मनी दाटता ढग शब्दांचे , लेखणीतुन स्फुरते कविता... वाचन वेड्या रसिकांसाठी, फुलांसारखी फुलते कविता.... स्मरते जेव्हा वाट घराची , माझ्यासंगे रडते कविता... सांगुनि मला जीवनगाणे , दुःख लपवुनी हसते कविता... रंग लेवुनी सुख दुःखाचे, कागदावरी सजते कविता... मनी रंगता रंग गुलाबी , थोडी थोडी कळते कविता... तुझी आठवण येताच सखे , कातरवेळी स्मरते कविता... परतीच्या त्या वाटेवरती , काळजामध्ये उरते कविता... अपरिचित जरी मी जगाला , आदर्श खरा जपती कविता... नसलो आता मैफिलीत मी , माझ्या नावे जगते कविता... ©shrikant patekar #कवितेची गझल