Nojoto: Largest Storytelling Platform
abhishekmitake2589
  • 21Stories
  • 57Followers
  • 98Love
    0Views

Abhishek Mitake

  • Popular
  • Latest
  • Video
cb16e889baca3be64b585bec859b433b

Abhishek Mitake

चेहरा तुझा जणू रास नक्षत्रांची 
चांदण्यालाही ओढ तुला पहाण्याची
आभाळाची झालर झाली निळीशार गडद
तुझ्यावर शुभ्र टपोरे चांदणे वर्षावत !!

cb16e889baca3be64b585bec859b433b

Abhishek Mitake

तुला वाटलं मला कळणार नाही
मला वाटलं तुला कळणार नाही
विषय न काढताच दिला फोन ठेवून
न बोलता एकमेकांना सर्वकाही सांगून....

cb16e889baca3be64b585bec859b433b

Abhishek Mitake

स्वाद अजून तसाच आहे चहाचा
पण गोडवा सोबत नाही तुझ्या बोलण्याचा..

तासन् तास मनसोक्त बडबड 
मध्येच वेळ बघून जायची गडबड
अजूनही भास होतो तुझ्या हालचालींचा...

कधीतरी निःशब्द वेळ
शांततेचे अनाकलनीय खेळ
अजूनही आवाज गुंजतो कानात श्वासाचा...

स्पर्श झालेला तुझा नकळत
मनात वीज कोसळलेली जळत
अजूनही ताजा आहे तो भाग जखमेचा...

झाली रिकामी बाग पुन्हा
तो बाकही झाला पुन्हा सुना
अजूनही बरसतो का तुझ्या अंगणात पाऊस त्या आठवणींचा..

cb16e889baca3be64b585bec859b433b

Abhishek Mitake

आज्जी

दुप्पट माया
ममतेची छाया
सुखाचा सागर
सावलीचा पदर
आज्जी माझी!

जन्म दिला
जरी आईने
नवजात अश्या मला
संगोपनाने जगवले
माझ्या आज्जीनेच!

आई ओरडुदे 
बाबा रागाऊदे
हक्काची रडण्याची उशी
म्हणजे आज्जीची कुशी!

फोन कर, भेटत रहा
जेवूनच जा, बारीक झालास
अशी आपुलकी
फक्त आज्जीपाशी!

ऋण तुझे अशक्य फेडणे
खरोखर...भाग्य असते तू लाभणे! #आज्जी
cb16e889baca3be64b585bec859b433b

Abhishek Mitake

राह

जो सेहेना है जिंदगी में
उसे तो सेहेना ही पडेगा
बंदा अगर हो मन से सशक्त
तो सब सेहेन करकेभी वो आगे बढेगा! 

रोना तो है बहोत आसान, लेकीन
आसू अंदरही सिमटाने में ताकद लगती है!
बाढ के साथ बेहके चले जाना
और उसको चीर के पार करना इनमे यही फरक  है!

रोने वाले को कंधे 
कितने समय तक मिलेंगे
हां, अगर आंसू थमकर नयी राह दीखादे
तो सब आपके साथ खुशी खुशी चलेंगे!
cb16e889baca3be64b585bec859b433b

Abhishek Mitake

किर्रर्र काळोख होता
मुसळधार पाऊस होता
एकच खंत होती
तुझा हात हातात नव्हता!

cb16e889baca3be64b585bec859b433b

Abhishek Mitake

उत्तर..

थांब बघू अशी
मला नको टाळू
उत्तर दे एकदाचं
आडवाटेने नको पळू!

किती ती घालमेल
जरा शांत हो 
अस्थिर पाण्यात
तळ दिसत नाही!

विसर क्षणभर जगाला
तु बोल स्वतःशी 
उमगेल बघ खरं
दडलेलं मनाशी!

काहीही असूदे
ऐकायची आहे तयारी
माझं नसेन तर असेल
कोणाचंतरी नशीब भारी!

पण उत्तर जरूर दे
नको ठेऊस ताटकळत
कोरडया शुष्क पाचोळ्याला
किती वेळ ठेवणार जळत!
cb16e889baca3be64b585bec859b433b

Abhishek Mitake

वाटचाल

ध्येय माझं निश्चित
वाटचाल चालत सुरू
अनुभवतो आहे अडचणी
मन म्हणतं 'मागे नको फिरू'!

थांबणे हा पर्याय नाहीच
काळ तर पळतोच आहे
मग मी कशाला थांबायचं
काळाबरोबरच तर स्पर्धा आहे!

कणखर होतंय गलबत माझं
तलवारीचा गंज उतरत आहे
जिंकणार जरी कोणी एक
युद्धागणिक कौशल्य वाढत आहे!

यशोगाथा असेल का धडा
याची काळजी मी का करू
ध्येय माझं निश्चित
वाटचाल चालत सुरू!
cb16e889baca3be64b585bec859b433b

Abhishek Mitake

असं बघत जाऊ नकोस

असं बघत जाऊ नकोस
काळजात चिररर् होतं
नजर आहे की मद्यपेला
एका घोटात डोकं धुंद होतं!

असं बघत जाऊ नकोस
लक्ष कशात लागत नाही
प्रत्येक गोष्टीत माझं मन
फक्त तुझाच शोध घेई!

असं बघत जाऊ नकोस
कायदा हातात नको घेऊस पुन्हा
इहलोकी नसेन जरूर पण..
प्रेमलोकी हा अक्षम्य गुन्हा! 

असं बघत जाऊ नकोस
प्रेमात पाडशील मला उगाच
अश्या धडपडणाऱ्या मनाला
मग सावरावे लागेल तुलाच!
cb16e889baca3be64b585bec859b433b

Abhishek Mitake

प्रेमाचे टप्पे

रिमझिम पाऊस
आपली नजरभेट
गालांत हसणं
एकमेकांना बघणं!

पावसाची संततधार
आपलं भेटणं फार
मैत्रीचं प्रेमात रूपांतर
बेचैन करी अंतर!

मुसळधार कडकडाट
उत्कटतेचा पूर
उतू गेलेले प्रेम
कशाचाच नाही नेम!

नंतर उरलेली 
नुसतीच रिपरिप
काहीशी अर्थहीन
शून्यात पहाणारी!

loader
Home
Explore
Events
Notification
Profile