Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser5115464232
  • 4Stories
  • 18Followers
  • 28Love
    0Views

अस्मिता

love for expressing..

  • Popular
  • Latest
  • Video
c04ebe4da4c2ed773c95d3cedc3d7760

अस्मिता

माहेरच्यांसाठी तिचं घर..
फक्त लग्नानंतरचं असतं...
आणि सासरच्यांसाठी तिचं घर..
फक्त माहेरचंच असतं...
स्रीला खरंतर  तिचं असं घरच नसतं..

चार दिवस झाल्यावर..
आईसुद्धा म्हणते..
जा बाई तुझ्या घरी..
तिथेच तुझे मन रमते..
सासरी आणि कितीदा..
दमुन जाते.. थकते..
चार ऐवजी यावेळी..
जास्त थांबुच असंही ठरवते..
स्रीला खरंतर तिचं असं घरच नसतं..

कासावीस होते....नवरा मुलांसाठी..तीच मग पुन्हा ..
कोपरे सुद्धा घरातले बोलवतात ..तिने केल्यासारखा  गुन्हा
आल्यानंतर घराचा कोपरा न कोपरा गोंजारते..
 स्रीला तरीही तिचं असं घर नसतं
ठळकपणे  दिसणारं फक्त..तिचं स्रीपण असतं..
तिचं घर तिला आपल्याशा वाटणाऱ्या..
 माणसात असतं
स्रीला खरंतर तिचं असं घरच नसतं

c04ebe4da4c2ed773c95d3cedc3d7760

अस्मिता

तुला जो दिसतो..
तुला जो जाणवतो..
तू जगाला जो दाखवतो..
तू जाणून जो घेतो..
तुला जावा असा जो वाटतो..
असे कितीसे थर.. थरावर..
वरवर वाटत गेले...
वाटलेले सत्य की..
असत्य सत्य..?
कळले?की कळूनही...
कोणासाठी कुठेतरी..
कसे कसे कापत गेले?
गेले की गेल्यासारखे..
वाटून ही.. वहावत..
पुन्हा पुन्हा..तेथेच 
तुझ्याच तीरावर ती..
फिरत फिरत तुझ्यामधेच..कोरत गेले थर????

c04ebe4da4c2ed773c95d3cedc3d7760

अस्मिता

#OpenPoetry तुझ्यामागे पळायची...
 इतकी सवय झाली...
की सवयीची सवय देखील...
 पळायला लागली..
c04ebe4da4c2ed773c95d3cedc3d7760

अस्मिता

लहानपणी अंगणात 
एक विद्युत तारेचा खांब होता..
त्याला शरीराचं लटकन बनवून..
उलटे झोके घेताना..
 आभाळ.. कधींडोळ्याची पापणी वाटे..
तर कधी माझं  स्वतःच वयेक्तिक जग..

आपल्या आभाळात..
मोकळा श्वास घेताना माहीत नव्हतं..
आईच्या कुशीतलं हे आभाळ..
कुठेच मिळणारं नाही...
मग झोके सीधे घेतले..
आणि अगदी तसेच उलटे घेतले तरीही.. ..

आभाळ तुझंही मन..
आई सारखं कावर बावर झालं का रे?
तूही लपून बसला तिच्यासारखाच...
हुंदका.. दाबून?

समोर ये.. होऊ दे ना ..
भावनांचा गडगडाट..
आणि सुखांचा घमघमाट
मलाही माहेरपणाला येवून 
मोकळं झाल्यासारखं वाटेल..
 येवू दे सरी ..
पुन्हा एकदा.. बालपण वाटेल.

अस्मिता

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile