Nojoto: Largest Storytelling Platform
rajendrkumarbhos6191
  • 669Stories
  • 136Followers
  • 8.1KLove
    4.6LacViews

Rajendrakumar Jagannath Bhosale

अध्यक्ष,वार करी दल ,(WKD,Ind)

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
d1889dc7fc547755ee9a06c9178ea43a

Rajendrakumar Jagannath Bhosale

स्वप्न पहिली पंचायत राज्याची 
लक्तर झाली जाती जमातीची 

मांगाची दोर घेतली गरवारे नी 
चपला बूट विकल्या बाटानी 

ग्राम संकल्पना फक्त कागदावर 
इथ लोकशाही फक्त नोटांवर 

 सत्ता संपत्ती फक्त क्षेत्रपालाकडे 
घाम मोलमजुरी उरली  मजुराकडे 

अर्थ नाड्या भांडवलदारा कडे 
सत्तेच्या चाव्या मूठभरांकडे 

गांधीजींची माकडे झाली चार 
मोबाईल मुळे गुंगलेत  फार 

वाट पाहतो नव्या विचाराची,
शुद्ध आचाराची, सूव्यवस्थेची

©Rajendrakumar Jagannath Bhosale #sad_qoute
d1889dc7fc547755ee9a06c9178ea43a

Rajendrakumar Jagannath Bhosale

अभंग क्र११२

जाणतेन कर ध्यान, निर्मोही जप मौन 
अपरोक्ष घेई ज्ञान, मोक्ष रेघे ll धृll 

शत रिपु त्यागोनिया, दसेंद्रिये भोगोनिया 
अष्ठसिध्दी अव्हेरूनी, व्रत करी ll १ll 

एका नित्य धरी आरी, गुंफी निर्गुणाची दोरी 
   सद्गुरू कृपा करी, राजे म्हणे ll २ll

कवी गायक, संगीत श्री राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले

©Rajendrakumar Jagannath Bhosale #Sad_Status
d1889dc7fc547755ee9a06c9178ea43a

Rajendrakumar Jagannath Bhosale

वादळात भीमज्योत झाली या मंद
बाबांच्या विचारांचा जडवा तुम्ही छंद
भीम जयंतीला मला झालाय आनंद...॥ धृ ॥

राजकीय विचाराने जनता झालीधुंद
बेगडी विचारांचे वाटे पुढारी पुंड
पुरोगामी सैनिकांना अडवतात गुंड
राजकीय सत्तेसाठी जमवून झुंड ॥1॥

फुले शाहू आंबेडकरी विचारांचा लढा
तेव्हा सुटेल अस्थिरतेचा तिढा
समानतेच्या रथाचा घ्या वेढा
परिवर्तनाच्या चळवळीचा शिकवू धडा ॥2
.  
. पंचशील त्रिशरण  बोधी सत्व 
आचारूनी जाणुया बुद्ध तत्व.        
  विज्ञानिष्ठ जीवनी करु कर्तृत्व    
   जागृत सजग बनू   वाढवू महत्व ll ३ll

©Rajendrakumar Jagannath Bhosale #sad_quotes
d1889dc7fc547755ee9a06c9178ea43a

Rajendrakumar Jagannath Bhosale

Happy Teachers day
d1889dc7fc547755ee9a06c9178ea43a

Rajendrakumar Jagannath Bhosale

मानसिक गुलामीचे झालेत घट्ट धागे 
 हे शिक्षित अडाणी अंधभक्ताचा मागे 

विज्ञान मती झाकोनी गुंग कल्पनेत 
शंड लाचार लंपट लोभी आचारात 
हे कोरडे पाषाण जगतास बुध्द सांगे ll 1ll 

उत्सव प्रिय प्राणी उगवले या देशात 
ज्ञान त्यागुनी गुंती आभासी चित्रात 
हे परके भ्रष्ट पाहून का न येई रागे ll 2ll

©Rajendrakumar Jagannath Bhosale #sad_shayari
d1889dc7fc547755ee9a06c9178ea43a

Rajendrakumar Jagannath Bhosale

संस्कार जिथे सोळा
 गुरू देई तिसरा डोळा 

गुरूचा पद स्पर्श 
जीवनी येई हर्ष 

गुरू आज्ञा पाळी 
धावे संकट वेळी 

सद्गुरू जानी वर्म 
करा निष्काम कर्म 

जो नम्र गुरूला 
तोची मागे उरला 

गुरू माझी माय 
घट्ट धरा पाय 

दाखवी मार्ग गुरू 
त्याचे बोट घट्ट धरू 

सर्व माझ्या गुरूंना साष्टांग दंडवत 
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

©Rajendrakumar Jagannath Bhosale #moon_day
d1889dc7fc547755ee9a06c9178ea43a

Rajendrakumar Jagannath Bhosale

टपोनो बैसले बोके, नामाचे घेऊन ठेके 
संसार भाकरी शेके, हे करंठे ll धृll 

आद्य आत्मा नसे ठाव, कुटील टाकुनी डाव 
सोंगाडे घेतात नाव ,स गुणाचे ll १ll 

बुजगवण्याना देतो,आधार देण्यास येतो, 
त्यास जो जो आळवितो, आवडीने ll २ll 

पाप पुण्य खोटे खरे, निःस्वार्थ चरण धरे 
सर्व खळास  उध्दारे, राजे म्हणे ll ३ll

©Rajendrakumar Jagannath Bhosale
  #sad_shayari अभंग १००

#sad_shayari अभंग १०० #Poetry

d1889dc7fc547755ee9a06c9178ea43a

Rajendrakumar Jagannath Bhosale

अभंग 98

अभंग 98 #Poetry

d1889dc7fc547755ee9a06c9178ea43a

Rajendrakumar Jagannath Bhosale


अभंग क्र ९७

दिंडी सुख जो जो घेतो,भजनी सदा गुंगतो,
विश्व कल्याण मागतो, पांडुरंगे ll धृll 

संत कृपेची सावली, क्षणो क्षणी पावली 
पिडीतासाठी धावली, भक्तासाठी ll१ll

आतुरला भेटीसाठी, मुखी नाम विठू ओठी,
प्रकटता जगजेठी, हृदयात ll २ll 

सगुण रूपाची ओढ, जरी आले पायी फोड 
दिंडी सुख वाटे गोड, राजे म्हणे ll ३ll 

कवी गायक संगीत श्री राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले

©Rajendrakumar Jagannath Bhosale
  #अभंग९७
d1889dc7fc547755ee9a06c9178ea43a

Rajendrakumar Jagannath Bhosale

हातात हात असूद्या अंधारल्या वादळात 
 माणूस जोडून ठेवा   अभिमानी वणव्यात LL ध्रु LL

भोगताना सत्ता आधार गुंफतात 
कुट अविचार इथेच नांदतात 
 धर्म, जाती पंथ अनेक भारतात 
दुर्गंधी भाष्याचे  इथ गटार तुंबतात LL 1LL

तरुणाई भडक कान, बेधुंद  लाचार, साथ 
घेई अज्ञान पालखी, आभासी तत्वात 
इतिहास जपूनी ठेवा, जाणा स्वकीय हात  
लढण्यास एक व्हा रे सत्तेच्या कुरणात LL 2LL

RAJENDRAKUMAR JAGANNATH BHOSALE

©Rajendrakumar Jagannath Bhosale
  #sad_shayari
loader
Home
Explore
Events
Notification
Profile