Nojoto: Largest Storytelling Platform
swapnitaaamberka5282
  • 17Stories
  • 15Followers
  • 113Love
    55Views

स्वप्निता कमलाकर आंबेरकर

  • Popular
  • Latest
  • Video
ba33dbf576e7ddcd8432f58e006facf8

स्वप्निता कमलाकर आंबेरकर

भरजरी साडी घेतली ती सणाला भावाने,
नवी कोरी साडी अशी नेली ती महापुराने.

शांत झाले डोळे पाणी घरावरून वाहताना,
डोळ्यातील पाणी नाहिसे झाले संसार मोडताना.

पाणी वाहत राहिलं माणसे अंकाताने ओरडली,
निसर्गाच्या कोपामुळे चिपळूण नगरी उद्ध्वस्त झाली.

पुराच्या पाण्यात दिवस रात्र देवा तू हि होतास जागेवर,
तू तरी देवा सावरायची होती रे माणसं चौथ्या हातावर.

निसर्ग पळवतोय आम्हा दुःखाच्या वाटेवरी रडत,
नशिबात भेटलेला दिवस काढतोय आम्ही मरत.

पुन्हा एकदा नांदू दे रे देवा सुख सारे ते नव्याने,
कोकणात बहरू दे ते शिवार मोठ्या डौलाने.

©स्वप्निता कमलाकर आंबेरकर

ba33dbf576e7ddcd8432f58e006facf8

स्वप्निता कमलाकर आंबेरकर

बैलपोळा


रान डोलू लागले वनी आणि बहरला मळा,
माझ्या सर्जा-राजाचा तो आला बैलपोळा.
गुलाल  उधळीत तो शेतकरी राजा आला,
त्या रोनोवनी कसा तो सुखाला बहर आला.

बैलपोळा हा पहाण्या गाव झाला तो गोळा,
 माझ्या सर्जा-राजाचा तो आला बैलपोळा.

पाय नाचू लागले त्या गुबु गुबु आवाजाने,
शिळ घातली मंद अशा त्या रानवाऱ्याने.

मखमली शाल घालतना तो लागला लळा,
माझ्या सर्जा-राजाचा तो आला बैलपोळा.

पुरणाची पोळी त्या बैलपोळ्याला ती बनली,
शेतकऱ्याची माझ्या घरे गुलाल रंगाने सजली.

गाव जमला तो आंनंदाचा पाहण्यास सोहळा,
त्या माझ्या सर्जा-राजाचा तो आला बैलपोळा.

नंदीबैल आज असे गाली पाहुनी माणसे गोळा,
त्या माझ्या सर्जा-राजाचा तो आला बैलपोळा.

                
                                            स्वप्निता कमलाकर आंबेरकर #clouds
ba33dbf576e7ddcd8432f58e006facf8

स्वप्निता कमलाकर आंबेरकर

#हरवलेला बाबा#
 

लेक मी तुझी बाबा घे मला मिठित,
मी आलेय या जगात तुला शोधीत.
या लेकीचा बाबा हरवलास कुठे तू,
येशील ना रे बाबा मला भेटायला तू.

जीव तुटला आहे बाबा पहायला तुला, 
या जन्मी तरी तु भेटशील ना तु मला .
नजर ही शोधतेय तुझ्या त्या चेहऱ्याला,
रोज विचारत असते मी त्या वाऱ्याला.

दिवस रोज जातो पण बाबा नाही दिसत,
सुखाच्या त्या क्षणात बाबा नाही मिळत.
घरातील लेकरांची नजर तुझी वाट बघतेय,
येशील म्हणुन मीच स्वतःला समजावतेय.

वाट पाहताना ती वाट मात्र ती संपून गेली,
कन्यादानासाठी माय मात्र एकटी राहीली.
तुझ्या मिठीतला विसावा क्षणात तो उडाला,
माझा तो हरवलेला बाबा दिसेल का जगाला. 


    कु. स्वप्निता कमलाकर आंबेरकर #father
ba33dbf576e7ddcd8432f58e006facf8

स्वप्निता कमलाकर आंबेरकर

मार्गदर्शक 


ऊन्हाचे चटके बसत असताना देखील सावली देतो,
ती सावली मोठी किंवा छोटी कारण ती सावली एक आपला मार्गदर्शक असतो.

चुकलेल्या वाटेवर मार्ग दाखवतो,ओशाळलेल्या आयुष्यात तो एक आपला मार्गदर्शक असतो.

आपल्याला जीवनात मागे खेचणारे खुप असतात, 
पण यशस्वी होण्यासाठी पुढे चालवण्यासाठी तो एक आपला मार्गदर्शक असतो.

जीवनाचा मेळ बसवणारा तो मार्गदर्शक
प्रत्येक चढउतार झेलणारा तो मार्गदर्शक
योग्य ती दिशा दाखवणारा तो मार्गदर्शक 

आयुष्याचा खेळ संपूनही पुन्हा नव्याने जगण्याची उमेद देतो तो मार्गदर्शक असतो.


                                                            स्वप्निता कमलाकर आंबेरकर #InspireThroughWriting
ba33dbf576e7ddcd8432f58e006facf8

स्वप्निता कमलाकर आंबेरकर

ती सोनेरी पहाट लाजे पाहुन तुला 

      माझ्या मनातील शब्द कळे तुला 

दोन प्रेमीची सुंदर ती वाट 

मिळे जशी फुलाला पानांची साथ #HopeMessage
ba33dbf576e7ddcd8432f58e006facf8

स्वप्निता कमलाकर आंबेरकर

🚩🚩 पंढरीची वारी  🚩🚩

।। विठ्ठलाच्या भेटीसाठी आलो बेगी चालूनी ।। विठ्ठल माझा पाही वाट डोळे पंढरी लावूनी ।।

।। माझ्या पंढरपुरीच्या विठ्ठला आलो मी दारी ।।भोळ्याभाबड्या विठू माऊलीचा मी वारकरी।।

।। पंढरपुरीचा मी माझा सावळा विठ्ठल पाहिला ।। डोळे भरुनी पाही त्या चंद्रभागा बहिणीला ।। 

।। दरबारी माझी आई रुक्मिणी हसे पाहूनी ।। विठू माऊलीला पाही वारकरी आनंदूनी ।। 

।। वेडा भक्त वारकरी आलो मी तुझ्या दारी ।।बरसू दे तुझ्या प्रेमळ पाऊसाच्या त्या सरी ।। 

।। माझ्या विठ्ठलाचे अनोखे नाते असे ते माझे ।।भेटे मला तुझ्या दारी मुखदर्शन ते सुखाचे ।।

।। वेडी वाट पंढरीची धरली या भक्ताने तुझी ।।माऊली तु भरली ती झोळी सुखाने माझी ।। 

।। पंढरीच्या राजा माझे मन गुंतले त्या दरबारी ।। तु माझी विठू माऊली वेडा तुझा मी वारकरी।। 

।। माझ्या पंंढरीच्या राजाची किती सांगू महती ।।साऱ्या जगात गाजे माझ्या माऊलीची कीर्ती ।।

।। युगे विठेवरी उभी ती माझी माय माऊली ।। आम्हां लेकरांवर तीची आहे मायेची सावली ।। 

।। वेडा भक्त गाई गुणगाण तुझे या मुखी ।।दर्शन होताच दरबारी होऊनी आम्ही सुखी ।।

।। माझी विठाई होऊनी ती आमची आई ।। धरतीवर दिसे रुप सुंदर तुझे ते ठायी ।।

।। पायी चालत येऊनी तुझ्या दर्शनासाठी ।।ओढ लागे पुन्हा त्या क्षणाच्या भेटीसाठी ।।

                    
                       स्वप्निता कमलाकर आंबेरकर

ba33dbf576e7ddcd8432f58e006facf8

स्वप्निता कमलाकर आंबेरकर

⛵कोळीराजा ⛵

सागरा ला डोळे लावूनी बसलाय तो घरी माझा राजा,
चिंता असूनही धीर न सोडणारा दऱ्याचा कोळीराजा .

मनात सुरु आहे घालमेल पण नाही दाखवलं जगाला,
दुःख झेलून हसून देतोय आधार तो आपल्या कुटुंबाला.

सगळ्यांना मिळालयं मानाचं ते स्थान तरी तो मरतोय,
पण माझा कोळीराजा हरुनही मोठ्या मानाने जगतोय.

जग म्हणतयं नाही आहे त्याचा घरी कसली ती गरीबी, 
पण  जगाला नाही माहित  काय आहे त्याच्या नशिबी.

तरीही कोळी राजा पुन्हा मानाने समुद्री लाटा झेलतोय,
ना कर्ज माफी ना फायदा तरही तो पोटासाठी झटतोय .

ना जगण्याची आशा ना मरणाची त्याला आहे भीती,
शिवविचार मनात ठेऊनी वाढवतोय कष्टाची ती गती.

वादळ वाऱ्याला पाठीशी घेऊनी जगून तो दाखवतोय,
माझा कोळी राजा जगाला जगायला तो शिकवतोय.

                               स्वप्निता कमलाकर आंबेरकर #Ocean
ba33dbf576e7ddcd8432f58e006facf8

स्वप्निता कमलाकर आंबेरकर

#sitarmusic
ba33dbf576e7ddcd8432f58e006facf8

स्वप्निता कमलाकर आंबेरकर

#Flute
ba33dbf576e7ddcd8432f58e006facf8

स्वप्निता कमलाकर आंबेरकर

#sitarmusic
loader
Home
Explore
Events
Notification
Profile