभिमानास्पद बाब आहे. आपण एक उत्तम कलाकार तर आहातच त्याचबरोबर आजच्या युवकांचे आयडाँल पण आहात . आपण आमच्या जिल्ह्यात काही महत्वाच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी येत आहात अस माहीत झाले . आपणाला जे मंत्री आणनार आहेत ते तुम्हाला जिल्ह्यातील त्यांच्या हातातुन झालेल्या कामाचा आढावा दाखवतील. ते तुम्हाला या जिल्ह्यातील बगिचे ,पार्क,बसस्टँन्ड ,सिमेंट चे रस्ते ,प्राण्यांचे पुतळे ,सैनिकी स्कुल ,आणि (निर्जीव) विकासात्मक केलेल्या कामाची पाहणी करुन स्वत:ची स्तुती करायला लावतील. तुम्हालापण हे सगळ पाहुन त्यांचा गौरव करावासा वाटेल आणि त्या पद्धतीने आपल्या सभोवताली आपण सुधिर भाऊ मुनगंटीवार यांचीच स्तुती कराल असे वातावरण तयार केल्या जाईल आणि तुम्हालापण सुधिरभाऊ काही निवडक गोष्टीच दाखवतील व कदाचित तुम्हीपण त्यांच्या देखाव्याला खरे मानुन विकासाचा महामेरु म्हणुन गौरव कराल .
   पण अमिर खान जी तुम्ही या जिल्ह्यात आल्यानंतर येथील बंद पडलेल्या कारखान्याबद्दल विचारा,या जिल्ह्यातील कामगारांच्या समस्या खुप वाढल्या आहेत त्याकडे लक्ष द्यायला सांगा, जिल्ह्यातील लाखो बेरोजगारांबद्दल विचारा, आरोग्याच्या सोयी , सिंचनाच्या सोयी ,प्रदुषण ,येथिल मस्तावलेल्या सत्ताधार्यांचा मनमानी ,दडपशाही धोरणाबद्दल विचारा, निक्रुष्ठ दर्जाचे  बांधकाम करुन करोडो रुपये ठेकेदारांनी व सत्ताधार्यांनी हडपले त्याबद्दल विचारा , होऊ शकेल तर सुधिरभाऊना त्यांनी बांधलेल्या करोडो रुपयाच्या घराबद्दलही विचारा ,या जिल्ह्यातील युवक चुकीच्या मार्गाने जाऊन नशा करत आहेत तेही विचारा, दारुबंदी जिल्हा असुनही गल्लोगल्लीत नकली दारु मिळते त्याबद्दलही विचारा अशी जिल्ह्यातील जनतेची आर्त हाक आहे . 
   अमिर खान जी क्रुपा करुन यांच्या खोट्या देखाव्याला बळी पडु नका !! हे तुम्हाला खोटा निर्जीव विकास दाखवतील पण या जिल्ह्यात बर्याच समस्या आहेत . शेतकरी, कामगार, बेरोजगार ,छोटे मोटे व्यवसायीक,व्यापारी , गोरगरिब जनता ,विद्यार्थी ,शिक्षण ,आरोग्य यांच्या फार गंभिर समस्या आहेत त्या वेळ मिळेल तर नक्की विचारुन मा.मंत्रीमहोदयाना त्या पुर्ण करायला सांगा हीच आपल्याला चंद्रपूर जिल्ह्यातल्या सर्व जनतेकडुन नम्र विनंती आहे.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 suraj

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile