राजवाड्यातील कन्या तू जाई मी तुझ्या अंगणातला मोगरा तुझी वेणी, मी त्यातला गजरा दोघी जणी बहिणी तुम्ही, जाई जुई मी एकटाच का बरं मोगरा. सहजच तुझ्या फुलासारखी माझ्या पानावर करून बघितली नक्षी. त्यातही हसायला लागले तुझे सखे फुलपाखरू आणि पक्षी. मऊ मखमली रंगाची तु जाई शब्द तुझे मांडतानी, लवडली माझी शाई तुझ्या वेणीत माळून मला, शेवटी तुडवू नको पाई मी तुझ्या अंगणातला मोगरा. ©Kiran Kandalkar #जाई