Nojoto: Largest Storytelling Platform
shivkumarvishwan1501
  • 6Stories
  • 3Followers
  • 20Love
    55Views

Shivkumar Vishwanath Deore

good

  • Popular
  • Latest
  • Video
18377ab6be081e816ba2739ebf8d88b7

Shivkumar Vishwanath Deore

रोपटं
नका वाढू देऊ हिच्या सोनेरी केसांना,
नका चमकू देऊ तिच्या चमकदार डोळ्यांना,
धनी दाबा हिचा गळा, घ्या ईच्या नरडीचा घोट,
एकदाचा पुरूनच टाका हिच्या नाजूक देहाला होण्याआधी तो पूर्ण.
नका बघू माझ्याकडे डोळ्यांचा असा आ वासून,
नका चावू दात ओठ माझं असं बोलणं ऐकून.
सांगते मी धनी ,माझं आज तेव्हड ऐका,
नाही पुरणार रात्री रडायला खरंच सांगते आज माझं तेव्हड ऐका.
होऊन मोठी, येईल हिच्या डोळ्यांत चमकदार तेज सूर्याचे,
पण दिसेल एखाद्या विकृताला हिच्या डोळ्यात मादकता एखाद्या मेणकेचे.
विकसित होऊन स्वरयंत्र हिचे, कंठातून घेईल जन्म कोकिळा जणू,
पण नाही दिसणार विकृतीला हिच्या कंठातली ती कोकिळा,तर दिसेल फक्त आणि फक्त उघडी आणि गोरीपान मान.
मोठी झाल्यावर आपल्याला दिसेल आपली बाहुली उंच आणि रुबाबदार,
पण विकृतीला नाही दिसणार हा रुबाब, तर दिसतील फक्त आणि फक्त तिच्या शरीराचे उभार.
खुलून आपल्या फुलराणीच रूप,घर आपलं फुलांनी दरवळेल,
पण जवळच एखादी विकृती, हुंगुण हा सुगंध अजूनच चवताळेल.
पडेल आपली मुलगी घराबाहेर घेऊन विकासाचं पाऊल,
पण विकृतीला वाटेल ही तिच्या सावजाची चाहूल.
आणि एक दिवस ती विकृती होऊन वासनेच्या धुंदीत गुल,
झिडकारून आपल्या लेकराचा प्रतिकार, कुस्करेल हो हे नाजुकस फुल.
धनी,धनी सांगा मला , होईल का ते आपल्याला सहन,
हात जोडून आपण मागू देवाकडं मरण.
म्हणून म्हंते धनी हे रोपटं खुडण्याआधी आपणच खुडून टाकू,
जिंदगीभरची तिची काळजी आताच मिटवून टाकू,
जिंदगीभरची तिची काळजी आताच मिटवून टाकू.
                        -शिवकुमार #रोपटं
18377ab6be081e816ba2739ebf8d88b7

Shivkumar Vishwanath Deore

"#aajbaryachvarshannimimazagavpahila
18377ab6be081e816ba2739ebf8d88b7

Shivkumar Vishwanath Deore

नदीचे शेवाळ

नदीचे शेवाळ #poem

18377ab6be081e816ba2739ebf8d88b7

Shivkumar Vishwanath Deore

नदीचे शेवाळ
ह्या निष्ठुर पावसात संसार माझा भिजला होता,
त्यात हा बेईमान डोळा अजून पाण्याची भर घालत होता.
दिसली चिखलात माखलेली माझ्या छकुलीची बाहुली,
बाहुली होती धडधाकट,पण तिच्या डोळ्यातला चमकता मोती मात्र पडला होता.
माझं कुटुंब आणि घरातल्या भिंतींमध्ये अंतर इतकच उरलं होतं,
त्या होत्या चिखलाने माखलेल्या काळ्या आणि कुटुंब होतं भयानतेने पांढरेफट्ट पडलेलं.
पिंजऱ्यातला बडबड्या काऊ तेवढा वाचला होता,
पण बघून हा हाहाकार, त्याचा कंठ मात्र गोठला होता.
अजूनही येतोय चिखलाला वास माझ्या मीठ,मिरची,तिखट आणि लोणच्याचा,
घरात घुमतोय अजूनही तोच राक्षसी दर्प नदीच्या शेवाळाचा, नदीच्या शेवाळाचा......
                                                         -शिवकुमार
                                                  (8055643756) नदीचे शेवाळ

नदीचे शेवाळ #poem

18377ab6be081e816ba2739ebf8d88b7

Shivkumar Vishwanath Deore

राघू मैना
सोन्यासारखा होता राघू मैनेचा संसार ।
एक पुत्र एक पुत्री,होते त्यांचे अलंकार ।।
राघू कष्टाळू मेहनती,मैना सोज्वळ पतीव्रती ।
पिले हुशार गोमटी,काय करावे कौतुक ।।
हेवा वाटे जणीमनी, अशी होती त्यांची करणी ।
राघू कष्टाळू मेहनती,मैना सोज्वळ पतीव्रती ।।
असे असता राजेहो!! नशीबाचं फासं बदललं ।
राघू मैनेच्या संसाराला ग्रहण कस लागलं ।।
नशिबानं कशी बघा काळी चाल ही खेळली।
देवासारख्या राघूला गिधाडाची लत लागली।।
एक चुकलेलं पाऊल होती काळाची ही चाहूल।
क्षण भराच्या सुखाने बुडवले ते देऊळ ।।
ह्या विचारी राघूने कसा अविचार केला।
भोळ्या भाबड्या मैनेचा त्याने घात असा केला।।
आता नसे राघू मैना कष्टाळू मेहनती।
अंथरुणाशी लागुणी पाहती काळाची फिरती पाती।।
पिले हिरमुसली,कोमेजली पाहुनी ही दशा।
आता कोण कशी दाविल त्यांना जीवनाची दिशा।।
म्हणून सांगतो राजेहो!! आठवण पिलांची कायम ठेवा।
राघू मैने वाचून नसतो त्यांचा कुणाकडे ठेवा,
नसतो त्यांचा कुणाकडे ठेवा।।
-	शिवकुमार राघू मैना

राघू मैना #poem

18377ab6be081e816ba2739ebf8d88b7

Shivkumar Vishwanath Deore

मारतो मी फाट्यावर……
मारतो मी फाट्यावर, त्या सर्व आधुनिक प्रथांना,परंपरांना,
ज्या करतायेत मनांमध्ये विषमतेच्या उंच आणि अभेद्य भिंती ।
मारतो मी फाट्यावर ,त्या आधुनिक बुरसट विचारांना,
जे माजवतायेत अशांती ,शांत अशा समाजात ।
मारतो मी फाट्यावर, त्या स्वयंघोषित विचारवंतांना,
पसरवतायेत विष जे निरोगी समाजाच्या नसानसांत ।
मारतो मी फाट्यावर, त्या धर्ममार्तंडांच्या अधर्मी धर्माला,
शिकवतो जो स्थापना धर्माची, इतरांच्या कलेवरांवर ।
मारतो मी फाट्यावर, आजच्या लबाड राजकारणाला,
ज्याचे असते एकच कारण, सत्ता आणि “स्व”अर्थकारण ।
                                    -शिवकुमार मारतो मी फाट्यावर...

मारतो मी फाट्यावर... #poem

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile