Nojoto: Largest Storytelling Platform
vasundhara6341
  • 28Stories
  • 7Followers
  • 189Love
    287Views

Vasundhara Jadhav

poetess

  • Popular
  • Latest
  • Video
b3ec7d6dafb4b8e3efc332b1c9d9eb62

Vasundhara Jadhav

सय ग्रिष्माची जुनी जाणती
बहाव्यासंग फिरून येती
                      तू शिशिरासम पर्णहीन
                       मी ग्रिष्मासह फुलून येती
थेंब कोवळा शमवतो अग्नी
थरथरे उगा कांचन कांती 
                         अंबराची तरूल झुंबरे 
                          तप्त सोनसळी जणू ओघळती
मी शोधू आठवण कोणती 
 जर्द बहाव्यासंग  उतरती
                           उन्हास देता एक आडोसा 
                            बहावा उगा जणू खुणावती

                       - वसुंधरा

©Vasundhara Jadhav
  #बहावा#वसुंधरा जाधव
b3ec7d6dafb4b8e3efc332b1c9d9eb62

Vasundhara Jadhav

1.You started being offline these days.
आजकाल तू ऑफलाइन असतो/असते.
आजकल तुम ऑफलाइन रहते हो।

2. If you harass me again. I will block you.
जर मला पुन्हा त्रास दिला तर मी तुला ब्लॉक करून टाकणार.

अगर मुझे फिर से तंग किया तो मैं तुम्हे ब्लॉक कर दूंगी।

3. Let's talk in the morning.
चला सकाळी बोलू.
चलों सुबह बात करते हैं।

4. Don't harass me by texting.
मला मेसेज करून त्रास देऊ नको.
मुझे मैसेज करके तंग मत करो.

5. I do not want yo talk to you.
मी तुमच्याशी बोलू इच्छित नाही.
मैं तुमसे बात नहीं करना चाहती।

6. Let's talk later.
 चल नंतर बोलूया.
चलो बाद मैं बात करते हैं।

7. I have run out of my data.
 माझं नेट संपले आहे.
मेरा नेट खत्म हो गया हैं।

©Vasundhara Jadhav # Speak with Vasu

#HeartBreak
b3ec7d6dafb4b8e3efc332b1c9d9eb62

Vasundhara Jadhav

माणसाचं मन विशाल सागरासारखं असते. त्याचं त्याचं साचणं असतं, त्याचं त्याचं घुटमळणं असतं, त्याची त्याची वादळं असतात, त्याची त्याची भरती-ओहोटी असते, त्याचा त्याचा विस्तार असतो, त्याची त्याची खोली असते. त्याच्याही खोलवर अंधार  असतो,  त्याचं भरकटणं असतं तर त्याचा किनारा असतो. त्याची त्याची निळाईही असते, त्याच चमकणंही असतं,  त्याचं सामावून घेणंही असतं, त्याच दूर लोटणंही असतं, त्याचे त्याचे  शंख, शिंपले आणि मोतीसुद्धा असतात.  

वसुंधरा जाधव

©Vasundhara Jadhav
  #वसु# मी समुद्र

#वसु# मी समुद्र #मराठीविचार

b3ec7d6dafb4b8e3efc332b1c9d9eb62

Vasundhara Jadhav

तुझ्या मोकळ्या केसांचं   गच्च आभाळ दाटलं
काठ काजळी गहिरे        त्यात तुफान उठलं

श्वास थांबती मंदसा   झुले मनाचा हिंदोळा
वारा खट्याळ धुंदसा    घन मनाचा सावळा

चाल सावळ्या मनाची    फेर धरती भोवती
लडीवाळ बट तुझी      अशी अधीर सोबती

मुग्ध रेशीमस्पर्श    रोमरोमात फुलती
आडखळणारे ओठ      श्वास निशब्द गुंफती

शब्द मौनाचे लाजरे     रान पिसाट गाठलं
तुझ्यामाझ्यातल्या वेळी    दूर चांदणं सांडलं

वसु

©Vasundhara Jadhav
  #दूर चांदणं सांडलं#वसुंधरा जाधव

#दूर चांदणं सांडलंवसुंधरा जाधव #मराठीकविता

b3ec7d6dafb4b8e3efc332b1c9d9eb62

Vasundhara Jadhav

तुझ्या मोकळ्या केसांचं   गच्च आभाळ दाटलं
काठ काजळी गहिरे        त्यात तुफान उठलं

श्वास थांबती मंदसा   झुले मनाचा हिंदोळा
वारा खट्याळ धुंदसा    घन मनाचा सावळा

चाल सावळ्या मनाची    फेर धरती भोवती
लडीवाळ बट तुझी      अशी अधीर सोबती

मुग्ध रेशीमस्पर्श    रोमरोमात फुलती
आडखळणारे ओठ      श्वास निशब्द गुंफती

शब्द मौनाचे लाजरे     रान पिसाट गाठलं
तुझ्यामाझ्यातल्या वेळी    दुर चांदणं सांडलं

वसु

©Vasundhara Jadhav
  # दूर चांदण सांडलं#वसु#

# दूर चांदण सांडलंवसु# #मराठीकविता

b3ec7d6dafb4b8e3efc332b1c9d9eb62

Vasundhara Jadhav

मी तुझी वाट पाहत आहे........
संध्याकाळच्या रुणझुणणार्‍या वार्‍यासोबत
भुरभरुतायेय केस चेहर्‍यावरून
त्यातूनच झिरपतोय
तिरकस संधिप्रकाश
आणि दिवस-रात्री दरम्यानच्या या विरामाची ही कातरवेळ
आजन्म वाट पाहत असल्याची हुरहुर
आणि आर्त वादळाच काहूर
अस्वस्थ होऊन वेगाने उसळतोय
आकुंचित होऊन मनाचा सागर
उजेड आणि अंधार मिसळतोय
ढळतीय दूरवर तेजाची लकेर
मग सगळं काही शांत होईल
या आभाळाला  शामल रंग चढेल
आणि शांतता नक्कीच येईल
पण आपल्या दोन शरीराला एकत्र बांधलेल्या
आणि एकमेकांना दिलेली नजर
याशिवाय मी शांततेची कल्पनाच करू शकत नाही.
आता तुझ्याशिवाय या अस्थीरतेला स्थैर्य नाही.
तू ये मी तुझी वाट पाहत आहे.


 वसु

©Vasundhara Jadhav
  # मी तुझी वाट पाहत आहे....

#वसुंधरा जाधव

# मी तुझी वाट पाहत आहे.... #वसुंधरा जाधव #मराठीकविता

b3ec7d6dafb4b8e3efc332b1c9d9eb62

Vasundhara Jadhav

हम बात रखने का हुनर रखते है
आप तो छुपाके खंजर रखते है

कांटे जितने भी राह में बिछांओ
पाँव में फुलोंका मंजर रखते है

क्या पता कल का, गले मिल लो दोस्त
दिल जानसे सबकी कदर रखते है

लगावो तुम प्यार से गोते यूंही
दिलों में गहरे समंदर रखते है

तुम कितना भी जाओ पार नजरके 
हम भी तो बाज़ की नजर रखते है

वसुंधरा जाधव

©Vasundhara Jadhav #हुनर##वसुंधरा जाधव#
b3ec7d6dafb4b8e3efc332b1c9d9eb62

Vasundhara Jadhav

जेंव्हा वेळ योग्य असेल 
निदान तेंव्हा तरी माझी आठवण येईल

इतकं ही पुरेस आहे.....
#वसु#

©Vasundhara Jadhav #वसुंधरा जाधव##इतकही पुरेस आहे#

#वसुंधरा जाधव#इतकही पुरेस आहे#

b3ec7d6dafb4b8e3efc332b1c9d9eb62

Vasundhara Jadhav

जेंव्हा वेळ योग्य असेल 
निदान तेंव्हा तरी माझी आठवण येईल

इतकं ही पुरेस आहे.....
#वसु#

©Vasundhara Jadhav #वसुंधरा जाधव# #इतकही पुरेस आहे#

#वसुंधरा जाधव# #इतकही पुरेस आहे#

b3ec7d6dafb4b8e3efc332b1c9d9eb62

Vasundhara Jadhav

ज्या रस्त्यावर तूचं चालायच ठरवलं आहेस 
तर... थांबायच कुठे... हे ही तुलाच ठरवावं लागेल
#वसु#

©Vasundhara Jadhav #रस्ता##एकाकी##वसुंधरा जाधव# 
#alone#

रस्ता#एकाकी#वसुंधरा जाधव# alone#

loader
Home
Explore
Events
Notification
Profile