पुन्हा तोच पाऊस आलाय.. तुझ्या केसात रुळणारा तुझ्या हास्याला भुलणारा तुझ्या डोळ्यांच्या कमानीतून तुझ्या ओठांवर खेळणारा.. हा तोच पाऊस.. दर वर्षी तुझ्या माझ्यात येणारा.. पुन्हा तोच पाऊस.. त्याच सरी.. तोच वारा.. काळजात उमटणारा शहारा.. तीच खळखळणारी लाट.. शांत किनारा.. तरीही.. हो तरीही.. हा पाऊस..सरी.. हा वारा.. शहारा.. तू आणि मी कित्येकदा अंगावर झेललेली लाट.. आणि तुझ्या माझ्या स्वप्नांना मूक साक्षी देणारा हा किनारा.. हल्ली मला माझे वाटत नाहीत ग.. तू ही मला आता आधीसारखी भेटत नाही ग.. #अक्षर #Soultagged