Nojoto: Largest Storytelling Platform
rohitshinde9622
  • 4Stories
  • 37Followers
  • 29Love
    803Views

Rohit Shinde

  • Popular
  • Latest
  • Video
d27309e31cf601faefd262cbe13864b8

Rohit Shinde

का आत्या का अशी अचानक सोडून गेलीस...
का आत्या का असे तुझ्याबद्दल आदरांजली बद्दल बोलायला लावलंस...
तुझ्या सारख्या लुसलुशीत मऊ चपाती बनवायची न शिकवताच गेलीस...
का आत्या का आपल्या स्कॉलरशिप च्या अँप च
 बोलणं अर्धवट टाकून गेलीस...
तुझ्या मोत्यासारख्या अक्षराचं रहस्य न सांगताच गेलीस...
का आत्या का शाळेतील मुलांच्या गमतीजमती
 पूर्ण न सांगताच गेलीस...
तुझ्या लाडक्या सियाला न भेटताच गेलीस...
टीचर आई म्हणणाऱ्या लहानांना(संचिता, केया, 
नव्या, बिट्टू, परी, गोलू, सक्षम, नील, गोट्या, चिकू, सानू ) 
बाय न म्हणताच गेलीस...
समीरदादाच्या शिट्टी ला प्रतिसाद न देताच गेलीस...
बघ ग किती सैरभैर झालाय तुझा संगड्या, 
त्याला अस पोरकं करून गेलीस...
का आत्या का तुझी संसारवेल पुन्हा फुलावी 
म्हणून सर्वात आधी एकाकी  झगडणाऱ्या, 
पोरीकडं लक्ष दे असं तुझ्या बाईला सतत 
बजावणाऱ्या तुझ्या दादाकडे का पाठ फिरवून गेलीस...
का आत्या का सहनशीलतेची परिसीमा केलीस...
का आत्या का काही वर्षे यातनेची आव्हाने 
सहन करत असताना काही दारे तुझ्यासाठी
 बंद होती आता सुखाची चाहूल लागताच 
का त्यांचा जत्थाच गोळा केलास...
का आत्या का आयुष्यभर नैतिकतेने चाललेली तू 
सहजासहजी अनैतिकतेला माफ केलंस, 
अन् शीलहीनतेला आसरा दिलास...
का आत्या का आतल्या आत मूक रडत राहिलीस...
इतकं दुःख सहन का करत राहिलीस...
का आत्या का तुझ्या प्रेमळ भावांना हाक नाही दिलीस...
का सतत देतच राहिलीस का 
सतत दुसऱ्यांच्या विचार करत राहिलीस...
का आत्या का शेवटी सुद्धा चेहरा न दाखवताच गेलीस...
का आत्या का...???

©Rohit Shinde
d27309e31cf601faefd262cbe13864b8

Rohit Shinde

अव्यक्त

आता मी फारसे photos नाही काढत, ना कोणाशी इतकं बोलतो,
तुझा-माझा संवाद कमी झालाय...
पण अजूनही थोडीशी आशा आहे की पुन्हा मैत्रीची पालवी फुटेल...
अन् पुन्हा तुझ्या वेड्या वाकड्या poses च्या शोधार्थ मी सतत click करत राहीन...
दिवसभर भेटून सुद्धा घरी येण्याच्या प्रवासात तुझ्याशीच बोलत राहीन...
अगदी घरी पोहोचलो तरी गाडी park करून बोलणं संपू नये म्हणून काही काळ सांगणारही नाही की पोहोचलो कारण तू लगेच कॉल डिस्कनेक्ट करशील...
खुपदा बोलून झालंय, नाही ठाऊक मला प्रेमाची व्याख्या ना कळत मला की मी प्रेमात आहे...
पण आता मला कळून चुकलं की मला तुझा सहवास हवाहवासा वाटतोय, तू नेहमीच माझ्या साथीला हवी आहेस...
तू ऑफिसमधून उशिरा निघताना खूप काळजीने चौकशी करतो सगळ्या बाबींची...
आता आपण सारखे भेटत नाही पण आपला संवाद अजूनही तसाच ताजा भासतो मला...
आणि तो सतत असाच हवा अशी हाव पण आहे मला...
कमी का असेना आपल्यामध्ये संवाद आहे, मैत्र आहे काही...
म्हणून हे सगळं नाही सांगू शकत तुला, कदाचित कधीच नाही...

©Rohit Shinde #आतलीसल #अव्यक्त_मी  #प्रेम #Love #ती #अव्यक्त_प्रेमाचा_अबोल_वारा 

#humantouch
d27309e31cf601faefd262cbe13864b8

Rohit Shinde

#तुझंमाझंप्रेम #प्रेम
d27309e31cf601faefd262cbe13864b8

Rohit Shinde

एक दिन तुम भी देखोगे


एक दिन तुम भी देखोगे,

मुझे जिम्मेदारी लेते हुए...


एक दिन तुम भी सुनोगे,

मैफिलो में मुझे छाते हुए...


एक दिन तुम भी गुरुर करोगे,

जुनुन से रास्ता काटते हुए...


एक दिन तुम भी फ़िक्र छोडोगे,

गहरी साजिस में भी मुझे इन्सान बनते हुए...


एक दिन तुम भी नाज करोगे,

माँ तेरा खयाल करते हुए... एक दिन तुम भी देखोगे

एक दिन तुम भी देखोगे

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile