Nojoto: Largest Storytelling Platform
manepinu5745
  • 2Stories
  • 2Followers
  • 26Love
    0Views

PINU

love me or hate me ....i am still gonna shine 😉

  • Popular
  • Latest
  • Video
e01af6e14ce66c8c0fe727af73550d19

PINU

#विठ्ठल_विठ्ठल

आज विठ्ठल उद्या विठ्ठल
हरएक क्षणात विठ्ठल विठ्ठल..

जल विठ्ठल स्थल विठ्ठल
ह्रदयीचा ध्यास विठ्ठल विठ्ठल..

काळा विठ्ठल गोरा विठ्ठल
अवघाची रंग विठ्ठल विठ्ठल..

आई विठ्ठल बाप विठ्ठल
प्रत्येक नात्यात विठ्ठल विठ्ठल..

सुखात विठ्ठल दुःखात विठ्ठल
समतोल म्हणजे विठ्ठल विठ्ठल..

घरात विठ्ठल दारात विठ्ठल
माणुसकीच्या झऱ्यात विठ्ठल विठ्ठल..

यातना विठ्ठल फुंकर विठ्ठल
उगवती आशा विठ्ठल विठ्ठल..

होश विठ्ठल बेहोश विठ्ठल
कुडीतला प्राण विठ्ठल विठ्ठल..

ज्ञान विठ्ठल विज्ञान विठ्ठल
जगण्याचे भान विठ्ठल विठ्ठल..

कळला विठ्ठल उरला विठ्ठल
साऱ्यात शोधते विठ्ठल विठ्ठल
e01af6e14ce66c8c0fe727af73550d19

PINU

भारताची शान महाराष्ट्र माझा 
मुंबई ज्याची जान तो महाराष्ट्र माझा ,
सावरकर टिळकांचा त्याग तो महाराष्ट्र माझा ,
फुले शाहू आंबडकरांचा वारसा तो महाराष्ट्र माझा ,
सावित्री आनंदी बाईंचा तो महाराष्ट्र माझा ,
निसर्ग सौंदर्याची खाण तो महाराष्ट्र माझा ,
पंचगंगा जिथे वाहती तो महाराष्ट्र माझा ,
जिजाऊ शाहु राजेंचा निर्धार तो महाराष्ट्र माझा ,
शिवरायांची कर्मभूमी तो महाराष्ट्र माझा ,
शंभूराजांची शौर्यभूमी तो महाराष्ट्र माझा ,
संतांची पुण्यभूमी तो महाराष्ट्र माझा ,
अजिंठा वेरुळ चा शिल्पकार तो महाराष्ट्र माझा ,
गणपती बाप्पा मोरया चा जयघोष तो महाराष्ट्र माझा ,
संस्कृतीची नाळ जपतो तो महाराष्ट्र माझा ,
पराक्रमाचा इतिहास ज्याला तो महाराष्ट्र माझा ,
आधुनिकता आणि परंपरा एकत्र नांदती तो महाराष्ट्र माझा ,
बळीराजाचे ऋण जपतो तो महाराष्ट्र माझा ,
दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा ,
जय जय महाराष्ट्र माझा ,
गर्जा महाराष्ट्र माझा !!!
महाराष्ट्र दिनाच्या तमाम महाराष्ट्रातील जनतेला हार्दिक शुभेच्छा !!!
  - पिनु 🖋️ #maharashtradin
#marathiquotes
#marathi

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile