अळूवावरचं पाणी क्षणभर त्याची जिंदगानी किती लोभस रूप त्याचे दिसतो जणू मोत्याचा मणी त्याला न कसली नाती कूणी न त्याच्या अवतिभोवति पान हेच त्याचे विश्व देठाचा असे त्याला आधार स्वतः मध्येच रमतो आनंदाने नाचत बागडतो. त्याला न भिती कशाची मरण जरी त्याच्या सामोरी झुळूक येता वा - याची विलिन होतो मातीशी मला हि वाटतं व्हावं अळूवावरचं पाणी क्षणभंगूर का होईना पण मनसोक्त जगावं.