Nojoto: Largest Storytelling Platform
rutujakadam6075
  • 38Stories
  • 49Followers
  • 343Love
    118Views

Rutuja kadam

  • Popular
  • Latest
  • Video
72106fe96f1d6e8a9e358b18a0951bd1

Rutuja kadam

काही लोक आपल्याला 
स्वतःपेक्षा जास्त ओळखत
 असतील तर ती गोष्ट खरंच 
सुखावणारी असते..😊

@rutu_kavya_

72106fe96f1d6e8a9e358b18a0951bd1

Rutuja kadam

सगळ्या सणांपेक्षा 
आमची दिवाळी बरी
आम्ही सगळे पदार्थ
एकत्र जमतो घरी

लाडू म्हणतो मला
मी किती गोड आहे
सगळ्यांची फक्त
माझ्याकडेच ओढ आहे

चकली गोल फिरली
अन गाणे म्हणू लागले
मी सर्वांची आवडती
साऱ्यांना माझीच आस लागली

चिवडा गप्प बसला नाही
डबा उघडूनच बाहेर आला
खमंग अशी चव घेऊन
सर्वांच्या तोंडात गेला

करंजी बसली रुसून
तिच्याकडे कोणीच लक्ष देईना
मग मी प्रेमाने घेतले तिला
तिचे हाल मला बघवेना

शेवटी सगळे एकत्र आले
एका प्लेटमध्ये बसले
पण अचानक जादूप्रमाणे
सगळे कुठे गायब झाले

72106fe96f1d6e8a9e358b18a0951bd1

Rutuja kadam

नको उन्हाळा आणि पावसाळा
थंडी घेऊन आला हिवाळा..
गुलाबी हवा पसरवुनी
धुके देतात उजाळा.. #Winters
72106fe96f1d6e8a9e358b18a0951bd1

Rutuja kadam

हसायचं कुठे?
रुसायचं कुठे?
बोलायचं कुठे ?
हे ठिकाण एकदा सापडलं की 
जगणं थोडं सोपं होऊन जाईल. #thought_of_the_day
72106fe96f1d6e8a9e358b18a0951bd1

Rutuja kadam

निराशेमध्येच लपून राहते आशा
द्यावा तिलाही थोडा उजाळा..
नैराश्य बाजूला ठेवते सारी स्वप्नं
झुलवूया त्या स्वप्नांसाठी हिंदोळा.. #life

#Happiness
72106fe96f1d6e8a9e358b18a0951bd1

Rutuja kadam

सुख 

आधुनिक यंत्रणा इतकी जास्त नव्हती तेव्हा
जेव्हा आम्ही शाळेत होतो
आमच्यासाठी पाटी आणि पेन्सिल
 हेच सुख अनमोल होतं... #_love_school_
72106fe96f1d6e8a9e358b18a0951bd1

Rutuja kadam

अंधार

अंधारात कोंडून घेतले
मनातही काळोख पसरला
होता जो मनी एकांत
त्या काळोखात दिसेनासा झाला...

ती एकटी फक्त होती तिथे
आणि होता तो शांत अंधार
मनात काहीच आले नाही
सर्व विचारांनी घेतली माघार...

उजेडातल्या या गर्दीपेक्षा
समाधान देईल तो अंधार
फसव्या या जगात
बरा वाटतो हा एकटा अंधार...

दिवसा छळणारे अनेक प्रश्न
त्या अंधारात विसावा घेतात
दिसत नाही तेव्हा काहीच
पण डोळे सुखावलेले असतात...

काही ना काही सोबत असतच
एकटा कोणी नसतो 
अंधार एकटा असूनही
सर्वांच्या मनाला कवेत घेतो...

ऋतुजा कदम #Dark
72106fe96f1d6e8a9e358b18a0951bd1

Rutuja kadam

प्रत्येक गोष्टीला प्रत्येकाने 
महत्व द्यायलाच पाहिजे 
हे खूपच महत्वाचे आहे..
असं वाटत नाही कारण
प्रश्न हा शेवटी प्रत्येकाच्या 
priorities चा असतो..

72106fe96f1d6e8a9e358b18a0951bd1

Rutuja kadam

finally ,
final year
students chya 
final exams

दोन दिवसांवर येऊन थांबल्या😇 #BSC
72106fe96f1d6e8a9e358b18a0951bd1

Rutuja kadam

जिथे समजूतदार पणा असतो
तिथे गैरसमज कधीच नसतो..
आणि 
जिथे संवाद असतो
तिथे दुरावा कधीच नसतो..

ऋतुजा कदम

loader
Home
Explore
Events
Notification
Profile