Nojoto: Largest Storytelling Platform
komalparteki3160
  • 20Stories
  • 9Followers
  • 169Love
    40Views

Komal Parteki

  • Popular
  • Latest
  • Video
77179b4f02825087c0cc8312cc810be5

Komal Parteki

आई बाहेर मी खेळत असताना एक काका आले,
त्यांना पाहून आई मी थोडी घाबरले...

मग आई त्या काकांनी चॉकलेट मला दिलं
चॉकलेट देऊन खेळायला त्यांच्या घरी नेलं...

खेळता खेळता आई त्यांनी धरला माझं हात,
हात पकडून आई त्यांनी केला माझा घात...

जोरात त्यांनी आई कपडे माझे फाडले,
मी पळून जायला लागले तर त्यांनी पाय माझे ओढले... 

ओरडायचा प्रयत्न करता आई त्यांनी तोंड माझे दाबले,
तोंड माझे दाबता आई श्वास माझे थांबले...

पडता त्यांचा हात माझ्या अंगावर आई 
अंगाची माझ्या लाही लाही झाली,
थोड्याच वेळात आई मी रक्तामध्ये न्हाली...

आई त्यांनी माझ्यासोबत असं का ग केले,
लहानवयामध्ये हे भोग माझ्या नशिबी का आले ...

©Komal Parteki
77179b4f02825087c0cc8312cc810be5

Komal Parteki

सुख म्हणजे नक्की काय असतं ?
प्रत्येकाच्यापरिने ते वेगवेगळं असतं
पाहिलं तर आनंद, अनुभवलं तर समाधान असतं
सुख परिभाषेत नसुन, ते भावनेत असतं
आईच्या प्रेमात तर बापाच्या रागात असतं
आजीच्या त्या २ रुपयात तर आजोबांच्या आशिर्वादात असतं
सुख बंगल्यातही असतं, झोपडीत ही असतं
जिथं मानसं जुळतात तिथंच ते नांदत असतं
सुख शहरातही असतं, गावातही असतं
आपुलकी, जिव्हाळा, प्रेमात फुलत असतं
सुख पिझ्झा बर्गर मद्धे ही असतं, कांदा भाकरीत ही असतं
पण घाम गाळून कष्टाचं खाण्याची चवच न्यारी असतं
सुख मुलात ही असतं, सुख मुलीत ही असतं
समाजात मात्र वंशाच्या दिव्यालाचं गाजावाजा असतं
सुख लहान असण्यात असतं, मोठही असण्यात असतं
मनानं मोठं झाल्यास सगळं लहान होऊन अनुभवायचं असतं
सुख आमच्यात असतं, सुख तुमच्यातही असतं
पाहिलं तर आनंद अनुभवलं तर समाधान असतं...

©Komal Parteki #RepublicDay
77179b4f02825087c0cc8312cc810be5

Komal Parteki

चांदण्या राती 
हात तुझा हाती असता,
अबोल दोघेही मात्र
श्र्वास प्रवाह वाढत होता,

निळ्याभोर आकाशात
चंद्र पण आला होता,
चांदण्यांचा जणू त्याने 
शाल पांघरला होता,

श्र्वासांचा आपल्या सुगंध
चहुकडे पसरला होता,
वाराही त्यासवे 
काहीतरी गुणगुणत होता

त्या रातीची निरव शांतता 
जणु श्र्वासच भंग करित होता,
हृदय ही त्याला
एकमेव होऊन साथ देत होता,

तुझ्या माझ्या भेटीचा 
चंद्र एकमेव साक्ष होता,
चांदण्या राती जेव्हा
तुझा हात माझ्या हाती होता...

कु. कोमल परतेकी

©Komal Parteki
77179b4f02825087c0cc8312cc810be5

Komal Parteki

Fish should have one-sided love for water
Means,
 If fish are taken out of the water, fish cannot survive,
 It hurts to walk away from water
 But the water was just like that...

- Komal parteki ✍️

©Wings of words #Luminance
77179b4f02825087c0cc8312cc810be5

Komal Parteki

ही पाखरं वेडी भोळी भाबडी 
भराऱ्या घेतात उंच आस्मानी 
हरवले हक्काचे घर त्यांचे म्हणून 
भिरभिरतात आता दूषित हवामानी !

माणसांनी उध्वस्त केले रान सारे 
नि तोडली झाडे हीरवी 
भराऱ्या घेण्या जागा नसता ऊरली 
म्हणून आता गच्ची नि शहरा शिरली !

शहरातही शिरुन सुरक्षित जागा नाही
न रहायला झाडं न उडायला आकाश
जिकडे पाहावं तिकडे
गगनचुंबी इमारती मात्र खास !

आता त्यांनी तरी काय करावं
या भल्या मोठ्या बुद्धीमान माणसांसमोर
म्हणे अख्ख जगंच माझं
मग तो असो गाव की असो शहर !

माणसाच्या बुद्धिला तर तोडच नाही
पण हा मुर्खपणा पण काही कमी नाही
विज्ञान, भुगोल तर शिकतोयच ना 
मग का शिरत नाही पर्यावरणाची काळजी यांच्या डोक्यातही ?

म्हणे प्रगती करतोय,
विकास साधतोय
ऑक्सिजन विकत घेऊन, श्र्वास घेणार ना
तेव्हा कळेल मृत्यूच्या दारात कुणाला ढकलतोय...

- Komal parteki ✍️

©Wings of words #NatureLove
77179b4f02825087c0cc8312cc810be5

Komal Parteki

वो दिन भर के किस्से रात में सुनाता हैं
उसकी सुबह मुझसे सुरु और रात मुझपे खतम होती हैं
जिंदगी हर मोड पर, हर राह पर वो मुझे साथ चाहता हैं
मेरे चेहरे की उदासी देख कर वही तो मुझे हसाता हैं
मेरे आँखो में आंसु देख खुद खामोश हो जाता हैं
मेरे हर Problem का solution वो खुद धुंड लाता हैं
वह एक एहसास हैं
और जिंदगी का एक एहसान
मेरी मुस्कान
और खोमोशी की जुबान...

©komal parteki #love❤ #Love #tum_aur_mai 

#pyaar
77179b4f02825087c0cc8312cc810be5

Komal Parteki

माझ्यातली "मी" तुझ्यात शोधते
"मी" शोधता शोधता तुझ्यात हरवते.....

©komal parteki #peace
77179b4f02825087c0cc8312cc810be5

Komal Parteki

मन आठवणींच्या गावात 
तुला भेटायला येतं
डोळ्यात तेव्हा
अलगद पाणी दाटून येतं

तुला बघुन मग 
छोट्याशा डोळ्यात
आभाळंच फुटुन येतं 
का माहिती नाही
पण तुलाच बघायला ते आतुरतं

मन माझ्याशी भांडतं
तुला भेटायला ते झुरतं
डोळे बंद केले की
आठवणींच्या गावात तरी भेटता येतं

कसं सावरु याला मी
याला कुठं तुझ्याशिवाय 
काही सुचतं
तुलाच बघण्यासाठी
कायम लगबग करतं

तुच समजावं की या वेड्या मनाला
हे माझं कुठं ऐकतं
भोळं आहे रे हे
तुझ्याविना कुठं याचं काही जमतं

©komal parteki

77179b4f02825087c0cc8312cc810be5

Komal Parteki

ज्याचा स्पर्श झाल्यावर
काहीही वाटत नाही अलग
तोच खरा जिवलग 

ज्याच्या मिठीत विसावल्यावर 
नसते कसलीच फिकिर मग
तोच खरा जिवलग

जो जाणतो
जिवाची तगमग
तोच खरा जिवलग

ज्याच्या सोबतीने सोबत 
वाटतं अख्ख जग
तोच खरा जिवलग

ज्याला भेटण्यासाठी
जिवाची होते लगबग
तो खरा जिवलग

ज्याला भेटल्यावर
मन बनते अगदी खग
तोच माझा जिवलग ❤️🤞

©komal parteki #Love

Love

77179b4f02825087c0cc8312cc810be5

Komal Parteki

गर्दीत फक्त तुला शोधणारी मी
माझ्यात तुला शोधणारी मी
हास्याच्या धबधब्यांमद्धे 
तुलाच आठवत हास्य करीत मी...

©komal parteki

loader
Home
Explore
Events
Notification
Profile